मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

याच महिन्यात असणार आहे सर्वांत मोठी रात्र; तारीख माहिती आहे का?

याच महिन्यात असणार आहे सर्वांत मोठी रात्र; तारीख माहिती आहे का?

सर्वात मोठा दिवस-रात्र

सर्वात मोठा दिवस-रात्र

जीवसृष्टी अस्तित्वात असलेला सूर्यमालिकेतला एकमेव ग्रह म्हणून पृथ्वीकडे पाहिलं जातं. पृथ्वीबद्दल अनेक महत्त्वाच्या रंजक गोष्टी अनेकांना माहिती नसतात.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

नवी दिल्ली, 10 डिसेंबर : आपण ज्या पृथ्वीवर राहतो, त्या पृथ्वीबद्दलच्या अनेक बाबी अनेकांना माहिती नसतात. त्यांच्याबद्दल जाणून घेतलं, तर नक्कीच आपल्या ज्ञानात भर पडू शकते. शिवाय त्यातून अनेक आश्चर्यंही कळतील. पृथ्वीवरच्या अशाच काही रंजक गोष्टी जाणून घेऊ या.

डिसेंबर महिन्यात असते सर्वांत मोठी रात्र

'टीव्ही 9'ने दिलेल्या माहितीनुसार, पृथ्वीबद्दलच्या अनेक रंजक गोष्टी आहेत. त्यातल्या बऱ्याच गोष्टी शाळेत शिकवल्या जातात. पृथ्वीवरची सर्वांत मोठी रात्र कधी असते, या बाबीचाही त्यात समावेश आहे. वर्षातली सर्वांत मोठी रात्र ही 22 डिसेंबरला असते. म्हणजेच तेव्हा दिवस सर्वांत लहान असतो. हा दिवस विंटर सॉल्स्टिस म्हणून ओळखला जातो. 21 डिसेंबर या दिवशी सूर्य दक्षिणायनातून उत्तरायणात प्रवेश करतो. त्यानंतर पुन्हा दिवस मोठा होण्यास सुरुवात होते. पृथ्वीवरचा सर्वांत मोठा दिवस 21 जून हा असतो. या दिवशी सूर्याची किरणं पृथ्वीवर सर्वांत जास्त काळ पडतात. या दिवशी जवळपास 15 ते 16 तास सूर्यकिरणं पृथ्वीवर पडतात. त्यामुळे तो सर्वांत मोठा दिवस ठरतो.

जीवसृष्टी अस्तित्वात असलेला सूर्यमालिकेतला एकमेव ग्रह म्हणून पृथ्वीकडे पाहिलं जातं. पृथ्वीबद्दल अनेक महत्त्वाच्या रंजक गोष्टी अनेकांना माहिती नसतात. याच्याशी संबंधित अनेक प्रश्न विविध स्पर्धा परीक्षांमध्ये विचारले जातात. अशाच काही प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा आपण प्रयत्न करू या.

बेट म्हटलं की नदी, समुद्र, सरोवर अशा चारही दिशांनी पाण्यानं वेढलेला भाग आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो. पृथ्वीवरचं सर्वांत मोठं बेट बर्फाच्छादित आहे. ग्रीनलँड इथं जगातलं सर्वांत मोठं बेट असून ते आकारानं ऑस्ट्रेलियाच्या एक चतुर्थांश भागाइतकं आहे. त्या बेटावरच्या बहुतांश भागावर बर्फ असतो.

हे वाचा - तुमच्या स्मार्टफोनवर 5G नेटवर्क कसं सुरु करायचं? वाचा अगदी सोप्या शब्दात

पृथ्वीचं वय कसं काढतात?

पृथ्वीचं वय सध्या 4.54 अब्ज वर्षं इतकं असल्याचं सांगितलं जातं. शास्त्रज्ञांनी पृथ्वीवरचे सर्वांत जुने दगड शोधून पृथ्वीचं वय निश्चित केलं आहे. पृथ्वीचं वय ठरवण्याच्या अनेक पद्धती आहेत. प्रत्येक पद्धत काही निश्चित गृहीतकांवर अवलंबून असल्याचंही सांगितलं जातं.

हे वाचा - सुवर्णसंधी! Tata मोटर्सच्या 'या' कारवर मिळतोय जबरदस्त डिस्काउंट, वाचा डिटेल्स

पृथ्वीवरची सर्वांत कोरडी जागा कोणती?

कोरडं ठिकाण म्हटलं, की डोळ्यांसमोर वाळवंटाचं चित्र उभं राहतं. जगातलं सर्वांत कोरडं ठिकाण म्हणजे चिलीतलं अटाकामा इथलं वाळवंट. ते वाळवंट असूनही तापमान जास्त नसतं. तिथलं सरासरी तापमान 17 अंश सेल्सियसपर्यंत असतं.

First published:

Tags: History, Lifestyle