मुंबई, 15 जानेवारी : नाच रे मोरा आंब्याच्या वनात... आपण आतापर्यंत हेच गाणं ऐकत आलो आहोत आणि गुणगुणत आलो आहोत. मोर (peacock) म्हटलं की नाचणाराच पक्षी वाटतो. थुई थुई करत आपला रंगबेरंगी भलामोठा पिसारा फुलवत तो नाचतो. अशा नाचणाऱ्या मोराला आपण सर्वांनी पाहिलं आहे. पण कधी या नाचणाऱ्या मोराला उडताना पाहिलं आहे का?
मोर हा पक्षी. पण तरीही उडणाऱ्या पक्ष्यांमध्ये त्याची कुणी गणतीच करत नाही. एरवीदेखील त्याच्याबाबत प्रश्न विचारताना नाचणारा पक्षी कोण? असंच विचारलं जातं. कारण त्याला उडताना कुणी पाहिलंच नाही. पण आता उडणाऱ्या मोराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. @gunsnrosesgirl3 ट्विटरवर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. आयएफएस अधिकारी सुशांता नंदा यांनीदेखील हा व्हिडीओ रिट्वीट केला आहे. हा व्हिडीओ पाहाल तर पुन्हा पुन्हा पाहत राहावा असाच आहे.
Peacocks can fly....
peafowl Is the collective term The males are peacocks and the females are peahens. The babies are called peachicks Give peas a chance.... pic.twitter.com/4e3ie1qeWh — Science girl (@gunsnrosesgirl3) January 15, 2021
व्हिडीओत पाहू शकता. रस्त्यावर दोन मोर चालत आहेत. त्यापैकी एक मोर उडायला लागतो. जमिनीवर पिसारा फुलवून नाचणारा हा मोर पंख पसरून आकाशात उंच भरारी घेतो. अगदी झाडाच्या शेंडापर्यंत तो जातो. ज्याप्रमाणे नाचणाऱ्या मोराचा पिसारा सुंदर दिसतो अगदी तसाच उडतानाही त्याचा पिसारा तितकाच सुंदर दिसतो आहे.
हा व्हिडीओ शेअर करताना ट्वीटमध्ये दिलेल्या माहितीनुसार Peacocks उडू शकतात. मोरांना एकत्रितपणे peafowl म्हटलं जातं. त्यामध्ये नर म्हणजे peacocks आणि मादी म्हणजे peahens. तर त्यांच्या पिल्लांना peachicks म्हटलं जातं.
हे वाचा - देवी सरस्वतीची मूर्ती दिसताच प्रदक्षिणा घालू लागले मोर; पाहतच राहावा असा VIDEO VIRAL
मोरांना कधीही पाहिलं तरी मनाला एक प्रसन्नता मिळते. लॉकडाऊनमध्ये तर मुंबईच्या रस्त्यावरही मोर दिसू लागले होते. दरम्यान काही दिवसांपूर्वीच मोरांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये सरस्वतीच्या मूर्तीभोवती मोर प्रदक्षिणा घालताना दिसले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Social media viral, Viral, Viral videos