सुष्मिता सेन बॉयफ्रेंड रोहमन शॉलसह कधी अडकणार लग्नाच्या बेडीत? पाहा VIDEO

सुष्मिता सेन बॉयफ्रेंड रोहमन शॉलसह कधी अडकणार लग्नाच्या बेडीत? पाहा VIDEO

सुष्मिता सेन (sushmita sen) आणि तिचा बॉयफ्रेंड रोहमन शॉल (rohman shaul) या दोघांमधील जवळीक पाहता दोघंही लवकरच लग्न करतील असा अंदाज लावला जात आहे.

  • Share this:

मुंबई, 16 ऑक्टोबर : बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन (sushmita sen) सोशल मीडियावर सतत अॅक्टिव असते. आपल्या इन्स्टाग्रामवर ती बॉयफ्रेंड रोहमन शॉलसह (Rohman Shawl) फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. गुरुवारी सुष्मिता इन्स्टाग्रामवर लाइव्ह आली, त्यावेळी रोहमनही तिच्यासह होता. या लाइव्हमध्ये सुष्मिताला तिच्या चाहत्यांनी अनेक प्रश्न विचारले. त्यापैकी एक म्हणजे तिचं लग्न  (sushmıta sen marriage).

सुष्मिताला एका चाहत्याने तिच्या लग्नाबाबत विचारलं. सुष्मिता रोहमनसह लग्न कधी करणार असा प्रश्न या चाहत्याने विचारला आणि मग फक्त सुष्मिताच नव्हे तर रोहमननेदेखील चाहत्याच्या या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे.

आपल्या लग्नाबाबत चाहत्याकडून विचारणा झाल्यानंतर सुष्मिता सर्वात आधी रोहमनकडे पाहते आणि त्याला म्हणते तू सांग. यानंतर रोहमनेही मोठ्या चलाखीने या प्रश्नाचं उत्तर देतो. रोहमन म्हणतो बताते है पूछकर. रोहमनच्या या उत्तरानंतर त्याच्यासह सुष्मिताही हसू लागते. सुष्मिता यानंतर म्हणते, आम्ही शेजाऱ्याला विचारून सांगणार आहोत.

हे वाचा - Unfair n Lovely : 'हीरोला नेहमी 'गोरे गोरे गाल'च का वाटतात सुंदर?'

रोहमन शॉल हा एक मॉडेल असून तो सुष्मितापेक्षा 16 वर्षांनी लहान आहे. सुष्मिता आणि रोहमन यांची भेट एका इव्हेंटमध्ये झाली होती. बराच काळ एकमेकांना डेट केल्यावर या दोघांनाही आपल्या नात्याची जाहीर कबुली दिली. त्यानंतर ते अनेक कार्यक्रमांना एकत्र दिसतात. ती नेहमीच तिच्या इन्स्टाग्रामवर आपल्या नात्याचं स्पेशल बाँडिंग शेअर करताना दिसते. या दोघांमधील वाढती जवळीक पाहता हे दोघंही लवकरच लग्न करतील असा अंदाज लावला जात आहे.

हे वाचा - लग्नाआधीच आदित्य नारायण झाला कंगाल; बँकेत फक्त 18000 रुपये शिल्लक

सुष्मिताच्या घरातल्यांनाही रोहमन फार आवडतो. या दोघांच्या नात्याला त्यांनी या आधीच संमती दिली आहे. सुष्मिताच्या दोन्ही मुलींसोबत रोहमनची बॉण्डिंग फार स्ट्राँग आहे. त्यामुळे आता सुष्मिताच्या चाहत्यांना दोघांचं लग्न लवकरात लवकर पाहण्याची इच्छा आहे.

Published by: Priya Lad
First published: October 16, 2020, 9:40 AM IST

ताज्या बातम्या