भारतात कधी आणि कुणाला मिळणार कोरोना लस? केंद्रीय आरोग्यमंत्री काय म्हणाले पाहा
कोरोनाची लस (corona vaccine) कधी मिळणार? प्रत्येकाला पडलेल्या या प्रश्नाचं उत्तर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन (health minister dr harsh vardhan) यांनी दिलं आहे.
मुंबई, 04 ऑक्टोबर : जगभरात दिवसेंदिवस कोरोनाचा (coronvirus) विळखा अधिक घट्ट होत आहे. याच दरम्यान कोरोनाची लस (coron vaccine) कधी येणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अखेर केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन (Health Minister Dr Harsh Vardhan) यांनी आपल्या सर्वांना पडलेल्या या प्रश्नाचं उत्तर दिलं. आहे. जुलै 2021 पर्यंत भारतातील कोट्यवधी लोकांपर्यंत कोरोना लस पोहोचवण्याचं लक्ष्य असल्याचं आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं.
आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी कोरोना लशीबाबत सविस्तर माहिती दिली. भारतात 400-500 दशलक्ष डोस देण्याची सरकारची योजना आहे. जवळपास 20-25 कोटी लोकांपर्यंत जुलै 2021 पर्यंत ही लस देण्याचं लक्ष्य आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांना सर्वात आधी लस दिली जाणार असल्याचं आरोग्यमंत्र्यांनी सांगतिलं. तसंच कोणत्या लोकांना सर्वात आधी लस दिली जावी, याबाबत राज्यांकडूनही ऑक्टोबरअखेरपर्यंत सूचना मागवल्या असल्याचं त्यांनी सांगितलं.
There is a high-level expert body going into all aspects of vaccines. Our rough estimate and the target would be to receive and utilise 400 to 500 million doses covering approximately 25 crore people by July 2021: Union Health Minister Dr Harsh Vardhan in his 'Sunday Samvaad' https://t.co/05gmMzzAq1
सीरम इन्स्टिट्यूट आणि ऑक्सफोर्डची लस, भारत बायोटेक आणि जॉन्सन अॅण्ड जॉनन्स या तीन कंपन्यांकडून जगाला खूप अपेक्षा आहेत. या लशीबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे. मात्र भारतात लस कधी उपलब्ध होणार आणि सर्वात आधी कुणाला मिळणार यासंदर्भात अधिकृतपणे आज केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन माहिती देणार आहेत.
ICMR-भारत बायोटेक कंपनीने तयार केलेल्या Covaxin या लशीची सध्या दुसऱ्या टप्प्यात चाचणी सुरू आहे. झायडस कॅडिलाचा ZyCov-D या लशीची सध्या मानवी चाचणी सुरू असून त्याचं परीक्षण नोंदवण्याचं काम सुरू आहे. ऑक्सफोर्ड-अॅस्ट्रॅजेनेका आणि सीरमने तयार केलेली Covishield या लशीची सध्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू आहे.