2019मधील व्हॉटसअपचे नवीन फिचर्स; कसे वापराल हे फिचर्स
व्हॉट्सअॅप वापरणाऱ्यांसाठी लवकरच दोन नवीन फिचर्स येणार आहेत. सध्या आयफोन धारक हे फिचर्स वापरू शकतात. पण, अॅड्राईड मोबाईल असलेल्यांना मात्र काही काळ वाट पाहावी लागणार आहे.
2019मध्ये व्हॉट्सअॅपनं नवीन फिचर्स आणले आहेत. ग्रुप कॉलिंग शॉर्टकट आणि फेस लॉक अथवा टच आयडी. या दोन्ही फिचर्सची टेस्टिंग सध्या सुरू आहे. लवकरच हे फिचर्स युजर्सना वापरता येणार आहे.
ग्रुप कॉलिंग शॉर्टकट करता एका नव्या बटनाची व्यवस्था करण्यात आली आहे. या बटनाच्या मदतीनं तुम्ही एका पेक्षा जास्त जणांना कॉल करू शकता. पण, यासाठी अॅन्ड्राईड धारकांना मात्र काही काळ वाट पाहावी लागेल.
तुमचा व्हॉट्सअॅप कॉल रिसिव्ह झाल्यानंतर उजव्या बाजुला Add Person म्हणून लिहिलेलं असेल त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही आणखी एकाला अॅड करू शकता.
दुसरं महत्त्वाचं फिचर म्हणजे फेस लॉक किंवा फिंगर प्रिंट. यामुळे तुमची चॅटींग सुरक्षित राहणार आहे. कारण चेहरा पाहून किंवा फिंगर प्रिंटशिवाय तुमची चॅटींग ओपन होणार आहे. लवकरच WhatsAppच्या Privacy settingमध्ये Require Touch ID हा पर्याय येईल.
सध्या दोन्ही फिचर्स iOS युजर्ससाठी आहेत. तुमच्याकडे iPhone X किंवा नवीन आयफोन असेल तर तुम्हाला Face ID हा पर्याय दिसेल. तसेच तुमच्याकडे जर जुना आयफोन असेल तर तुम्हाला Touch ID किंवा पासकोडचा पर्याय मिळेल.