मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

तुमच्या पायांचे बोट तुमच्या व्यक्तीमत्वाबद्दल काय सांगतात? वाचा सविस्तर

तुमच्या पायांचे बोट तुमच्या व्यक्तीमत्वाबद्दल काय सांगतात? वाचा सविस्तर

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

जर तुम्हालाही स्वत:बद्दल अधिक जाणून घेण्याची उत्सुकता असेल, तर चला पाहूया तुमच्या पायांची बोट तुमच्या व्यक्तीमत्वाबद्दल काय सांगतात.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Devika Shinde

मुंबई 05 नोव्हेंबर : जोतिषशास्त्रा आणि समुद्रशास्त्राला अनेक लोक मानतात. याचा त्यांच्या आयुष्यावर परिणाम होतो असं देखील त्यांचं म्हणणं असतं. लोक आपल्या शरिरावरील तिळ आणि तळहाताच्या रेषांबद्दल जाणून घेतात. कारण ते त्यांचं भविष्य आणि व्यक्तिमत्वाबद्दल सांगतात. पण तुम्हाला माहितीय का की तुमच्या पायांची बोट देखील तुमच्या व्यक्तीमत्वाबद्दल खूप काही सांगतात.

अशा परिस्थितीत जर तुम्हालाही स्वत:बद्दल अधिक जाणून घेण्याची उत्सुकता असेल, तर चला पाहूया तुमच्या पायांची बोट तुमच्या व्यक्तीमत्वाबद्दल काय सांगतात.

हे ही वाचा : विवाहित लोक विवाहबाह्य संबंधांत का अडकतात? ही आहेत ३ मोठी कारणं

प्रतिकात्मक फोटो

1. ग्रीक टो

सर्वात सामान्य लोकांचे पाय हे ग्रीक टो म्हणून ओळखले जाते. ग्रीक टो म्हणजे अंगठ्याच्या पुढचा बोट सर्व बोटांपेक्षा सर्वात मोठे आहे. या प्रकारच्या पायाला फ्लेम फूट किंवा फायर फूट असेही म्हणतात.

ज्यांच्या पायाची बोट याबद्दतीचे आहे, ते स्वभावाने खूप सक्रिय आणि धैर्यवान आहेत. नवीन साहस आणि कार्ये करण्यास ते नेहमीच तयार असतात. हे लोकही खूप सर्जनशील असतात आणि त्यांच्यात नेतृत्वगुण असतात.

2. किसान टो (Peasant Toe)

कमी-अधिक प्रमाणात समान लांबीच्या बोटांना किसान टो असं म्हणतात. या प्रकारचे पाय असलेले लोकांचे पाय सामान्यत: लहान असतात आणि सर्व बोटे समान आकाराची असतात. व्यक्तिमत्त्वाचा विचार केला तर अशा लोकांमध्ये खूप संयम असतो, असं म्हटलं जातं.

या संयमाचा वापर करून हे लोक आपले ध्येय सहज साध्य करू शकतात. तसेच हे लोक सर्वात विचारशील लोक आहेत. प्रेमाच्या बाबतीतही ते अतिशय प्रामाणिक आणि एकनिष्ठ मानले जातात.

3. इजिप्शियन टो (Egyptian Toe)

अशा लोकांचे पाय सर्वात लांब असतात, तसेच त्यांच्या पायाचे बोट देखील लांब असतात. पण एकानंतर एक असलेल्या बोटांचा आकार लहान असतो.

या लोकांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल बोलायचं झालं तर अशा लोकांना दुसरे लोक लगेच पसंत करतात. हे लोक सहजपणे मित्र बनवतात. तसेच जे लोक कोणाचा फायदा घेऊ पाहात असतील किंवा अति शहाणपणा करण्याचा प्रयत्न करत असतील तर अशा लोकांशी कसं वागावं हे देखील त्यांना माहित असतं.

रोमन टो (Roman Toe)

या पद्धतीच्या पायाची पहिली तीन बोटे समान उंचीची असतात आणि उर्वरित बोटांचा आकार कमी होत जातो. अशा प्रकारची बोटे असलेल्या व्यक्तीला संतुलित व्यक्तिमत्त्व असे म्हणतात. हे लोक साहसी आहेत आणि त्यांना अशाच पद्धतीचे काम करायला आवडते.

या लोकांना नवीन ठिकाणे आणि संस्कृतीचा शोध घेणे आवडते. त्यांना शिकण्याची सवय असते. हे लोक प्रत्येक आव्हानाला अतिशय धैर्याने सामोरे जातात.

5. वाईड सेट पायाचे बोट (wide Set Toe)

ज्या लोकांच्या पायाच्या बोटांमध्ये अंतर असते त्यांना वाईड सेट पायाचे बोट म्हणतात. अशा लोकांना प्रवास करण्याची हौस असते. हे लोक स्वभावाने खूप रोमँटिक असतात आणि त्यांना प्रवासाची आवड असते. ते खूप स्वप्न पाहणारे देखील आहेत आणि केवळ रोमांचकच नाही तर व्यावहारिक असलेल्या भिन्न परिस्थिती विचारात ते करु शकतात. त्यांचा हाच स्वभाव त्यांना आजूबाजूच्या लोकांशी चांगले जुळवून घेण्यास मदत देखील करतो.

6. स्ट्रेच्ड टो

ज्या लोकांची बोटे इतर बोटांपासून खूप दूर असतात. असे लोक स्वतंत्र असतात. समाजाने घालून दिलेल्या मर्यादेच्या अधीन किंवा मर्यादित राहणे त्यांना आवडत नाही. हे लोक चांगले श्रोते असतात आणि कमी बोलतात.

विशेष सूचना:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.

First published:

Tags: Lifestyle, Marathi news, Rashibhavishya