भारत-पाकिस्तानात आण्विक युद्ध झालं तर जाणून घ्या जगाचं किती होईल नुकसान!

आण्विक युद्धाचा परिणाम फक्त माणसांवरच नाही तर पर्यावरणावरही होईल.

  • Share this:

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी संयुक्त राष्ट्राच्या भाषणात भारताला अण्वस्त्रांची धमकी दिली होती. या धमकी नंतर प्रसिद्ध अडवान्स सायसेज या वेबसाइटने अण्वस्त्रांवर एक लेख लिहिला होता. तसेच भारत आणि पाकिस्तानात जर आण्विक युद्ध झालं तर या दोन देशांसह जगाचं किती नुकसान होईल याचा तपशील रिपोर्ट दिला होता.

रिपोर्टनुसार भारताने 100 आणि पाकिस्तानने 150 स्ट्रॅटेजिक शस्त्रांचा वापर शहरी भागांमध्ये केला तर कमीत कमी 5 ते 12.5 कोटी नागरिकांचे प्राण जाऊ शकतात.

या युद्धाचा परिणाम फक्त माणसांवरच नाही तर पर्यावरणावरही होईल. आण्विक युद्धानंतर 15-30 टक्के पाऊस कमी होईल. तर युद्धानंतर जमिनीचं तापमान 2 ते 5 अंश सेल्सियसने कमी होईल.

रिपोर्टनुसार एवढा कार्बनचा धूर तयार होईल की 20-25 टक्के सूर्यकिरण जमिनीवर कमी पडतील. जमिनीतील सत्त्व कमी होतील आणि 15 ते 30 टक्के पिक कमी होईल. या हल्ल्यानंतर जमिनीला सावरायला किमान 10 वर्ष लागतील.

आकाश आणि जमिनच नाही तर पाण्यावरही या आण्विक युद्धाचा परिणाम होताना दिसेल. या हल्ल्यामुळे 5 ते 15 टक्के जलजीवन भूकबळीने मरतील. तर पर्यावरणात 16 ते 36 टेराग्राम काळा कार्बन तयार होईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 9, 2019 07:22 PM IST

ताज्या बातम्या