मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

फक्त एका सेकंदासाठी पृथ्वीचं फिरणं थांबलं तर काय होईल? विचारही केला नसेल असा भयंकर विद्ध्वंस

फक्त एका सेकंदासाठी पृथ्वीचं फिरणं थांबलं तर काय होईल? विचारही केला नसेल असा भयंकर विद्ध्वंस

अमेरिकेतले प्रसिद्ध खगोल भौतिकशास्त्रज्ञ ( Astrophysicist) नील टायसन (Neil Tyson) यांनी याविषयी संशोधन केलं आहे.

अमेरिकेतले प्रसिद्ध खगोल भौतिकशास्त्रज्ञ ( Astrophysicist) नील टायसन (Neil Tyson) यांनी याविषयी संशोधन केलं आहे.

अमेरिकेतले प्रसिद्ध खगोल भौतिकशास्त्रज्ञ ( Astrophysicist) नील टायसन (Neil Tyson) यांनी याविषयी संशोधन केलं आहे.

वॉशिंग्टन, 25 ऑगस्ट : पृथ्वीचं (Earth revolution and earth rotation) परिवलन (स्वतःभोवती फिरणं) आणि परिभ्रमण (सूर्याभोवती फिरणं) ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. दिवस-रात्र या दोन्ही गोष्टी पृथ्वीचं परिवलन आणि परिभ्रमणावर अवलंबून आहेत. पृथ्वीच्या या खगोलशास्त्रीय बाबीविषयी मोठ्या प्रमाणावर संशोधन (Research) झालं आहे आणि अजूनही सुरू आहे. पृथ्वी ही तिच्या अक्षाभोवती फिरते आणि 23 तास 56 मिनिटं आणि 4.1 सेकंदांमध्ये तिची स्वतःभोवतीची प्रदक्षिणा पूर्ण करते, हे आपण जाणतो. पृथ्वीचं परिवलन आणि परिभ्रमण एका सेकंदासाठी जरी थांबलं, तरी त्याचे परिणाम खूप भयावह होतील. अमेरिकेतले प्रसिद्ध खगोल भौतिकशास्त्रज्ञ ( Astrophysicist) नील टायसन (Neil Tyson) यांनी याविषयी संशोधन केलं आहे. याबाबतचं वृत्त `आज तक`ने दिलं आहे. जाणून घेऊ या टायसन याबद्दल काय म्हणतात...

पृथ्वीचं परिवलन आणि परिभ्रमण सर्वच घटकांसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. काही सेकंदासाठी जरी ही क्रिया थांबली, तर पृथ्वीवर अत्यंत भयावह स्थिती निर्माण होऊ शकते, असं अमेरिकी खगोल-भौतिकशास्त्रज्ञ नील टायसन यांनी टीव्ही आणि रेडिओ पर्सनॅलिटी लॅरी किंग (Lary King) यांच्याशी बोलताना सांगितलं. यापूर्वी टायसन यांनी केलेलं ट्विटही असंच चर्चेत आलं होतं. अॅमेझॉनचे (Amazon) संस्थापक जेफ बेझॉस यांच्या 200 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीतून 180 वेळा पृथ्वी प्रदक्षिणा करता येऊ शकते. तसंच या संपत्तीतून 30 वेळा पृथ्वी ते चंद्र असा प्रवास करता येऊ शकतो, असं विधान त्यांनी ट्विटद्वारे केलं होतं. याशिवाय प्रसिद्ध उद्योगपती रिचर्ड ब्रॅनसन यांनी कधीही अंतराळयात्रा केली नसल्याचा दावा टायसन यांनी केला होता. टायसन म्हणतात, की ते उपकक्षेत गेले होते. नासाने (NASA) 60 वर्षांपूर्वी अॅलन शेपर्ड नावाच्या व्यक्तीला या ठिकाणी पाठवलं होतं. ते अंतराळ नव्हे. परंतु, त्याला अंतराळ म्हणत असाल तर त्यास आपला विरोध नाही, असं टायसन यांनी सांगितलं. रिचर्ड जिथं पोहोचले होते तिथं सामान्य माणूस पोहोचलेला नाही, यात अजिबात शंका नाही. रिचर्ड जितक्या दूरवर पोहोचले होते तिथून पृथ्वीचं चांगलं दृश्य दिसू शकतं. परंतु, त्याला अंतराळ म्हणणं चुकीचं ठरेल.

सॅलरी स्लिपकडे कधीही करू नका दुर्लक्ष; या महत्त्वाच्या गोष्टींबद्दल मिळते माहिती

यापूर्वी अशा विविध वक्तव्यांमुळे चर्चेत आलेले टायसन 9 वर्षांचे असताना एकदा अमेरिकेतल्या म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री येथे गेले होते. त्यानंतर त्यांना खगोलशास्त्राची आवड निर्माण झाली. त्यानंतर त्यांनी 1980 मध्ये हार्वर्ड युनिव्हर्सिटीतून पदवी आणि 1983 मध्ये युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सास येथून अॅस्ट्रोनॉमी विषयातून पदव्युत्तर पदवी घेतली.

पृथ्वीने आपलं परिवलन आणि परिभ्रमण थांबवलं तर मोठी भयानक स्थिती निर्माण होऊ शकते, असं नमूद करताना टायसन म्हणाले, की आपण सर्व जण पृथ्वीसोबत पूर्व दिशेकडे फिरत आहोत. खरं तर पृथ्वी 800 मैल प्रतितास वेगाने आपल्या कक्षेत फिरत आहे आणि आपण सर्व जण तिच्यासोबत फिरत आहोत. आपल्याला मात्र हे जाणवत नाही. परंतु, पृथ्वीचं फिरणं थांबले तर आपल्याला जीव गमवावा लागू शकतो.

भारतानं केली कमाल! या क्षेत्रात जागतिक महाशक्ती अमेरिकेलाही टाकलं मागे

नागरिक खिडक्यांमधून बाहेर फेकले जाऊ शकतात. ही स्थिती अगदी कार अपघाताप्रमाणे असू शकेल. कारचा वेग खूप असेल आणि त्यामधल्या प्रवाशांनी सीट बेल्ट लावला नसेल आणि त्यात कारला अपघात (Car Accident) झाला तर प्रवासी कसे बाहेर फेकले जातील, अगदी तशीच परिस्थिती पृथ्वीचं फिरणं थांबलं तर निर्माण होईल, असं टायसन यांनी स्पष्ट केलं.

First published:

Tags: Earth, Science