कोरोना विषाणूच्या साथीने लोकांना मास्क वापरणे अनिवार्य झाले आहे. मास्क जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. कोविड-19 पासून वाचायचे असेल तर मास्क घालणे सक्तीचे आहे. मात्र मास्क घातल्याने अनेकांना श्वास घ्यायला त्रास होतो. जे फुफ्फुसासाठी हानिकारक ठरू शकतं.
myupchar.com चे एम्सशी संबंधित डॉ. अजय मोहन यांनी सांगितलं, पूर्णवेळ मास्क घालून राहता येणं कुणालाच शक्य नाही याविषयी दुमत असू शकत नाही. अनेकांना मास्क घातल्याने श्वास घायला त्रास होतो, विशेषतः त्यांना जे श्वसन संबधी आजारांनी ग्रासले आहेत. सगळ्यांनी शाळेतील विज्ञानाच्या तासाला ऐकले आहे की शरीर ऑक्सिजन घेतं आणि कार्बन डायऑक्साईड सोडून देते. फुफ्फुस ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड यांचं आदान-प्रदान करतं, जे शरीराचे महत्वाचे अंग आहे. जेव्हा खूप वेळ मास्क घातला जातो तेव्हा कार्बन डायऑक्साइड बाहेर टाकण्याच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण होतो, जे फुफ्फुसांसाठी हानिकारक आहे. पण हे तेव्हाच त्रासदायक आहे जेव्हा मास्क जास्त घट्ट असतो आणि दीर्घकाळ वापरला जातो.
myupchar.com चे एम्सशी संबंधित डॉ. नबी वली म्हणाले, जेव्हा फुफ्फुस रोगग्रस्त होतात तेव्हा ते कार्बन डायऑक्साइड बाहेर टाकण्याचे आणि योग्य प्रमाणात ऑक्सिजन ग्रहण करण्याचे काम करू शकत नाहीत. म्हणून फुफ्फुसांना मजबूत करायला हवं. श्वासावरील उत्तम नियंत्रण कुठल्याही स्वास्थ्य समस्येचा सामना करण्याचा धोका कमी करते. जाणून घेऊ फुफ्फुसांना मजबूत करण्याचे सोपे उपाय-
डायाफ्रामिक ब्रीदिंग (पोटाच्या सहाय्याने श्वसन)
डायाफ्रामिक ब्रीदिंग म्हणजेच पोटाच्या स्नायूंच्या सहाय्याने श्वसन फुफ्फुसांची क्षमता वाढवण्यासाठी केले जाते. त्यात पोटाच्या स्नायूंचा उपयोग करतात. या क्रियेत नाकाने श्वास घेतला जातो आणि तोंडावाटे बाहेर सोडला जातो. डायफ्राम श्वास घेण्यास मदत करतो. म्हणजेच कमजोर डायाफ्राम श्वास घेण्याच्या त्रासाचे कारण बनू शकतो. या प्रकारची श्वासाची क्रिया क्रिया क्रॉनिक ऑब्सट्रक्टिव पल्मनरी डिसीजच्या लोकांना लाभदायक ठरते.
नियमित व्यायाम
नियमित व्यायामाने स्नायूंची शक्ती वाढते आणि कार्य सुधारते जेव्हा आपण व्यायाम करतो तेव्हा स्नायूंना कमी प्रमाणात ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साइडची गरज पडते, त्याने फुफ्फुसांना चांगले काम करण्यास मदत होते.
भरपूर पाणी प्या
आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी शरीरातील पाण्याची पातळी चांगली असणे जरूरी आहे. दिवसभर पाणी प्यायल्याने फुफ्फुसांमध्ये आर्द्रता राहते, त्याने फुफ्फुसे मजबूत राहण्यास मदत होते.
उठण्या-बसण्याच्या योग्य पद्धती
योग्य प्रकारे आपण उठलो-बसलो, उभे राहिलो तर फुफ्फुसे मजबूत राहतात. अयोग्य पद्धतीची मुद्रा श्वसनामध्ये अडथळा निर्माण करते. जेव्हा फुफ्फुसांच्या कार्यात सुधार करण्याचा विचार येतो तेव्हा योग्य मुद्रा असणे महत्वाचे आहे. उभे राहताना किंवा बसताना वाकू नका. त्याऐवजी पाठ सरळ ठेवून बसा, उभे राहताना छाती पुढे काढा.
अधिक माहिती साठी वाचा आमचा लेख - श्वसनाचा त्रास
न्यूज18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या, विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत. myUpchar.com या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार, डॉक्टरांच्या सोबत काम करून, आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Covid19, Health, Mask