• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • Plant based diet: मायग्रेनपासून होईल सुटका, आहारात या गोष्टींचा करा समावेश

Plant based diet: मायग्रेनपासून होईल सुटका, आहारात या गोष्टींचा करा समावेश

दीर्घकालीन मायग्रेनच्या समस्येनं ग्रस्त असलेल्या लोकांची दिलास मिळू शकतो, असं एक संशोधन प्रसिद्ध झालं आहे. काय खाल्लं तर डोकेदुखी वाढते आणि कशाने कमी होऊ शकते? वाचा सविस्तर

 • Share this:
  नवी दिल्ली, 23नोव्हेंबर : वनस्पती-आधारित आहारामुळे दीर्घकालीन मायग्रेनच्या समस्येनं ग्रस्त असलेल्या लोकांची दिलास मिळू शकतो, असं अलीकडेच डॉक्टरांनी म्हटलं आहे. हिरव्या पालेभाज्यांचा भरपूर आहार घेतल्यास मायग्रेनच्या तीव्र लक्षणांना नियंत्रित केली जाऊ शकतात. यासह मायग्रेनवर उपचारही करता येतात आणि इतर अनेक समस्या टाळता येतात, असं डॉक्टरांनी सांगितलंय, असं झी न्यूजच्या बातमीत म्हटलं आहे. मायग्रेनवरचं हे अशा प्रकारचं पहिलंच संशोधन असल्याचा (Plant based diet) दावा डॉक्टरांनी केलाय. काय सांगतं संशोधन हे संशोधन 'बीएमजे केस रिपोर्ट्स जर्नल'मध्ये ऑनलाइन प्रकाशित करण्यात आलंय. संशोधनात 12 वर्षांहून अधिक काळ मायग्रेनच्या डोकेदुखीचा सामना करणाऱ्या व्यक्तीवर उपचार करण्यात आले. यावेळी, त्यांनी या व्यक्तीला मायग्रेनसाठी (झोलमिट्रिप्टन आणि टोपिरामेट) लिहून दिलेली औषधं देऊन उपचार करण्याचा प्रयत्न केला. याशिवाय, रुग्णाला चॉकलेट, चीज, नट्स, कॅफिन आणि मायग्रेनला कारणीभूत असलेल्या ड्राय फ्रूट्सपासून दूर ठेवण्यात आलं होतं. यासोबतच योगासनं आणि ध्यानही केलं गेलं. पण वारंवार होणारा मायग्रेनचा त्रास आणि तीव्र गंभीर स्वरूपाचा मायग्रेन बरा होत नव्हता. यानंतर, जेव्हा त्या व्यक्तीला हिरव्या भाज्या आणि वनस्पती-आधारित आहार दिला गेला तेव्हा त्यांना मायग्रेनमध्ये फरक जाणवू लागला. हे वाचा - Itchy Ears: कानाला वारंवार खाज सुटण्यामुळे त्रस्त झालाय? या घरगुती उपायांनी लगेच मिळवा आराम काय म्हणतात संशोधक संशोधकांच्या म्हणण्यानुसार, निर्धारित औषधं मायग्रेनच्या परिस्थितीस प्रतिबंध आणि उपचार करण्यात मदत करू शकतात. परंतु, काही विशिष्ट आहार कोणत्याही दुष्परिणामांशिवाय एक प्रभावी पर्याय असू शकतो. असे केले उपचार? संशोधनात असं आढळून आलंय की, पालकासारख्या हिरव्या पालेभाज्यांचा वापर केल्यामुळं मायग्रेनमुळं होणारी जळजळ, ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी होऊ शकतो. डॉक्टरांनी या व्यक्तीला दररोज कमी दाहक पदार्थ (LIFE DIET) खाण्यास सांगितलं. आहारात दररोज सुमारे दीडशे ग्रॅम कच्च्या किंवा शिजवलेल्या हिरव्या भाज्यांचं सेवन करण्यास सांगण्यात आलं. याशिवाय, दररोज सुमारे 800-900 ग्रॅम कमी दाहक पदार्थ स्मूदीच्या स्वरूपात खाण्यास सांगितलं. याशिवाय, अखंड धान्यं, पिष्टमय भाज्या, तेल, प्राणीजन्य प्रथिनं, विशेषतः दुग्धजन्य पदार्थ आणि लाल मांस यांचं सेवन टाळलं गेलं. हे वाचा - भयंकर! तरुणाने मगरीच्या जबड्यात घातलं आपलं डोकं आणि…; VIDEO पाहून अंगावर येईल काटा संशोधनाचे निष्कर्ष दोन महिन्यांनी लो इन्फ्लेमेटरी फूड (LIFE DIET) आहार घेतल्यानंतर, वारंवार होणारा मायग्रेनचा त्रास आता महिन्यातून एकदाच होत असल्याचं या व्यक्तीनं नोंदवलं. तसंच, खूप दिवस होत राहणारी मायग्रेनची डोकेदुखी काही वेळात बरी होत असून पूर्वीसारखी गंभीर स्थिती नाही, असंही समोर आलं. रुग्णानं मायग्रेनची सर्व औषधं घेणं बंद केलं होतं. तीन महिन्यांनंतर, या रुग्णाचा मायग्रेन पूर्णपणे बरा झाला आणि तो 7.5 वर्षांपर्यंत परत आला नाहीत, असं डॉक्टरांनी सांगितलं. (सूचना: या लेखात दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
  Published by:News18 Desk
  First published: