नवी दिल्ली, 15 जानेवारी : कोरोना संकटाच्या (Corona in India) काळात घरातील एखाद्या सदस्याला कोरोना झाला किंवा घरातील मुलाला कोरोनाची लागण (Corona Infection) झाली, तर आई-वडील त्याची काळजी कशी घेणार? काही लोकांचा प्रश्न आहे की, जर पालकांना कोरोना झाला तर त्यांना किती दिवस मुलांपासून दूर एकांतात राहावे लागेल. या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी, CNN च्या वैद्यकीय विश्लेषक डॉ. लीना वेन यांचे काय म्हणणे आहे ते जाणून घेऊया. डॉ. लीना वेन या जॉर्ज वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी मिल्कन इन्स्टिट्यूट स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ येथे आपत्कालीन चिकित्सक आणि आरोग्य धोरण आणि व्यवस्थापनाच्या प्राध्यापक आहेत. याविषयी आज तकने माहिती दिली आहे.
प्रश्न: आइसोलेशन आणि क्वारंटाईन यात काय फरक?
उत्तरः डॉ. लीना म्हणतात की आइसोलेशन आणि क्वारंटाईन यात मोठा फरक आहे. तुम्ही कोरोना पॉझिटिव्ह असल्याची चाचणी केल्यानंतर तुम्हाला समजल्यावर आइसोलेशन आवश्यक आहे. त्याच वेळी, जेव्हा तुम्ही कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आलात तेव्हा क्वारंटाईन केले जाते, परंतु तुम्हाला कोरोनाची लक्षणे दिसत नाहीत किंवा तुमचा कोविड अहवाल येणे बाकी आहे, अशावेळी तुम्हाला क्वारंटाईनमध्ये राहावे लागेल.
प्रश्नः कुटुंबातील एखाद्या सदस्याला किंवा पालकांना कोरोना झाला तर काय करावे?
उत्तरः जर कुटुंबातील एखाद्या सदस्याला कोरोनाची लागण झाली असेल, तर त्या व्यक्तीला ताबडतोब इतरांपासून वेगळे केले पाहिजे. घरातील बाकीच्या लोकांचीही ताबडतोब चाचणी झाली पाहिजे. घरातील इतर सदस्यांनाही याची लक्षणे दिसू शकतात.
प्रश्नः मुलांना कोरोना झाला आणि कुटुंबातील इतर सदस्यांना कोरोना झाला नाही तर काय करावे? मग त्यांची काळजी कोणी घ्यायची?
उत्तरः डॉ. लीना म्हणतात की, हा खूप कठीण काळ आहे. विशेषतः जर तुमचे मूल लहान असेल. ते स्वतःची काळजी घेऊ शकत नसेल, अशा परिस्थितीत, पालकांपैकी एकानेच मुलाची काळजी घेणे आवश्यक आहे. यासाठी तुमचे लसीकरण झालेले असायला हवे आणि तुम्ही पूर्णपणे निरोगी असायला हवे. या परिस्थितीत, संक्रमित मुलाच्या सर्व गोष्टी वेगळ्या करा. जेणेकरून घरातील बाकीचे लोक त्याच्या वस्तूंच्या संपर्कात येऊ शकत नाहीत. संक्रमित मुलाला वेगळ्या खोलीत ठेवा, त्याचप्रमाणे त्याचे स्नानगृह देखील वेगळे असावे. कोरोना बाधित मुलाची काळजी घेताना, हे लक्षात ठेवा की तुम्ही 24 तास मास्क लावा, जेणेकरून तुम्हाला संसर्ग टाळता येईल.
हे वाचा - लघवीच्या समस्येशिवाय किडनी खराब होण्याची अशी असतात लक्षणं; त्याकडे दुर्लक्ष पडेल महागात
तुम्ही एकटे पालक असाल तर परिस्थिती आणखी खडतर असू शकते. अशा परिस्थितीत घरात पुरेशी वायुवीजन असणे आवश्यक आहे. घराचे दरवाजे, खिडक्या उघड्या असाव्यात. तसेच, वेळोवेळी हात धुत राहा.
प्रश्न: आइसोलेशन अर्थ असा होतो का की आम्हाला पूर्ण वेळ आत खोलीत राहावे लागेल? बाहेर जाऊन फ्रेश हवा घेऊ शकतो का?
उत्तरः आइसोलेशनचा अर्थ असा नाही की तुम्ही संपूर्ण वेळ खोलीत बंद राहावे आणि इतरांपासून दूर राहावे. जर तुम्ही घर, टाउनहाऊस किंवा अपार्टमेंटमध्ये राहत असाल तिथे तुम्हाला ताजी हवा मिळत नसेल, तर तुम्ही बाहेर जाऊ शकता. पण काळजी घ्या की तुम्ही कोणाच्या संपर्कात येणार नाही. इतरांपासून अंतर ठेवा आणि बंद ठिकाणी लोकांसोबत राहू नका.
हे वाचा - आहारात या गोष्टी खाणं आजच थांबवा; प्रतिकारशक्ती दुबळी बनवण्यावर करतात थेट परिणाम
प्रश्नः कोरोनाबाधित व्यक्तीने किती काळ आइसोलेशनमध्ये राहावे?
उत्तरः सीडीसीने त्यांच्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांमध्ये आइसोलेशन कालावधी 10 दिवसांवरून 5 दिवसांपर्यंत कमी केला आहे. याचा अर्थ असा आहे की, पहिले पाच दिवस तुम्ही पूर्णपणे वेगळे राहावे. यानंतर तुम्ही बाहेर जाऊ शकता, परंतु लक्षात ठेवा की बाहेर जाताना चांगल्या दर्जाचा मास्क घाला. तसेच, लोकांपासून योग्य अंतर ठेवा. तुम्ही मोठ्या कुटुंबासोबत राहत असाल तर तुम्ही 10 दिवस आयसोलेशनमध्ये राहावेच. हे 10 दिवस कुटुंबातील सदस्यांसोबत बसून अन्न खाऊ नका. एकाच घरात राहूनही मास्क लावा. शक्य असल्यास, स्वतंत्र स्नानगृह वापरा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona, Coronavirus, Health Tips