Corona vaccination : कोरोना लस घेतल्यानंतर साइड इफेक्ट दिसल्यास काय करावं?

Corona vaccination : कोरोना लस घेतल्यानंतर साइड इफेक्ट दिसल्यास काय करावं?

कोरोना लसीकरणानंतर (Corona vaccination) काय काळजी घ्यायला हवी जाणून घ्या.

  • Share this:

मुंबई, 07 मे : कोरोनाचा प्रकोप वाढत असताना कोरोना लसीकरणाची (vaccination) मोहीमही जोरात सुरू आहे. याआधी कोरोना लसीकरण केवळ 45 वयापेक्षा जास्त वय असलेल्यांसाठीच होतं. मात्र आता सरकारच्या निर्णयानुसार 18 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्यांसाठीही कोरोनाचं लसीकरण सुरू होणार आहे. पण लशीचे काही सौम्य दुष्परिणामही दिसून येत आहेत.

देशात कोरोनाचं लसीकरण जानेवारी महिन्यात सुरू झालं आहे. लसीकरणानंतर काही साईड इफेक्टची तक्रार काहीजणांनी केली आहे. त्यामुळेच लसीकरणानंतर त्रास होत असेल तर, त्यातून बरं कसं व्हायचं हा प्रश्न आहे. त्यामुळेच कोरोना लसीकरणानंतर साईड इफेक्ट झाल्यासं बर कसं व्हायचं असी प्रश्न विचारला जात आहे. यासंदर्भात तज्ज्ञांचं मत काय आहे याबद्दल अमर उजालाने एम्स रुग्णालयाच्या डॉक्टर आयशी पाल यांच्या हवाल्याने माहिती दिली आहे.

लसीकरण केल्यावर लस घेतलेल्यांनी ताप येत असल्याची तक्रार केली आहे. ताप येण्याबरोबर अंग दुखीही जाणवते. डॉक्टरांच्या मते एखादी लस जेव्हा आपल्या शरीरात जाते तेव्हा आपलं शरीर त्यावर रिऍक्शन (Reaction) देतं. त्यावेळी पॅरसिटामोलसारख्या गोळ्या घेतल्यास थोडं बरं वाटतं. मात्र अशा प्रकारे पेन किलरचं सेवन योग्य नाही. त्यामुळेच कोणत्याही औषधाशिवाय हा त्रास कमी कसा कारायचा याची माहिती असायला हवी.

हे वाचा - पुण्यात रुग्णसंख्या कमी तरी धोका कायम! पुणेकरांनो या 7 गोष्टीच करतील तुमचा बचाव

जास्त ताप येत असेल तर, डोक्यावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवा. थंड पाण्याने अंग पुसण्यानेही फायदा होते.

थंडी वाजून ताप येत असेल, डोकं दुखत असेल तर, काही घरगुती उपाय किंवा काढे पिण्याने फायदा मिळतो.

कोरोना व्हॅक्सिनेशननंतर आपल्या आहाराकडे लक्ष द्या. हेल्दी डाएटमुळे साईड इफेक्ट कमी व्हायला मदत होईल.

थकवा जाणवत असेल तर पौष्टीक आहाराबरोबरच शरीरातील पाण्याची मात्रा चांगली रहावी यासाठी भरपूर पाणी प्या. नुसतं पाणी पिणं शक्य नसेल तर, लिंबू सरबत, ज्युस यांचं सेवन करा.

हे वाचा - कोरोनामुळे डोळ्यांवरही होतोय गंभीर परिणाम; कसा कराल बचाव जाणून घ्या

लसीकरणानंतर एक किंवा दोन दिवस त्याचे साईडइफेक्ट जाणवतात. पण जास्त त्रास जाणवला तर घरीच उपचार करण्याऐवजी डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध घ्या.

Published by: News18 Desk
First published: May 7, 2021, 10:15 PM IST

ताज्या बातम्या