मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /जोडीदाराने फसवणूक केल्यावर काय करायचं? जाणून घ्या

जोडीदाराने फसवणूक केल्यावर काय करायचं? जाणून घ्या

जोडीदाराने फसवणूक केल्यावर काय करायचं?

जोडीदाराने फसवणूक केल्यावर काय करायचं?

जोडीदाराच्या अविश्वासूपणाबद्दल कळणं हे एखाद्यासाठी भावनिकरित्या उद्ध्वस्त करणारं असू शकतं. अशा परिस्थितीत कशी प्रतिक्रिया द्यायची हे बऱ्याचदा आपल्याला समजत नाही, कारण यामुळे तुमच्या कुटुंबातील किंवा नातेसंबंधातील परिस्थिती खूप बदलू शकते.

पुढे वाचा ...
 • Trending Desk
 • Last Updated :
 • Mumbai, India

  मुंबई, 27 जानेवारी :  नात्यांमध्ये बरेचदा एखादा पार्टनर दुसऱ्याची फसवणूक करतो. आपल्या सभोवताली अशा अनेक घटना घडतात. खरं तर तुमचा जोडीदार तुमची फसवणूक करत आहे ही परिस्थिती स्वीकारणं खूप कठीण असतं. जोडीदाराच्या अविश्वासूपणाबद्दल कळणं हे एखाद्यासाठी भावनिकरित्या उद्ध्वस्त करणारं असू शकतं. अशा परिस्थितीत कशी प्रतिक्रिया द्यायची हे बऱ्याचदा आपल्याला समजत नाही, कारण यामुळे तुमच्या कुटुंबातील किंवा नातेसंबंधातील परिस्थिती खूप बदलू शकते. पण, तुमच्या जोडीदाराने फसवणूक केल्याचं समजल्यानंतर तुम्ही काय करायला हवं, याबद्दल आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. या संदर्भात ‘टाईम्स ऑफ इंडिया’ने वृत्त दिलंय.

  रडणं

  पार्टनर फसवतोय हे कळल्यावर शक्य तितकं रडणं ठीक आहे. कारण अशा परिस्थितीत तुमचा विश्वास आणि मन नाराज होतं. त्यामुळे रडणं स्वाभाविक आहे. रडण्याने तुम्ही कमजोर होत नाही, तर ते फक्त तुम्हाला मजबूत बनवते. कारण रडल्याने मन हलकं होतं, त्यामुळे तुम्हाला जितकं रडावं वाटतं, तेवढं रडून घ्या, ओरडून मन मोकळं करा.

  हेही वाचा - खरंच 'मेड फॉर इच अदर' असतात? रक्ताचं नातं नसलं तरी नवरा-बायकोचे चेहरे सारखे का दिसतात?

  जवळच्या लोकांशी संवाद साधा

  तुमच्या पार्टनरबदद्ल कळल्यानंतर तुम्ही तुमच्या जवळच्या लोकांशी संपर्क करण्याचा, त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करा. त्यांच्यावर विश्वास ठेवा आणि आपल्या भावना व्यक्त करा. अशा परिस्थितीला कसे तोंड द्यावं, याबद्दल त्यांचा सल्ला घ्या. त्यामुळे तुम्हाला बरं वाटेल, तसंच पुढे काय करावं, याबद्दल ते मार्गदर्शनही करू शकतात.

  परिस्थितीचं मूल्यांकन करा

  तुम्ही वस्तुस्थिती स्वीकारल्यावर हे सर्व का घडलं याचं मूल्यांकन करण्याचा प्रयत्न करा. तुमच्या जोडीदाराने तुमची फसवणूक का केली? जेव्हा त्याने तुमची फसवणूक केली तेव्हा त्याचा हेतू काय होता? या गोष्टीचा प्रत्येक अँगलने विचार करा.

  ही तुमची चूक नाही

  तुमच्या जोडीदाराने तुमची फसवणूक केल्यावर त्यात तुमची चूक आहे, असं वाटणं अगदी सामान्य आहे. तुम्हाला वाटेल की तुमच्या चुकांमुळेच तुमच्या जोडीदाराला दुसरं कुणीतरी आवडलं आहे, हे विचार येणं नॉर्मल आहे. पण, एक गोष्ट लक्षात घ्या की यात तुमची कोणतीही चूक नाही.

  तुम्ही काय करू शकता ते समजून घ्या

  परिस्थिती स्वीकारल्यानंतर, त्याचा सर्व अंगांनी विचार केल्यानंतर तुम्ही काय करू शकता, यावर विचार करा. तुम्हाला तुमच्या पार्टनरपासून वेगळं व्हायचं आहे की त्याला माफ करायचं आहे? यातला कोणता निर्णय तुम्ही घेणार आहात आणि तो निर्णय निवडल्यावर त्याचे तुमच्यावर, नात्यावर काय परिणाम होतील, याला विचार करा.

  First published:

  Tags: Lifestyle, Love