तुमची मुलंही गुडघे दुखत असल्याची तक्रार करत आहेत? डॉक्टरांनी सांगितलं यामागील कारण

तुमची मुलंही गुडघे दुखत असल्याची तक्रार करत आहेत? डॉक्टरांनी सांगितलं यामागील कारण

एखादा अपघात झालेला नसतानाही मुलांच्या गुडघ्यात वेदना (child knee pain) होत असतील किंवा गुडघ्याला सूज आली असेल तर पालकांना चिंता वाटते.

  • Share this:

मुंबई, 27 जुलै : अनेकदा वयस्कर व्यक्तींचे आणि जास्त शारीरिक हालचाल करत असणाऱ्या प्रौढ व्यक्तींची गुडघे दुखत (knee pain) असल्याची प्रकरणं आपण पाहिली आहेत. मात्र सध्या लहान मुलंही आपले गुडघे असल्याचं पालकांना सांगतात. त्यामुळे आपल्या मुलांना गुडघ्याची गंभीर समस्या तर नाही ना, अशी चिंता पालकांना पडते.

जर एखाद्या 10 वर्षांच्या मुलाचा अपघात झाल्याचा कोणताही इतिहास नाही आणि तरी त्याच्या गुडघ्यात वेदना होत असतील तर पालक घाबरतात. अचानक गुडघा सुजला असेल किंवा मुलास चालण्यास त्रास होत असेल तर पालक संधिवाताची शंका घ्यायला लागतात. मात्र लहान मुलांमधील ही गुडघेदुखी म्हणजे खरंच चिंतेचं कारण आहे का?

जर आपण गुडघेदुखीसाठी रुग्णाला त्यांच्या वयोगटाने विभागले तर आपल्याला तीन गट  मिळतील. यातील विस्तृत तीन प्रकारांमध्ये 0 ते 18 वयोगटातील मुलं, 19 ते 50 वयोगटातील प्रौढ आणि 50 वर्षापेक्षा अधिक वयाचे ज्येष्ठ नागरिक. लहान मुलांमध्ये आपण जी गुडघेदुखी पाहत आहोत ती तरुण मुलांना होणाऱ्या गुडघेदुखीपेक्षा भिन्न आहे.

हे वाचा - पावसाळ्यात स्नायूंच्या वेदनांनी हैराण; घरगुती उपायांनी मिळवा आराम

पुण्याच्या संचेती रुग्णालयातील सल्लागार ऑर्थरोस्कोपी आणि ऑर्थ्रोप्लास्टी सर्जन डॉ.सनी गुगळे यांनी सांगितलं, "लहान मुलांमधील हे गुडघेदुखी म्हणजे ग्रोथ पेन आहे. जेव्हा मूल वाढत्या वयात असते तेव्हा ते ग्रोथ स्पर्ट म्हणून ओळखल्या जाणार्‍या प्रक्रियेतून जात असतात . या टप्प्यात हाडांची लांबी वाढते ज्यामुळे त्याच वेळी हाडांच्या सभोवतालच्या उतींवर ताण येतो ज्यामुळे गुडघेदुखी आणि सूज येते. पायाची लांबी गुडघ्याभोवती वाढते आणि म्हणून लहान मुलांचे गुडघे दुखतात"

हे वाचा - पावसाळ्यात या कारणांनी मुलं आजारी पडतात; अशी घ्या काळजी

"मात्र या टप्प्यात पालकांना काळजी करण्याची गरज नाही. एमआरआय किंवा रक्त तपासणीसारख्या तपासणीची गरज नाही. मात्र तरी काळजी वाटत असल्यास पालकांनी डॉक्टरांना भेटावं आणि गुडघेदुखीचे काही इतर कारण तर नाही ना हे तपासून पाहावं. तुमच्या मुलांना होणारी गुडघेदुखी ही वाढीची वेदना आहे, असं डॉक्टरांनी सांगितलं तर मग पालकांनी काळजी करण्याची गरज नाही. ही वेदना नंतर आपोआप स्थिर होते", असंही डॉ. गुगळे म्हणाले.

Published by: Priya Lad
First published: July 27, 2020, 8:35 PM IST

ताज्या बातम्या