Elec-widget

मासिक पाळी येण्याआधी 'या' गोष्टी माहित असू द्या

मासिक पाळी येण्याआधी 'या' गोष्टी माहित असू द्या

पहिल्यांदा मासिक पाळी आली की मुली अगदी नाराज होऊन जातात. त्यांना मासिक पाळीबद्दल कोणीही सविस्तर माहिती देत नाही. पण त्यांना या सगळ्याबद्दल माहित असणं खूप महत्त्वाचं आहे.

  • Share this:

27 जानेवारी : वयानुसार महिलांच्या शरीरात बदल होणं हे नैसर्गिक आहे. त्यात मासिक पाळी येणं ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. पहिल्यांदा मासिक पाळी आली की मुली अगदी नाराज होऊन जातात. त्यांना मासिक पाळीबद्दल कोणीही सविस्तर माहिती देत नाही. पण त्यांना या सगळ्याबद्दल माहित असणं खूप महत्त्वाचं आहे. जाणून घ्या अशा काही गोष्टी ज्या मासिक पाळी येण्याआधी प्रत्येक मुलीला माहितं असणं महत्त्वाचं आहे.

- प्रत्येक पालकांनी त्यांच्या पाल्याशी त्यांच्या शरीरात होणाऱ्या बदलांविषयी माहिती दिली पाहिजे. मुलींच्या मासिक पाळीविषयी जनजागृती करणं त्याचबरोबर त्यांना सॅनिटरी नॅपकिन्सबद्दल माहिती असणं खूप महत्त्वाचं आहे.

- विशेषतः प्रत्येक आईने मुलीबरोबर त्यांचे अनुभव शेअर केले पाहिजे. एखाद्या गोष्टीची आधीच माहिती असली की त्यानं तिला त्रास होणार नाही.

- मुलीला खाण्याविषयी या दिवसांत कशी काळजी घ्यावी याबद्दल नक्की सांगा. सॅनिटरी पॅडचा वापर कसा करावा याबद्दलही माहिती देऊन ठेवा.

- मासिक पाळी दरम्यान इनफेक्शन टाळण्यासाठी स्वच्छता आणि साफ-सफाई कशी ठेवावी याबद्दल माहिती असू द्या.

Loading...

- मुलीला मासिक पाळी येण्याआधी किंवा आल्यानंतर डॉक्टरांकडून सल्ला नक्की घ्या.

- मासिक पाळी विषयी त्यांच्याशी निवांत गप्पा मारा. अस केल्याने त्यांना मासिक पाळी आल्यावर लाज येण किंवा मग सगळ्यांपेक्षा आपल्याला वेगळं समजणं अशा तक्रारी येणार नाहीत.

- अनेकांना मासिक पाळी पोटदुखी, अंगदुखी किंवा अनेक वेदना होतात. त्याबद्दलही त्यांना माहिती असू द्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 27, 2018 03:24 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...