कधी विचार केलाय का? आपल्याकडून खोटं का बोललं जातं? हे आहे कारण

कधी विचार केलाय का? आपल्याकडून खोटं का बोललं जातं? हे आहे कारण

लोक या कारणांसाठी खोटे बोलतात, काय सांगतो रिसर्च

  • Share this:

मुंबई, 09 फेब्रुवारी : झूट बोले कौवा काटे ही म्हण आपण ऐकली असेलच पण इतकं असूनही किंवा खोटं बोलण्यामुळे आपलं नुकसान होणार हे माहीत असूनही लोक वारंवार खोटं का बोलतात हा प्रश्न आपल्याला पडतो. कधीतरी आपल्यासोबतही हे घडतं. अगदी ऑफिसपासून घरापर्यंत आपली इच्छा नसेल तरीही आपल्याकडून खोटं बोललं जातं. तेव्हा आपल्या मनाला आपण हा प्रश्न कधी विचारतो का? की असं आपल्याकडून का घडलं? खोटं बोलण्यामागची कारणं एका अभ्यासातून समोर आली आहेत.

नुकत्याच एका संशोधनातून समोर आलेल्या माहितीनुसार या कारणांमुळे लोक जास्त खोटं बोलतात असं एक निदान समोर आलं आहे.

स्वत:ला खरं सिद्ध करण्यासाठी- अमेरिकन साइकोलॉजिकल असोसिएशनने केलेल्या संशोधनानुसार बऱ्याचवेळा आपण कसे बरोबर आहोत आणि स्वत:ला खरं सिद्ध करण्यासाठी खोट्याचा आधार घेतला जातो. उदा. एखादी गोष्ट किंवा प्रसंग सांगायचा असेल तर तो आपल्या पद्धतीनं आपण त्या परिस्थितीत कसे बरोबर होतो आणि मग आपल्यासोबत काय चुकीचं घडलं अशा पद्धतीनं अर्धसत्य किंवा असत्यही सांगितलं जातं.

हेही वाचा-'या' म्युझिकल अलार्मने तुमची मॉर्निंग होईल गूड, सुस्तीही होईल दूर

भीती- बऱ्याचवेळा आपल्याला भीती सतावत राहाते की आपण खरं बोलल्यानं होणारं नुकसान जे मोठं असेल तर त्यापेक्षा ते न बोललेलं बरं. बऱ्याचदा खरं बोलण्याची आणि पचवण्याची ताकद दोन्ही लोकांमध्ये नसेल तर त्याचा तोटाचं होतो.

सवय- लहानपणापासून छक्केपंजे करण्याची सवय असलेल्यांना खोटं बोलणं अवघड जात नाही. त्यांना सत्य पचवता येत नाही. हा त्यांचा प्रॉब्लेम असतो.

खोट बोलण्यामुळे होतं नुकसान

एका संशोधनातून असं समोर आलं आहे की खोटं बोलल्यानं आपलं शारीरिक आणि मानसिक दोन्ही नुकसान होतं. खोटं बोलण्यामुळे गळा खराब होतो, ताण येतो, चिडचिड होते, थकवा येतो, डोकेदुखी वाढते, यासोबतच बऱ्याचवेळा आजारी पडण्याची भीती असते.

ताणतणावामुळे बऱ्याचदा खोट बोलण्याचं प्रमाण वाढतं. त्यामुळे थकवा येतो असं युनिवर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियामध्ये झालेल्या संशोधनातून समोर आलं आहे.

हेही वाचा-'हा' प्रिंटर भरणार भाजलेल्या त्वचेचे घाव, त्वचेवरील डागही होणार गायब

First published: February 9, 2020, 12:27 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading