नवी दिल्ली, 08 डिसेंबर : आरोग्य (Health) चांगलं राखण्यासाठी सकस आहार घेणं आणि फिटनेस (fitness) राखणं आवश्यक आहे. काही सवयी सुधारणंही तितकंच महत्त्वाचं आहे. खरं तर, रोजच्या आयुष्यात आपण अशा काही चुका (mistakes) करत राहतो, ज्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात. पण त्यांच्याबद्दलच्या माहितीच्या अभावामुळं आपण नकळत त्यांची रोज पुनरावृत्ती करत असतो. ज्याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. आरोग्य चांगलं राहण्यासाठी या चुका टाळाव्या. जाणून घेऊ अशा कोणत्या चुका आहेत, ज्या तुम्ही-आम्ही रोज किंवा अनेकदा (Mistakes Should Be Avoided) नकळत करत राहतो.
जेवणानंतर लगेच फळ खाणं
अनेकजण जेवण केल्यानंतर लगेच फळं खातात. जेवल्यानंतर लगेच फळं खाण्यामुळं पचनक्रिया मंदावते. त्यामुळं पचन आणि पोटाशी संबंधित समस्या निर्माण होण्याचा धोका असतो. फळं खाणं आरोग्यासाठी फायदेशीर असलं तरी जेवणानंतर लगेच फळं खाऊ नयेत. जर तुम्हाला फळं खायची असतील तर, जेवल्यानंतर एक तासानंतरच फळ खा.
हे वाचा - World Aids Day 2021: भारतात सेक्स वर्कर नव्हे, तर हे लोक आहेत HIV एड्सने सर्वाधिक बाधित
जेवणानंतर व्यायाम (Exercise after meals)
व्यायाम करणं आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे, परंतु जेवणानंतर लगेच जिम किंवा वर्कआउट (Workout) करणं टाळावं. कारण असं केल्यानं बेचैनी, अस्वस्थता आणि पोटाचा त्रास होऊ शकतो.
जेवणानंतर धूम्रपान आणि तंबाखूचं सेवन (Smoking and tobacco use after meals)
तसे, धूम्रपान आणि तंबाखू हे नेहमीच आरोग्यासाठी हानिकारक असतात. पण ते खाणं अधिकच अयोग्य आहे. असं केल्यानं, तंबाखूमध्ये असलेल्या निकोटीनची (Nicotine) ऑक्सिजनसोबत रासायनिक प्रक्रिया होऊ शकते आणि याच्यामुळं अनेक समस्या वाढू शकतात.
हे वाचा - Health Tips: तुम्हाला माहीत आहे का? या गोष्टी शिजवून खाणं आरोग्यासाठी असतं अपायकारक
जेवणानंतर लगेच झोपणे (Sleep immediately after a meal)
जेवल्यानंतर अनेकांना सुस्तपणा जाणवू लागतो. यामुळं त्यांना जेवल्यानंतर लगेच झोपायला आवडतं. आपण ही चूक करणं टाळावं. तुमची ही सवय तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. यामुळं स्थूलपणा वाढणं किंवा पोटावर चरबीची वाढ (Belly Fat) होऊन पोट सुटणं अशा समस्या निर्माण होतात.
(सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health, Health Tips