मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Mistakes Should Be Avoided: 'या' सवयी आत्तापासूनच बंद करा अन्यथा पश्चाताप होईल!

Mistakes Should Be Avoided: 'या' सवयी आत्तापासूनच बंद करा अन्यथा पश्चाताप होईल!

Mistakes Should Be Avoided: माणसाचं आरोग्य (Health) हे त्याच्या सवयींवर (Habits) खूप अवलंबून असते. त्याच्या चांगली सवयी त्याला उत्तम आणि निरोगी आयुष्य जगण्यास मदत करतात. तर वाईट सवयींचा आरोग्यावर गंभीर परिणाम होतात. पण, मग प्रश्न येतो की ह्या वाईट सवयी कोणत्या?

पुढे वाचा ...

  मुंबई, 2 डिसेंबर : आरोग्य (Health) चांगलं ठेवण्यासाठी योग्य आहार (healthy diet) आणि फिटनेस (maintain fitness) ठेवणं जेवढं आवश्यक आहे, तेवढंच काही सवयी (Habits) वेळीच सुधारणंही आवश्यक आहे. प्रत्यक्षात आपण दैनंदिन जीवनात काही अशा चुका (Mistakes) करत असतो, ज्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात. त्याबद्दल माहिती नसल्यामुळे त्या चुका आपण सातत्याने करत राहतो; मात्र त्याचा थेट प्रभाव आरोग्यावर पडत असतो.

  तुमचं आरोग्य चांगलं राहावं, तुमचं शरीर निरोगी असावं, असं वाटत असेल तर तुम्हाला दैनंदिन जीवनात करत असलेल्या काही चुका टाळाव्या लागतील. चला तर मग, दररोज नकळत आपण काय चुका करतो, की ज्यामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो, ते पाहू या.

  जेवण झाल्यानंतर फळ खाणं

  बरेच जण जेवण झाल्यानंतर लगेचच फळं खातात; पण जेवल्यानंतर लगेच फळ खाण्याची चूक करू नका. यामुळे पचनक्रियेचा वेग कमी होतो. पचनक्रिया आणि पोटाच्या समस्या उद्भवण्याची यामुळे शक्यता असते. फळं खाणं आरोग्यासाठी फायदेशीर असते. परंतु जेवण झाल्यानंतर लगेच फळ खाऊ नये. तुम्हाला फळं खायची असली, तर जेवण झाल्यानंतर एक तासानंतर खावीत.

  केळीच्या सालींमध्येही असतात इतके पोषक घटक, वाचून केळासोबत सालही खाल

  जेवण झाल्यानंतर व्यायाम करणं

  व्यायाम करणं हे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. परंतु, जेवण झाल्यानंतर किंवा काहीही खाल्ल्यानंतर लगेच व्यायाम करणं टाळलं पाहिजे. कारण असे केल्यामुळे तुम्हाला पोटाशी संबंधित आजार, अस्वस्थता, चिंताग्रस्तपणा आदी समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

  जेवणानंतर धूम्रपान करणं

  धूम्रपान करणं आणि तंबाखू खाणं हे आरोग्यासाठी हानिकारक आहे. तरीही अनेकांना त्या सवयी असतात. त्या पूर्ण टाळल्या तर उत्तमच; मात्र ते शक्य नसेल, तर निदान धूम्रपान आणि तंबाखू यांचं सेवन जेवण झाल्यानंतर लगेच केलं जाऊ नयं. असं केल्याने तंबाखूमध्ये असलेल्या निकोटीनची ऑक्सिजनशी प्रक्रिया होऊन आरोग्याविषयक अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.

  अजबच! कोणतं ब्युटी प्रोडक्ट्स नाही; 'थप्पड' आहे कोरिअन महिलांच्या सौंदर्याचा राज

  जेवण झाल्यानंतर लगेच झोपणं

  जेवण झाल्यानंतर अनेकांना आळस येतो. अशा वेळी जेवण झाल्यानंतर लगेच झोपायला अनेकांना आवडतं; मात्र ही चूक टाळली पाहिजे. कारण ही सवय आरोग्यासाठी खूपच हानिकारक ठरू शकते.

  स्वतःचे शरीर निरोगी राहावं, आरोग्य चांगले राहावं, यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातात. नियमित व्यायाम करणं, योग्य आहार घेणं याला प्राधान्य दिलं जातं. परंतु बऱ्याचवेळा दैनंदिन जीवनात होणाऱ्या छोट्या सवयींचं आरोग्यावर खूप वाईट परिणाम होऊ शकतात. त्यामुळे अशा सवयी वेळीच बदलण्याची गरज आहे.

  First published:

  Tags: Health, Health Tips, Mental health