मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /थंडीच्या दिवसात हे 6 प्रकारचे ज्युस नक्की प्या; प्रतिकारशक्ती वाढेलच रहाल एकदम तंदुरुस्त

थंडीच्या दिवसात हे 6 प्रकारचे ज्युस नक्की प्या; प्रतिकारशक्ती वाढेलच रहाल एकदम तंदुरुस्त

बहुतेक लोक हिवाळ्यात गाजर आणि बीटचा रस पितात. परंतु, आपण आपल्या हिवाळ्याच्या आहारात इतर ज्युस देखील घेऊ शकतो. जाणून घेऊया हिवाळ्यात कोणते ज्यूस (Winter healthy juice) आरोग्यासाठी फायदेशीर आहेत.

बहुतेक लोक हिवाळ्यात गाजर आणि बीटचा रस पितात. परंतु, आपण आपल्या हिवाळ्याच्या आहारात इतर ज्युस देखील घेऊ शकतो. जाणून घेऊया हिवाळ्यात कोणते ज्यूस (Winter healthy juice) आरोग्यासाठी फायदेशीर आहेत.

बहुतेक लोक हिवाळ्यात गाजर आणि बीटचा रस पितात. परंतु, आपण आपल्या हिवाळ्याच्या आहारात इतर ज्युस देखील घेऊ शकतो. जाणून घेऊया हिवाळ्यात कोणते ज्यूस (Winter healthy juice) आरोग्यासाठी फायदेशीर आहेत.

नवी दिल्ली, 15 जानेवारी : हिवाळ्यात खाण्यापिण्याची (Winter Diet) विशेष काळजी घेणे खूप गरजेचे असते. तुम्ही सकाळ-संध्याकाळ काय खाता-पिता, याला खूप महत्त्व आहे. उन्हाळ्यात लोकांकडे ज्यूस पिण्याचे अनेक पर्याय असतात, परंतु हिवाळ्यात लोक थंड गोष्टी टाळतात. तरी बहुतेक लोक हिवाळ्यात गाजर आणि बीटचा रस पितात, परंतु हवे असल्यास आपण आपल्या हिवाळ्याच्या आहारात इतर ज्युस देखील घेऊ शकतो. जाणून घेऊया हिवाळ्यात कोणते ज्यूस (Winter healthy juice) प्यावेत.

बीट, गाजर आणि आल्याचा रस पिणे हिवाळ्यात खूप फायदेशीर आहे. आल्याचा प्रभाव उष्ण असतो, त्यामुळे हा रस प्यायल्याने ऊब मिळेल. व्यायाम करण्यापूर्वी आणि नंतर तुम्ही बीटरूट, गाजर आणि आल्याचा रस पिऊ शकता. त्यात जीवनसत्त्वे आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात. या रसामध्ये लोह, जीवनसत्व ए आणि व्हिटॅमिन सी असते. यामुळे अॅनिमियाची समस्या दूर होते आणि रोगप्रतिकारशक्ती वाढते.

हिवाळ्यात अनेकजण गाजर खातात. गाजराचा रस बनवण्यासाठी तुम्ही हिरवे सफरचंद आणि संत्र्याचा रस देखील घालू शकता. यामुळे रस अधिक चवदार आणि पौष्टिक होईल. या रसामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. यामुळे तुमची प्रतिकारशक्ती वाढेल, तुमची दृष्टीही तीक्ष्ण होईल. हा रस प्यायल्याने तुम्ही आजारांना लगेच बळी पडत नाही. गाजराचा रस रोगप्रतिकार शक्ती वाढवतो.

लिंबूवर्गीय फळांचा रस आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. लिंबूवर्गीय फळांमध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते. लिंबूवर्गीय फळांचा रस प्यायल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि संसर्ग टाळता येतो. लिंबूवर्गीय फळांच्या रसाने आपण निरोगी राहतो, त्याचप्रमाणे हा रस सर्दी आणि पडश्यापासूनही बचाव करतो. यासाठी तुम्ही संत्रा, मोसंबी आणि द्राक्षाचा रस पिऊ शकता.

हे वाचा - Omicron diet: कोरोनाची लक्षणं दिसताच खायला सुरू करा या गोष्टी; हॉस्पिटलमध्ये जाण्याची वेळ टळेल

अनेकजण हिवाळ्यातील आहारात टोमॅटो सूपचा समावेश करतात. टोमॅटो सूप आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. टोमॅटो सूपमध्ये भरपूर फायबर, व्हिटॅमिन बी9 किंवा फोलेट असते. याव्यतिरिक्त, हे व्हिटॅमिन सीचा एक चांगला स्रोत आहे. ते प्यायल्याने संसर्ग टळतो. रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि बद्धकोष्ठतेची समस्याही दूर होते. हे सूप वजन कमी करण्यासाठी देखील उपयुक्त आहे. याशिवाय, हे सूप पिऊन तुम्ही संपूर्ण हिवाळ्यात तंदुरुस्त आणि निरोगी राहू शकता.

हे वाचा - लघवीच्या समस्येशिवाय किडनी खराब होण्याची अशी असतात लक्षणं; त्याकडे दुर्लक्ष पडेल महागात

हिवाळ्यात स्ट्रॉबेरी सहज उपलब्ध होतात. त्यामुळे तुम्हाला हवे असल्यास तुम्ही हिवाळ्यात स्ट्रॉबेरी आणि किवीचा रस पिऊ शकता. स्ट्रॉबेरी आणि किवीचा रस अनेक आरोग्य समस्यांपासूनही बचाव करतो. स्ट्रॉबेरी आणि किवीच्या ज्यूसमध्ये व्हिटॅमिन सी असते, ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते.

हे वाचा - अर्रर्र… पुन्हा आमदाराची जीभ घसरली! म्हणे ‘कंगना रणौतच्या गालापेक्षा चिकने रस्ते आम्ही बनवणार’

अजमोदा (ओवा) आणि टोमॅटोचा रस हिवाळ्यात पिऊ शकतो. हा ज्यूस प्यायल्याने शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत होते. यासोबत अजमोदाचा रस हृदय, मूत्रपिंड आणि यकृत देखील निरोगी ठेवतो. याशिवाय अजमोदा (ओवा) आणि टोमॅटोचा रस देखील व्हिटॅमिन सीचा चांगला स्रोत आहे. हा रस प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते. यामध्ये व्हिटॅमिन ए देखील असते, जे डोळ्यांसाठी फायदेशीर आहे.

First published:

Tags: Health Tips, Winter