Home /News /lifestyle /

Winter Vagina म्हणजे नेमकं काय? यामुळे Sex Life वर देखील होऊ शकतो परिणाम

Winter Vagina म्हणजे नेमकं काय? यामुळे Sex Life वर देखील होऊ शकतो परिणाम

हिवाळ्यात महिलांना व्हजायनामध्ये ड्रायनेसची (Dryness) समस्या जास्त प्रमाणात जाणवू शकते. विंटर व्हजायना म्हणजे काय, त्याची लक्षणं कोणती आहेत आणि यापासून मुक्ती कशी मिळवायची याबाबत माहिती जाणून घेऊया.

मुंबई, 20 जानेवारी: सध्या हिवाळा ऋतू (Winter) ऐन भरात आलेला असून वातावरणातील गारवा प्रचंड वाढला आहे. या थंडीचा सर्वाधिक परिणाम आपली त्वचा आणि केसांवर होतो. थंडीत आपली त्वचा आणि केस कोरडे होतात. अशा परिस्थितीत, कोरडी त्वचा (Dry Skin) आणि फुटलेले ओठ ही मोठी समस्या ठरू शकते. साधारणपणे हँड क्रीम (Hand Cream) आणि लिप बामचा (Lip Balm) वापर करून या समस्या दूर करण्याचा प्रयत्न करतो. मात्र, आपल्या शरीराच्या बाह्य अवयवांसोबत प्रायव्हेट पार्टवरदेखील (Private Parts) थंडी परिणाम करते. न्यूयॉर्क पोस्टनं दिलेल्या वृत्तानुसार, हिवाळ्यात व्हजायना म्हणजे महिलांची योनीसुद्धा ड्राय होऊ शकते. या समस्येला 'विंटर व्हजायना' (Winter Vagina) असं म्हणतात. विंटर व्हजायना म्हणजे काय, त्याची लक्षणं कोणती आहेत आणि यापासून मुक्ती कशी मिळवायची याबाबत माहिती जाणून घेऊया. विंटर व्हजायना म्हणजे काय? हिवाळ्यात महिलांना व्हजायनामध्ये ड्रायनेसची (Dryness) समस्या जास्त प्रमाणात जाणवू शकते. कोरडा शरद ऋतू आणि हिवाळ्यातील थंड हवा शरीरातील आर्द्रता कमी करू शकते. परिणामी त्वचा डीहायड्रेट (Dehydrate) होते आणि त्यावर लहान-लहान भेगा पडतात. अनेकदा आपलं सायनसदेखील कोरडं पडतं. अशा परिस्थितीमध्ये व्हजायनादेखील कोरडी पडू शकते. जेव्हा आपण वातानुकूलित खोल्यांमध्ये बराच वेळ घालवतो किंवा हीटिंग चालू असताना आपण ज्या हवेमध्ये राहतो त्या हवेत ह्युमिडिटी फारच असते. अशा वेळी आपल्या त्वचेला जाणवणारा ड्रायनेस प्रायव्हेट पार्ट्सपर्यंतदेखील जाऊन पोहचतो, अशी माहिती लंडन ब्रिज प्लॅस्टिक सर्जरी अँड एस्थेटिक क्लिनिकमधील (Bridge Plastic Surgery and Aesthetic Clinic) सीनिअर नर्स मेरी बर्क यांनी प्रसारमाध्यमांना दिली. हे वाचा-तुमची गर्लफ्रेंड किंवा बायको एकटी असताना गुगलवर काय काय सर्च करते माहितीये का? हवामानातील बदलांचा स्त्रीच्या प्रायव्हेट पार्टवर थोडाफार परिणाम होऊ शकतो, याला डॉ. जेन गुंटर यांनी दुजोरा दिला आहे. मात्र, त्यांनी आपलं एक वेगळ मतदेखील मांडलं आहे. डॉ. जेन गुंटर यांच्या मते, व्हजायनातील ड्रायनेसचा बाहेरील तापमानाशी काहीही संबंध नाही. लो इस्ट्रोजेन लेव्हल (Estrogen level), काही औषधं आणि थ्रशमुळं व्हजायना ड्राय होते. 'सर्व ऋतूंमध्ये व्हजायना फक्शनिंग चांगलं असतं. व्हजायना तुमच्या शरीराच्या आतील भागात असते. कुठल्याही ऋतुमध्ये तिचं तापमान स्थिर राहतं. बाहेरील थंडी किंवा उष्णतेचा तिच्यावर थेट परिणाम होत नाही. योनी मार्गातील कोरडेपणा ही एक गंभीर स्थिती आहे. सर्व वयोगटांतील महिलांना याचा त्रास होऊ शकतो. ही समस्या मानसिक खच्चीकरण करणारी ठरू शकते आणि यामुळे सेक्स करताना असह्य वेदना होऊ शकतात,' असं डॉ. जेन म्हणाल्या. 'ही' आहेत विंटर व्हजायनाची लक्षणं >> अस्वस्थपणा जाणवतो आणि व्हजायनामध्ये जळजळ होते. >> सेक्सदरम्यान अस्वस्थ वाटणं. >> सेक्स टाळण्याचा प्रयत्न करणं. >> उत्तेजित होण्यास आणि प्लेझर पॉईंट गाठण्यात अडचण येणं. >> व्हजायनाची स्कीन पिवळसर आणि पातळ होणं. >> व्हजायनाचे स्नायू आंकुचित होऊन आकार लहान होणं. >> सामान्य प्रमाणापेक्षा जास्त वेळा लघवी येणं. >> वारंवार युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन (Urinary tract infection) होणं. हे वाचा-Sex Education | कंडोम वापरल्यानंतरही गर्भधारणा होऊ शकते का? तशी ही सर्व स्त्रियांना जाणवणारी एक अतिशय सामान्य समस्या वाटते. मात्र, ज्या स्त्रियां मेनोपॉज फेजमध्ये आहेत किंवा मेनोपॉज (Menopause) फेज कम्प्लिट झाला आहे, अशा स्त्रियांना याचा सर्वाधिक त्रास होतो. काही ठराविक औषधं, डायबेटिस, स्तनपान किंवा बाळाचा जन्म यासारख्या घटकांमुळेदेखील विंटर व्हजायनाची शक्यता वाढू शकते. काही प्रकरणांमध्ये, स्त्रियांच्या शरीरातील इस्ट्रोजेन या सेक्स हॉर्मोनची कमतरतादेखील व्हजायना ड्रायनेससाठी कारणीभूत ठरू शकते. काही तज्ज्ञांच्या मते, विंटर व्हजायनाची समस्या सुरू झाल्यास चांगलं मॉइश्चरायझर त्या भागात लावू शकता. याशिवाय इस्ट्रोजेन आणि हॉर्मोन रिप्लेसमेंट थेरपीसारख्या (Hormone replacement therapy) उपचारांचीही मदत घेता येते. आपल्या लाईफ स्टाईलमध्ये आणि आहारामध्ये काही महत्त्वाचे बदल केल्यानं विंटर व्हजायनाचा धोका कमी होण्यास मदत होऊ शकते. विंटर व्हजायनाची समस्या असल्यास फॉलो करा या टिप्स दिवसातून एकदा अॅपल ज्युस नक्की प्या- व्हजायनातील ड्रायनेस हा हॉर्मोनच्या असंतुलनाचा परिणाम असू शकतो. त्यामुळे आहारात फायटोइस्ट्रोजेन (Phytoestrogens) असलेल्या पदार्थांचा समावेश करून हा बॅलन्स नॉर्मल करता येऊ शकतो. अॅपल ज्युस, चेरी, फ्लेक्ससीड्स आणि इतर तेलबियांमध्ये फायटोइस्ट्रोजेन मोठ्या प्रमाणात आढळतं. या खाद्यपदार्थांचा आहारामध्ये समावेश करा. हिरव्या पालेभाज्या खा- हिरव्या पालेभाज्या शरीराला दीर्घकाळ निरोगी ठेवण्यास मदत करतात. त्यात मुबलक प्रमाणात पोषक घटक आणि नायट्रेट्स (Nitrates) असतात. व्हजायनातील ड्रायनेस टाळण्यासाठी हिरव्या पालेभाज्या खाणं उपयुक्त आहे. हिरव्या भाज्यांमध्ये व्हिटॅमिन ई, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम मुबलक प्रमाणात असतं. ज्यामुळे स्नायू निरोगी राहतात. हे वाचा-Sex Education | तुमच्या नीरस लैंगिक जीवनात असे भरा रंग, दोघांनाही मिळेल आनंद खरबूज आणि टरबूज खावं- हेल्दी व्हजायनातील पीएच लेव्हल 3.8 ते 4.5 दरम्यान असते. ही लेव्हल कमी-जास्त झाल्यास तुम्हाला अस्वस्थता जाणवू शकते. अशा स्थितीत खरबूज आणि टरबूज यांचं सेवन नक्की करा. या दोन्ही फळांमध्ये सायट्रुलीन असतं. हा घटक व्हजायनाच्या आरोग्यासाठी उपयुक्त असतो. तसंच हा घटक शरीरातील रक्तवाहिन्यांनाही आराम देते. नारळ खा- शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यासाठी नारळाचं खोबरं खावं. नारळामुळे व्हजायनातील इन्फेक्शन दूर होण्यास मदत होते. नारळाच्या पाण्यात लॉरिक अॅसिड असतं ज्यामुळे शरीरातील हानिकारक बॅक्टेरिया निघून जातात. स्ट्रेस लेव्हल कमी करा- जेव्हा महिला स्ट्रेसमध्ये असतात तेव्हा त्यांच्या शरीरातील इस्ट्रोजेन लेव्हल कमी होऊ शकते. या स्थितीला मिनी मेनोपॉज असंही म्हणतात. इस्ट्रोजेन लेव्हल कमी झाल्यानं त्वचा कोरडी होते. यावर उपाय म्हणून आहारात व्हिटॅमिन सी चं प्रमाण वाढवलं पाहिजे आणि स्ट्रेस कमी केला पाहिजे. तुम्हाला हा त्रास जाणवला तर तुम्ही वरचे उपाय करू शकता किंवा तातडीने डॉक्टरांना भेटून त्यांच्याकडून तपासणी करून घेऊ शकता.
First published:

Tags: Sex education

पुढील बातम्या