मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Winter Solstice 2020 : वर्षातल्या सर्वात लहान दिवसाच्या शेवटी विलक्षण 'ग्रहयोग' , काही तासांतच दिसणार 'महायुती'

Winter Solstice 2020 : वर्षातल्या सर्वात लहान दिवसाच्या शेवटी विलक्षण 'ग्रहयोग' , काही तासांतच दिसणार 'महायुती'

Winter Solstice 2020: 800 वर्षांनंतर आकाशात ही अनोखी महायुती होते आहे. गुरु आणि शनी ग्रहामधलं अंतर सर्वांत कमी असेल आणि 21 डिसेंबरच्या (shortest day of year) मुहूर्तावरच हे घडतंय हा आणखी एक 'ग्रहयोग'.

Winter Solstice 2020: 800 वर्षांनंतर आकाशात ही अनोखी महायुती होते आहे. गुरु आणि शनी ग्रहामधलं अंतर सर्वांत कमी असेल आणि 21 डिसेंबरच्या (shortest day of year) मुहूर्तावरच हे घडतंय हा आणखी एक 'ग्रहयोग'.

Winter Solstice 2020: 800 वर्षांनंतर आकाशात ही अनोखी महायुती होते आहे. गुरु आणि शनी ग्रहामधलं अंतर सर्वांत कमी असेल आणि 21 डिसेंबरच्या (shortest day of year) मुहूर्तावरच हे घडतंय हा आणखी एक 'ग्रहयोग'.

  • Published by:  अरुंधती रानडे जोशी
मुंबई, 21 डिसेंबर : पुढच्या काही तासांत एक विलक्षण 'ग्रहयोग' साधणार आहे. शब्दशः ग्रहयोग आहे. कारण काही तासांतच आकाशात गुरू आणि शनी ग्रह एकमेकांच्या अगदी जवळ येणार आहेत. म्हणजे जवळ आलेले आपल्याला दिसणार आहेत. 21 डिसेंबर हा वर्षातील सर्वांत लहान दिवस (Shortest Day) असतो. यंदा हा दिवस आणखी वैशिष्ट्यपूर्ण आहे, कारण याच दिवशी ही अनोखी महायुती दिसणार आहे. सूर्यास्ताच्या सुमारास ही युती  दिसणार आहे 21 डिसेंबरला उत्तर गोलार्धात Winter Solstice म्हणतात. याच दिवशी  आज गुरु (Jupiter) आणि शनी (Saturn) या दोन्ही ग्रहांची युती (Conjunction) होणार आहे. यंदा हे दोन्ही ग्रह सर्वाधिक जवळ येणार असून, गेल्या 800 वर्षांतलं सर्वांत कमी अंतर त्यांच्यामध्ये असणार आहे. ही अतिशय दुर्मीळ घटना असून, दर वीस वर्षांनी ही घटना घडते. 23 तारखेपर्यंत अवकाशातील हा दुर्मीळ सोहळा सूर्यास्तानंतर तासभर पाहता येणार आहे. साध्या डोळ्यांनी हे दृश्य पाहता येणार असून, हे दोन्ही ग्रह एक झाल्याचा भास होईल. दुर्बिणीनं पाहिल्यास त्यांच्यातील अंतर अगदी किंचित असल्याचं दिसेल. या नंतर आता 15 मार्च 2080 रोजी असा योग येणार आहे. कुठे बघायचं कधी पाहायचं? सूर्यास्ताच्या सुमारास ही युती  दिसणार आहे. नैर्ऋत्य दिशेला हा ग्रहयोग दिसेल. त्यामुळे 6.30 वाजल्यानंतर पश्चिम क्षितीजावर दिसेल. हे दोन्ही ग्रह लवकर मावळत असल्यामुळे आपल्याला ही युती जेमतेस तासभर पाहता येईल. 21 डिसेंबर हा दिवस विंटर सोलस्टाईस (Winter Solestice)म्हणूनही ओळखला जातो. तसंच डिसेंबर सोलस्टाईस, डिसेंबर   हाइमल सोलस्टाईस किंवा हायबरनल सोलस्टाईस म्हणूनही ओळखला जातो. जेव्हा पृथ्वीचा (Earth) अक्ष सूर्यापासून लांब जातो. तेव्हा अगदी कमी काळ सूर्यप्रकाश पृथ्वीवर पडतो. त्यामुळं या दिवशी रात्र (Longest Night) वर्षातली सर्वांत मोठी असते. दर वर्षी 21 किंवा 22 डिसेंबर रोजी ही घटना घडते. डिसेंबर महिन्यात वेगवेगळ्या खगोलीय घटना घडतात. यंदा 21 डिसेंबर रोजी दोन घटना घडत आहेत. हा सर्वात लहान दिवस आहेच; पण त्याचबरोबर यंदा या दिवशी गुरु आणि शनी यांची युतीही पहायला मिळणार आहे. त्यामुळं यंदाचा हा दिवस अगदी विशेष आहे. विंटर सोलस्टाईसबद्दल काही बाबी- -विंटर सोलस्टाईस हा सूर्याचा जन्मदिन मानला जातो. या दिवशी पृथ्वीच्या उत्तर गोलार्धापासून सूर्य अधिक दूर जात असल्यानं दिवस मोठा होण्यास तर रात्र लहान होण्यास सुरुवात होते. -सूर्य दक्षिणेकडून उत्तरेकडे जाण्यास सुरुवात होते. त्यामुळं दक्षिणेकडे उन्हाळा सुरू होतो. -गुरु आणि शनी यांची युती या दिवशी होणार असून त्यांच्यातील अंतर एक अंशापेक्षा कमी असेल, इतकं कमी अंतर यापूर्वी 17 व्या शतकात झालेल्या या दोन ग्रहांच्या युतीदरम्यान होतं. -लॅटीन शब्द सॉलिस्टीयमपासून आला आहे. सोल (sol)म्हणजे सूर्य, आणि सिस्टेरे (Sistere) म्हणजे थांबणे याचा पास्ट पार्टीसिपल आहे. म्हणून ‘सन स्टँडिंग स्टील’ (Sun standing Still)असा त्याचा ढोबळ अर्थ लावला जातो. या घटनेशी अनेक प्रथा, रिती जोडल्या गेल्या आहेत. इराणमध्ये लोक हा याल्दा (yalda) नावाने हा सण साजरा करतात. इस्लाम पूर्व काळात सूर्य देवता मित्रा याचा हा जन्मदिन मानला जातो.
First published:

Tags: Winter

पुढील बातम्या