मुंबई, 6 नोव्हेंबर : भारत असो की, दुसरा एखादा देश गर्मीपासून वाचण्यासाठी सर्वात स्वस्त आणि सोपा उपाय म्हणजे पंखा. उष्णतेपासून वाचण्यासाठी बहुतांश घरांमध्ये पंखेच सर्वाधिक वापरले जातात. आपण अनेकदा घरांमध्ये पाहिलेले पंखे तीन ब्लेड असतात. पण आता असे काही पंखेही बाजारात येऊ लागले आहेत, ज्यात चार ब्लेड आहेत.
होय, चार ब्लेडचे पंखेही हल्ली बाजारात आले आहेत. मात्र चार ब्लेडचे पंखे लावण्याचे सर्वाधिक प्रमाण विदेशात आहे. भारतात अजूनही लोक तीन ब्लेडच्या पंख्यालाच प्राधान्य देतात. परंतु तुम्ही कधी हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे का की, तीन आणि चार ब्लेड पंखांमध्ये काय फरक आहे? आणि भारतात सर्वाधिक प्रमाणात तीन तर विदेशात चार ब्लेडचे पंखेच का वापरले जातात?
ड्रायव्हरने असा गिअर टाकला की प्रेमात पडली श्रीमंत पोरगी; तिच्याशी लग्न करून झाला करोडपतीचा घरजावई
अमेरिका, रशिया किंवा थंड देशांमध्ये चार ब्लेड पंखे बसवले जातात. इथे प्रत्येक घरात एअर कंडिशनर बसवले आहे. अशा परिस्थितीत एसीला पूरक म्हणून या घरांमध्ये चार ब्लेडचे पंखे बसवले जातात. म्हणजेच खोलीत एसीची हवा पसरवण्यासाठी त्यांचा उपयोग होतो.
तर भारतात तुम्हाला प्रत्येक घरात तीन ब्लेड पंखे सापडतील. येथे खोलीतील हवेसाठी पंखे वापरले जातात. भारतात एसी खूप कमी लोकांच्या घरात असतील. अशा परिस्थितीत हवेसाठी हे पंखे बसवले जातात. चार-ब्लेड पंख्यांच्या तुलनेत, तीन-ब्लेड पंखे हलके असतात आणि खूप वेगाने फिरतात.
3 आणि 4 ब्लेडच्या पंख्यांमध्ये नेमका फरक काय?
- पंख्यामध्ये जितक्या जास्त ब्लेड असतील तितकीच ते कमी हवा देतात. कारण त्याचा मोटारीवर लोड पडतो. त्यामुळे कमी तापमान असलेल्या देशांतील पंख्यांमध्ये ब्लेडची संख्या अधिक आहे. कमी ब्लेड असलेले पंखे जास्त हवा देतात. म्हणूनच भारतासारख्या उष्ण हवामान असलेल्या देशामध्ये तीन ब्लेड असलेले पंखे वापरले जातात. ब्लेडची संख्या कमी केल्याने पंख्याचा वेग वाढतो आणि जास्त हवा मिळते.
VIDEO - लिपस्टिकच्या क्वालिटीवर फिदा; वयाच्या विशीत तरुणीने साठीतील दुकानदारासोबत थाटला संसार
- तीन आणि चार ब्लेड पंख्यांमध्ये हवामानाशी निगडित फरक आहे. वास्तविक चार ब्लेड असलेले पंखे तीन ब्लेड असलेल्या पंख्यांपेक्षा जास्त वीज वापरतात. त्यामुळे वीज वाचवण्यासाठी भारतातील बहुतांश लोक तीन ब्लेडचे पंखे वापरतात. चार ब्लेडचे पंखे बाजारात अधिक महाग आहेत. यामुळे लोक कमी पैशात फक्त तीन ब्लेड पंखे घेण्यास प्राधान्य देतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.