Home /News /lifestyle /

विमानप्रवासादरम्यान जन्मलेल्या बाळाला कोणत्या देशाचं नागरिकत्व मिळतं?

विमानप्रवासादरम्यान जन्मलेल्या बाळाला कोणत्या देशाचं नागरिकत्व मिळतं?

baby born on an airplane

baby born on an airplane

एखाद्याचा बाळाचा जन्म विमानात (baby is born on an airplane) झाला असेल तर त्याला कोणत्या देशाचं नागरिकत्व मिळतं? तर जाणून घ्या...

     नवी दिल्ली,23 नोव्हेंबर:  जगातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी नागरिकत्व (Citizenship) हा जीवनाचा आधार असतो. व्यक्तीला ज्या देशाचं नागरिकत्व मिळतं, त्या देशाचे कायदे आणि नियमांना (Citizenship Rules) ती बांधील असते. याच नागरिकत्वाच्या आधारावर तिला देशात सर्व सुविधा मिळतात. एखाद्याकडे वास्तव्यासाठी अवश्यक असलेलं नागरिकत्वच नसेल, तर त्या व्यक्तीला अनेक निर्बंध पाळावे लागतात. नागरिकत्व नसलेल्या व्यक्तीला व्हिसाच्या आधारे राहावं लागतं. एखाद्या व्यक्तीचा जन्म भारतात झाला असेल, तर त्याला जन्माने भारताचं नागरिकत्व मिळतं. पण एखाद्याचा जन्म हवेत झाला असेल तर त्याला कोणत्या देशाचं नागरिकत्व मिळतं, असा प्रश्न कधी तुम्हाला पडलाय का? याच प्रश्नाचं उत्तर आपण जाणून घेऊ या. नागरिकत्वाचा मुद्दा समजून घेण्यासाठी आपण एका उदाहणाचा आधार घेऊ या. समजा, भारतातून एखादी गरोदर महिला (Pregnant women) विमानात बसून अमेरिकेला जात आहे. विमानप्रवासादरम्यान अचानक तिला लेबर पेन (प्रसूतिवेदना) सुरू झाल्या. विमानप्रवासादरम्यान ती महिला कुठल्याही देशाच्या सीमेमध्ये नाही, तर आकाशात आहे. अशा परिस्थितीमध्ये जन्मलेल्या मुलाला भारताचं नागरिकत्व मिळेल की अमेरिकेचं? या प्रश्नाचं उत्तर काहीसं गुंतातुंतीचं आहे. विमानात जन्मलेल्या बाळाला नागकित्व देताना अनेक गोष्टींचा विचार केला जातो. बाळाच्या जन्माच्या वेळेस विमान ज्या देशाच्या हवाई सीमेत (Air border) असेल, त्या देशाचं नागरिकत्व बाळाचे आई-वडील मागू शकतात. हा देश भारत आणि अमेरिकेव्यतिरिक्त दुसरा कुठलाही असू शकतो. बाळाच्या जन्मावेळी विमान अमेरिकेच्या हद्दीत असेल, तर भारतीय पालक विमानतळावर उतरल्यानंतर मुलासाठी अमेरिकेचं नागरिकत्व प्रमाणपत्र मिळवू शकतात. हीच गोष्ट अमेरिकन पालकांनाही लागू होते. अमेरिकेतून भारतात येणाऱ्या अमेरिकन महिलेनं भारतीय हद्दीत बाळाला जन्म दिला असेल, तर ती आपल्या मुलासाठी भारतीय नागरिकत्व मागू शकते; मात्र यानंतर त्या मुलाला अमेरिकेचं नागरिकत्व मिळू शकणार नाही. कारण भारतात एकल नागरिकत्वाची (Single citizenship) संकल्पना लागू होते. नागरिकत्वाचा हा प्रश्न गुंतागुंतीचा होऊ नये म्हणून, भारतातल्या विमान कंपन्यांनी (Airlines in India) काही नियम केले आहेत. भारतात 7 महिन्यांपेक्षा जास्त महिन्यांची गर्भवती असलेल्या महिलांना विमानाने प्रवास करण्यास मनाई केलेली आहे. एखादी खूपच आपत्कालीन स्थिती उद्भवली असेल, तरच अशी गरोदर महिला विमानाने प्रवास करू करते. प्रत्येक देशात नागरिकत्वाबाबत वेगवेगळे कायदे आहेत. या कायद्यांच्या आधारे नागरिक आपल्या बाळासाठी नागरिकत्वाची मागणी करू शकतात.
    Published by:Dhanshri Otari
    First published:

    Tags: Airplane, Small baby

    पुढील बातम्या