मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /गोड पदार्थ कधी खायला हवेत? जेवणाच्या आधी की जेवणानंतर

गोड पदार्थ कधी खायला हवेत? जेवणाच्या आधी की जेवणानंतर

गोड पदार्थ कधी खायला हवेत? जेवणाच्या आधी की जेवणानंतर

गोड पदार्थ कधी खायला हवेत? जेवणाच्या आधी की जेवणानंतर

गोड पदार्थ कधी जेवणापूर्वी खावे की जेवणानंतर खावे याबाबत लोकांमध्ये अनेक संभ्रम आहेत. काही लोक जेवणानंतर गोड खाण्याला प्राधान्य देतात. परंतु असं करण आरोग्यासाठी घातक ठरू शकत.

आयुर्वेदानुसार निरोगी राहण्यासाठी व्यक्तीने खाण्यापिण्याशी संबंधित काही नियमांचे पालन केले पाहिजे. गोड पदार्थ खाण्याबाबतही असाच नियम सांगितला आहे. बहुतेक कुटुंबांमध्ये जेवणानंतर गोड पदार्थ खाल्ला जातो. पण जेवणानंतर गोड खाणे आरोग्यासाठी खरेच चांगले आहे का? तेव्हा आयुर्वेदानुसार मिठाई खाण्याची योग्य वेळ, जेवणापूर्वी की नंतर असते हे आज जाणून घेऊयात.

निरोगी राहण्यासाठी मर्यादित प्रमाणात साखरेचे सेवन करायला हवे. कारण अति गोड खाल्ल्याने लठ्ठपणा, मधुमेह, हृदयरोग यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. आयुर्वेदानुसार मिठाई नेहमी जेवणापूर्वी खावी. परंतु यामागचे कारण नेमके काय आहे जाणून घेऊयात.

जेवणापूर्वी गोड खाण्याचे फायदे :

गोड पदार्थ पचायला जास्त वेळ लागतो, त्यामुळे जेवणापूर्वी त्याचे सेवन केल्याने पाचक स्रावांचा प्रवाह वाढतो.

जेवणापूर्वी गोड खाल्ल्याने तुमचे टेस्टबड्स ऍक्टिव्ह होतात.  जेणेकरून तुम्ही जेवणाचा अधिक चांगला आनंद घेऊ शकता.

जेवणापूर्वी गोड खाल्ल्याने शरीरातील अन्न पचवणारे हार्मोन्स सक्रिय होतात.

जेवणानंतर गोड खाण्याचे तोटे :

जेवणानंतर गोड खाल्ल्याने पचनक्रियेवर परिणाम होतो आणि ती मंदावते.

जेवणानंतर गोड खाल्ल्याने पोट फुगणे आणि पोटात गॅस तयार होणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

अन्न खाल्ल्यानंतर पोटात पचनाची आग तयार होते, ज्यामुळे खाल्लेले अन्न पचण्यास मदत होते. त्यामुळे आयुर्वेदानुसार, अन्न खाल्ल्यानंतर गोड पदार्थ खाल्ल्याने तुमची पचनाची आग विझते ज्यामुळे अन्नाचे पचन नीट होत नाही आणि व्यक्तीला अॅसिडिटी, अपचनाची समस्याही होऊ शकते.

First published:
top videos

    Tags: Food, Health, Health Tips, Lifestyle