S M L

काय आहेत जाॅगिंगचे फायदे?

अनेक जण महागड्या जिम्समध्येही जातात. पण त्याची गरज नाही. तुम्ही जाॅगिंग करून बरेच फायदे मिळवू शकता.

Sonali Deshpande | Updated On: May 20, 2018 12:47 PM IST

काय आहेत जाॅगिंगचे फायदे?

20 मे: हल्ली प्रत्येक जण फिटनेसबद्दल जागरूक झालाय. अनेक जण महागड्या जिम्समध्येही जातात. पण त्याची गरज नाही. तुम्ही जाॅगिंग करून बरेच फायदे मिळवू शकता.

१. जाॅगिगमुळे वजन कमी होऊ शकतं. जादा चरबी कमी होते. मेटॅबोलिझम चांगला राहतो.

२. शरीर आणि मन ताजंतवानं राहतं. तुमची सहनशीलता वाढते. उत्साह राहतो.

३. तुमची हाडं मजबूत होतात. मांडीचे स्नायू, कंबरेचे स्नायू लवचिक राहतात. पाय मजबूत राहतात.

४. फुफ्फुसांमध्ये चांगली हवा जाते. तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

Loading...
Loading...

५. जाॅगिंगमुळे झोपेचे प्रश्न सुटतात. झोप चांगली लागते.

६. जाॅगिंग करताना तुम्ही शक्यतो एकटे असता. माणसाला स्वत:मध्ये पाहायचा वेळ मिळतो. सुज्ञ माणूस त्यामुळे अंतर्मुख होतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 20, 2018 12:47 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close