Home /News /lifestyle /

तुम्हाला तर नाही ना ‘सेकंड हँड स्ट्रेस?’ नकारात्मक विचार करेल शरीरावरही परिणाम, पाहा लक्षणं

तुम्हाला तर नाही ना ‘सेकंड हँड स्ट्रेस?’ नकारात्मक विचार करेल शरीरावरही परिणाम, पाहा लक्षणं

मनात येत एकच प्रश्न येतो की जोडीदाराने मला का फसवलं ? अशा परिस्थितीत ज्याची फसवणूक झाली आहे तो स्वत:ला जास्त त्रास करतो. एकमेकांवर प्रेम करणारे अशी फसवणूक का करतात.

मनात येत एकच प्रश्न येतो की जोडीदाराने मला का फसवलं ? अशा परिस्थितीत ज्याची फसवणूक झाली आहे तो स्वत:ला जास्त त्रास करतो. एकमेकांवर प्रेम करणारे अशी फसवणूक का करतात.

समोरचा माणूस जांभई देत असतो तेव्हा आपल्यालाही येते, तसं तणावग्रस्त व्यक्तीच्या संपर्कात राहिल्याने आपल्यालाही स्ट्रेस येतो. Second Hand Stress ची लक्षणं जाणून घ्या. हा ताण येऊ नये म्हणून काय करायचं?

नवी दिल्ली, 27 ऑगस्ट: एखाद्या व्यक्तीला जांभई देताना पाहिलं, की आपल्यालाही जांभई येते. तसंच, एखाद्याला हसताना पाहिल्यावर आपल्यालाही हसू येतं. एवढंच काय, तर आपल्यासोबत असणाऱ्या व्यक्तीला एखाद्या गोष्टीची भीती वाटत असली, तर आपल्यालाही थोडी का होईना, भीती वाटतेच. आपल्या संपर्कातल्या व्यक्तीच्या मनःस्थितीचा (Mental health tips) आपल्यावरही मोठ्या प्रमाणात परिणाम होत असतो. यामुळेच, एखाद्या तणावग्रस्त व्यक्तीच्या संपर्कात (Person having stress) आपण आलो, तर आपल्यालाही तणाव जाणवण्याची  शक्यता मोठ्या प्रमाणात असते. अशा तणावाला ‘सेकंड हँड स्ट्रेस’ (Second hand stress) म्हटलं जातं. तणावग्रस्त किंवा नकारात्मक मानसिकता (Negative mindset) असणाऱ्या व्यक्तीच्या संपर्कात येणं तुमच्यासाठी कधी कधी धोक्याचं ठरू शकतं. तुमचा दिवस किती का चांगला चाललेला असेना, अशा प्रकारची व्यक्ती भेटल्यानंतर तुमचाही मूड बिघडतो. टवटवीत दिसणाऱ्या भाज्यांमध्ये असू शकतात घातक केमिकल; Video पाहा फसवणूक थांबवा आपल्या सहसा लक्षात येत नाही, मात्र कित्येक छोट्या-छोट्या गोष्टीही आपल्या मनावर मोठ्या प्रमाणात परिणाम करतात. विशेष म्हणजे, सेकंड हँड स्ट्रेसवर (Second hand stress tips) उपाय करणं सोपं असलं, तरी त्याला ओळखणं जास्त कठीण असतं. आपल्या आयुष्यात कोणतीही वाईट गोष्ट घडत नसतानाही आपण तणावाखाली (Stress for no reason) जातो. त्यामुळे खरंतर सेकंड हँड स्ट्रेस अधिक धोकादायक ठरतो. अशा प्रकारच्या तणावामुळे तुमच्या मानसिक, शारीरिक आरोग्यावर; तसंच कामावर आणि वैयक्तिक जीवनावरही वाईट परिणाम दिसून येतो. त्यामुळे आपल्याला सेकंड हँड स्ट्रेस आहे की नाही हे वेळीच ओळखणं (Detect stress) गरजेचं आहे. याचं सर्वांत मोठं लक्षण (Stress symptoms) म्हणजे, विनाकारण तणाव येणं. साधारणपणे तुमचा मूड तेव्हा खराब होतो, जेव्हा कोणाशी भांडण होतं किंवा कामाच्या ठिकाणी वाद होतो किंवा अशी एखादी गोष्ट जी तुम्हाला ट्रिगर करते; मात्र असं काही न होताही तुमचा मूड खराब होत असेल किंवा उदास वाटत असेल, तर नक्कीच तुम्ही दुसऱ्या कोणाचा तरी तणाव आपल्यावर ओढवून घेतला आहे, असं समजायला हरकत नाही. Microwave मध्ये पदार्थ गरम करतात? मग ही बातमी वाचाच आणि जाणून घ्या दुष्परिणाम यासोबतच, अचानक तुमचा मूड (Being Sceptical) बदलणं किंवा छोट्या-छोट्या गोष्टींमुळे चिडचिड होणं हे याचं दुसरं लक्षण आहे. यासोबतच कायम तक्रार करणाऱ्या, निगेटिव्ह विचार करणाऱ्या लोकांसोबत राहिल्यामुळे तुमचाही स्वभाव चिडचिडा होतो. असे लोक तुमच्या मनातली सकारात्मक ऊर्जा (Positive Energy) संपवून टाकू शकतात. यामुळे तुम्हाला कायम थकल्यासारखं (Always feeling tired) वाटतं आणि काहीही करण्याची इच्छा राहत नाही. त्यामुळे अशा प्रकारची मानसिकता असणाऱ्या लोकांपासून दूर राहणं उत्तम. आणखी एका महासाथीचं संकट, कोरोनापेक्षाही भयंकर असणार; तज्ज्ञांनी केलं अलर्ट सेकंड हँड स्ट्रेस तुमच्या मनावर मोठ्या प्रमाणात परिणाम करतो. यामुळे तुमच्या कार्यक्षमतेवर विपरीत (Stress affects productivity) परिणाम होतो. एरव्ही अगदी सहजपणे तुम्ही ज्या गोष्टी करू शकत होतात, त्याही करताना तुम्हाला अडचण (Not able to think clearly) येऊ शकते. त्यामुळेच सेकंड हँड स्ट्रेसची लक्षणं वेळीच ओळखून, त्यावर प्रतिबंधात्मक उपाय करणं आवश्यक ठरतं.
First published:

Tags: Mental health, Stress

पुढील बातम्या