आज रात्री दिसणार वर्षातील सर्वात मोठा सुपरमून, जाणून घ्या तुम्ही कुठे आणि कसं घेऊ शकाल दर्शन

आज रात्री दिसणार वर्षातील सर्वात मोठा सुपरमून, जाणून घ्या तुम्ही कुठे आणि कसं घेऊ शकाल दर्शन

घरात बसून कंटाळलेल्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आज पृथ्वीवरून या वर्षातील सर्वात मोठा चंद्र दिसणार आहे. तुमच्या घराच्या गच्चीतून, खिडकीतून या चांदोबाचं दर्शन होऊ शकणार आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 07 एप्रिल : कोरोना व्हायरसमुळे देशभरात लॉकडाऊन आहे. अशा परिस्थितीमध्ये देशभरातील अत्यावश्यक सेवा वगळता प्रत्येक नागरिक घरी बसला आहे. मात्र प्रत्येकाची हिच अपेक्षा आहे की लवकरात लवकर हा लॉकडाऊन संपावा आणि कोरोना देखील जगभरातून संपूष्टात यावा. जेणेकरून स्वच्छंदपणे घराबाहेर जाता येईल. पण घरात बसून कंटाळलेल्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आज पृथ्वीवरून या वर्षातील सर्वात मोठा चंद्र दिसणार आहे. या चंद्राला Pink Supermoon असं म्हणतात. तुमच्या घराच्या गच्चीतून, खिडकीतून या चांदोबाचं दर्शन होऊ शकणार आहे. 2020 मध्ये यांनंतर कोणताही सुपरमून एवढा मोठा दिसणार नाही आहे.

पिंक सुपरमून म्हणजे काय?

जेव्हा चंद्र आणि पृथ्वीमधील अंतर कमी होतं त्यावेळी चंद्राचा आकारमान मोठा दिसतो. या परिस्थितीला सुपरमून असं म्हणतात. यावेळी चंद्र 14 टक्के जास्त मोठा आणि 30 टक्के जास्त चमकदार दिसून येतो. चंद्र आणि पृथ्वीमध्ये सुमारे 4,06,692 किमीचं अंतर आहे. चंद्र आणि पृथ्वी सुर्याभोवती फिरताना एकमेकांंच्या जवळ येतात. त्यावेळी या दोघांमधील अंतर 3,56,500 किमी होतं. जेव्हा जेव्हा हा परिस्थिती निर्माण होते, तेव्हा सुपरमून दिसतो.

(हे वाचा-राशीभविष्य : उद्याचा सुपरमून ठरणार नात्यांसाठी प्रभावी; काय असेल परिणाम?)

तर 'पिंक सुपरमून' हे या चंद्राला देण्यात आलेले नाव आहे. यामागे कोणतेही वैज्ञानिक कारण नाही. अमेरिका आणि कॅनडामध्ये या कालावधीमध्ये उगवणाऱ्या एका फुलामुळे या चंद्राला पिंक सुपरमून असं म्हटलं जातं. फ्लॉक्स सुबुलाता (Phlox Subulata) असं या फुलाचं नाव आहे, ज्याला मॉस पिंक सुद्धा म्हटलं जातं. या फुलाच्या नावावरूनच पिंक सुपरमून असं नाव देण्यात आले आहे. याचा अर्थ असा नव्हे की चंद्र गुलाबी रंगाचा दिसेल.

(हे वाचा-लॉकडाउनच्या काळात मुलांना शिकवा या गोष्टी, भविष्यात येतील कामी)

सुर्यास्त झाल्यानंतर सुपरमून पाहता येणार आहे. भारतीय वेळेनुसार 7 एप्रिलला 8 वाजून 5 मिनिटांनी चंद्राचं हे रूप दिसायला सुरूवात होईल. कदाचित 8 एप्रिलला सुद्धा सुपरमून पाहता येईल. आजचा चंद्र तुम्हाला उघड्या डोळ्यांनी पाहता येणार आहे. ना याकरता कोणत्या लेन्सची गरज आहे ना ही कुठे जाण्याची. घराच्या गच्चीतून, बाल्कनीतून तुम्ही आजच्या सर्वात जास्त चमकणारा चंद्र पाहू शकता. मात्र यावेळी सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचं पालनं करणे सुद्धा तेवढच महत्त्वाचे आहे. जर गच्चीत जाऊन सुपरमून पाहणार असाल तर नक्की मास्कचा वापर करा.

संपादन- जान्हवी भाटकर

First published: April 7, 2020, 5:28 PM IST
Tags: supermoon

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading