मुंबई, 24 मार्च : प्रत्येक व्यक्तीला कोणत्या ना कोणत्या गोष्टीची भीती वाटते. या भीतीला फोबिया म्हणतात. काही लोक फोबियाला काही आजाराशी जोडतात. भीती हा आजार नाही हे त्यांना कळायला हवे. प्रत्येक व्यक्तीला कोणत्या ना कोणत्या गोष्टीची भीती वाटते. काहींना उंचीची भीती वाटते, काहींना प्राण्यांची भीती. हे सामान्य आहे. परंतु जर भीती मनात खोलवर बसली तर त्या व्यक्तीसाठी समस्या निर्माण होऊ शकतात.
फोबिया हा मुख्यतः आपल्या मनाचा विकार असतात. हा फोबिया कालांतराने स्वतःच कमी होऊ लागतो किंवा बरा होऊ लागतो. एखाद्याला वर्षानुवर्षे एखाद्या गोष्टीची भीती वाटत असेल आणि ती कालांतराने कमी होत नसेल. तर ती चिंतेची बाब ठरू शकते. अशा परिस्थितीत मानसशास्त्रज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
वैवाहिक आयुष्यात आनंद आणि उत्साह टिकवून ठेवण्यासाठी पुरुषांनी जरूर खावी वेलची, वाचा फायदे
जाणून घ्या फोबिया कशाला म्हणतात
फोबिया हा अतार्किक भीतीचा एक गंभीर प्रकार आहे. ज्यामध्ये एखादी व्यक्ती विशिष्ट ठिकाण, परिस्थिती किंवा विशिष्ट गोष्ट पाहून घाबरते. ही भीती त्याला मानसिक त्रास देते. समजा एखाद्या व्यक्तीला कुत्र्याची भीती वाटत असेल तर हा त्याचा फोबिया असू शकतो. पण कुत्र्याचा उल्लेख ऐकून, त्याला दुरून पाहून ती व्यक्ती अस्वस्थ झाली असेल किंवा त्याला स्वतःवर नियंत्रण ठेवता येत नसेल तर त्याचे कारण काही गंभीर कारणे असू शकते. वैद्यकीय इतिहास हेदेखील त्याचे एक कारण असू शकते.
कधीकधी फोबिया अनुवांशिकदेखील असू शकतो. जर एखाद्या लहान मुलाच्या आसपास काही अप्रिय घटना घडत असेल तर त्या मुलालादेखील फोबिया होऊ शकतो. फोबियाचे कोणतेही विशिष्ट कारण नसते. बहुतेक लोकांना त्यांच्या मनात असलेल्या गृहितकांमुळे त्रास होतो. काहीवेळा तो जुन्या घटनांशीही जोडला जातो. जर ते वेळेत बरे झाले नाही तर तज्ञांना भेटणे फार महत्वाचे आहे.
फोबिया कसा ओळखायचा
हेल्थलाइनमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, फोबियाचे लक्षण म्हणजे पॅनीक अटॅक असू शकते. एखाद्या व्यक्तीला एखाद्या गोष्टीचा फोबिया असेल तर ती गोष्ट पाहिल्यानंतर किंवा जाणवल्यानंतरच ती व्यक्ती विचित्र वागू लागते. याशिवाय हृदयाचे ठोके वाढणे, श्वास घेण्यास त्रास होणे, तोंड कोरडे पडणे, छातीत तीव्र वेदना होणे हेदेखील फोबियाच्या लक्षणांमध्ये समाविष्ट आहेत.
Makeup Tips : मेकअप प्रोडक्टवर एक्स्पायरी डेट लिहिलेली नाही? अशी तपासा प्रोडक्ट्ची व्हॅलिडिटी
फोबियाला कसे सामोरे जावे
दीर्घकाळ टिकणारी भीती खूप गंभीर असू शकते, म्हणूनच तुम्ही न डगमगता चांगल्या मानसशास्त्रज्ञाची मदत घ्यावी. फोबियावर मात करणे सोपे नाही. परंतु मानसशास्त्रज्ञांच्या मदतीने तुम्ही तुमच्या फोबियाचे कारण जाणून घेऊन त्यावर मात करू शकता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health Tips, Lifestyle, Mental health