Home /News /lifestyle /

ऑफिसमध्ये काम करताना या गोष्टींची भीती वाटते? 'People Pleaser'ला बळी पडू नका!

ऑफिसमध्ये काम करताना या गोष्टींची भीती वाटते? 'People Pleaser'ला बळी पडू नका!

पीपल प्लेजर या भावनेला बळी पडू नका. आत्ताच या प्रतिमेतून बाहेर या.. नाहीतर तुमच्या परफॉर्मन्स, कॉन्फिडन्स आणि क्षमतेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

    मुंबई, 02 डिसेंबर: नोकरी करणारे लोक घरापेक्षा ऑफिसात (Office) जास्त वेळ घालवतात. एक प्रकारे कर्मचार्‍यांचे कार्यालय हे दुसरे घर आहे आणि त्यामध्ये काम करणारे कर्मचारी (Employees) त्यांच्या फॅमिली मेम्बर्सप्रमाणे बनतात. आपल्याला ऑफिसमधील आपल्या सहकाऱ्यांशी बोलताना संकोच करणं  (Hesitation) तसंच त्यांच्या मनाप्रमाणे तुम्हाला वागावं लागत आहे असं वाटणं किंवा त्यांच्या हो ला हो करायला लागतं असं तुम्हाला वाटत असेल तर आपण 'पीपल प्लेजर' (People Pleaser) म्हणजेच इतरांना दिलासा देणारे लोक या श्रेणीत येऊ शकता. खरंतर यात चुकीचं काही नाही, परंतु यामुळे आपल्या परफॉर्मन्स, कॉन्फिडन्स आणि क्षमतेवर परिणाम होतो. आम्ही आपल्याला काही टिप्स देत आहोत ज्या आपल्या या समस्येवर मात करू शकतात. प्रथम शिका आणि नंतर बदला प्रथम आपण हे का करता ते जाणून घ्या. तुमच्या मनात काही भीती आहे का? आम्ही आपणास सांगत आहोत की 'पीपल्स प्लेजर' होण्याची अनेक कारणे आहेत, जसे की नाकारण्याची भीती, तोलामोलाचा स्वीकार करणं, अपयशासारख्या गोष्टींची भीती, ज्यामुळे आपण असे बनता. जर अशी स्थिती असेल तर हळूहळू ऑफिसच्या वातावरणाचं परीक्षण करा आणि नाही म्हणायची सवय लावा. लक्षात ठेवा, स्वत: ला कमी लेखण्याऐवजी स्वतःला अधिक किंमत द्या. याला थोडा वेळ लागेल परंतु, ते फक्त आपल्यासाठी चांगले असेल. नवीन प्रतिमा तयार करा आपल्यातली कमतरता नव्हे तर 'पीपल्स प्लेजर' ची समस्या तुमची ताकद बनवा. त्यामुळे ऑफिसमध्ये आपली नवीन प्रतिमा तयार होईल.ऑफिसमध्ये आपली बाजू मोकळेपणाने मांडा. मॅनेजरशी मैत्री करा. असं करणं आपल्याला व्यावसायिकता विकसित करण्यात मदत करेल. नाही म्हणायला शिका या समस्येपासून मुक्त होण्यासाठी आपल्याला 'नाही' म्हणायची सवय करावी लागेल. कोणत्याही विषयावर विचार न करता, हो, होय, असं म्हणणं आपल्याला सोडून द्यावे लागेल. आपण कोणत्याही प्रकारे अप्रत्यक्षपणे नकार देण्यास शिकले पाहिजे. वर्तन हळूहळू बदला 'पीपल प्लेजर' च्या प्रतिमेतून बाहेर पडण्यासाठी हळूहळू आपलं वर्तन बदला. कारण, वागण्यात संपूर्ण बदल ऑफिसमध्ये आपल्यासाठी एक विपरित वातावरण तयार करू शकतो. एक-एक करून गोष्टी बदला, त्या लक्षात घ्या आणि मग पुढची पायरी ठरवा. नात्याची व्याप्ती वाढवा कार्यालयातील कोणत्याही कर्मचार्‍याची मदत मागण्यास अजिबात संकोच करू नका. आपण आपल्या सहकार्यांना नेहमी मदत हवी आहे का विचारावं आणि गरज पडेल तेव्हा त्यांची मदत देखील मागितली पाहिजे. याद्वारे आपण आपले कार्य आणि संधी यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी सक्षम असाल. सहकाऱ्यांशी संबंध आणि संवाद वाढवत रहा. सर्व जबाबदारी स्वतःवर घेऊ नका 'पीपल प्लेजर'ची भावना निर्माण झालेल्या व्यक्तींना असे वाटते की ऑफिसमध्ये शिस्त निर्माण करण्यासाठी आपणच जबाबदार आहोत. तो समजतो की जर त्याने आपल्या सहकाऱ्यांना मदत केली नाही तर तो आपले काम पूर्ण करू शकणार नाही. थांबा, ही तुमची जबाबदारी नाही, टीममध्ये आणखी बरेच कर्मचारी आहेत, ते सुद्धा काम पूर्ण करण्यासाठी जबाबदार आहेत. जर आपण या विचारसरणीवर चाललात तर आपल्याला त्यातून बराच आराम मिळेल आणि तणाव देखील कमी होईल.
    Published by:Amruta Abhyankar
    First published:

    Tags: Stress

    पुढील बातम्या