प्रत्येक 500 पैकी एका पुरुषात दिसून येतो 'क्लाइनफेल्टर सिंड्रोम', जाणून घ्या काय आहे आजार

प्रत्येक 500 पैकी एका पुरुषात दिसून येतो 'क्लाइनफेल्टर सिंड्रोम', जाणून घ्या काय आहे आजार

रुग्णांना पिता होण्यासाठी स्पर्म डोनरची मदत घ्यावी लागते किंवा एखादं मूल दत्तक घ्यावं लागतं.

  • Share this:

तीन वर्षांपूर्वी प्रतिक पोटदुखीमुळे डॉक्टरांकडे गेला होता. डॉक्टरांनी त्याला रक्ताच्या चाचण्या करण्यास सांगितलं. या चाचणीत प्रतिकच्या शरीरात टेस्टोस्टेरोनचा (testosterone) स्तर कमी आढळला. प्रतिक आपल्या पत्नीसोबत यूरोलॉजिस्टकडे गेला. तिथे गेल्यानंतर त्याला जे कळलं त्याचा प्रतिकने कधीही विचार केला नव्हता. यूरोलॉजिस्टने सांगितले की, प्रतिक कधीही पिता होऊ शकत नाही. पिता होण्यासाठी त्याला स्पर्म डोनरची मदत घ्यावी लागेल किंवा एखादं मुल दत्तक घ्यावं लागेल. डॉक्टरांच्यामते, प्रतिक क्लाइनफेल्टर नावाच्या आजाराने त्रस्त आहे. प्रत्येक 500 पुरुषांपैकी एक पुरुषामध्ये या आजाराची तक्रार असते.

काय असतं 'क्लाइनफेल्टर सिंड्रोम'

आपल्या शरीरात 23-23 चे दोन सेट क्रोमोसोम उपलब्ध असतं. पुरुषांमध्ये X आणि Y असे दोन प्रकारचे क्रोमोसोम असतात. तर महिलांमध्ये फक्त X हे क्रोमोसोम असतात. जेव्हा पुरुषांमध्ये अतिरिक्त X क्रोमोसोम येतं, त्या स्थितीला 'क्लाइनफेल्टर सिंड्रोम' म्हणतात. सर्वसामान्यपणे पुरुषांमध्ये X आणि Y असे दोन प्रकारचे क्रोमोसोम असतात, पण या स्थितीत पुरुषांमध्ये पुरुषांमध्ये X आणि X क्रोमोसोम असतात.

याची लक्षणं काय असतात-

- फक्त योग्य चाचण्यांनीच रुग्णातील ही लक्षणं दिसून येतात.

- असं म्हटलं जातं की, ज्या मुलांची पौगंडावस्था उशीराने येते आणि ज्यांचा अंडकोष किंवा testicles तुलनेने लहान असतो त्यांच्यात या सिंड्रोमची शक्यता जास्त असते. मुलांमध्ये undescended testicles असू शकतात आणि लिंग सर्वसामान्यपेक्षा छोटं असू शकतं.

- 'क्लाइनफेल्टर सिंड्रोम'वाली मुलं उंचीने जास्त असतात आणि त्यांच्या उंचीनुसार त्यांचे हात- पायही लांब असतात.

- शुक्राणूंची निर्मितीही (sperm formation) कमी प्रमाणात होते.

- कधी कधी पौगंडावस्थेत मुलांचं स्तनही वाढतं.

- शरीरावर कमी केस येणं

- स्नायूंचा विकास कमी होणं

काही मुलांमध्ये सिंड्रोमची ही लक्षणं प्रौढावस्थेतही कळून येत नाहीत. पिता होण्यात जेव्हा अडचणी येतात तेव्हा या सर्व गोष्टी समोर येतात.

कसा होईल उपचार-

जर टेस्टोस्टेरोनचा स्तर सर्वसामान्यपेक्षा कमी असेल तर वेगळ्या पद्धतीने टेस्टोस्टेरोन हार्मोनद्वारे मदत करता येऊ शकते. पुरुषांच्या लिंगाच्या आकाराच वाढ करूनही यात सुधार आणला जाऊ शकतो. सिंड्रोममध्ये दिसणाऱ्या अनेक लक्षणांवर मात करता येऊ शकते. मात्र प्रजनन क्षमता विकसित करणं फार कठीण असतं.

निष्काळजीपणाचा कळस!डॉक्टरांची मोठी चूक,सहाव्या महिन्यात भंगलं आई होण्याचं स्वप्न

ऑफिसच्या AC मुळे शरिरातील या भागांचं होतं नुकसान; अशी घ्या काळजी!

टॉयलेटमध्ये फोन घेऊन जाणं वेळीच थांबवा, नाहीतर आयुष्यभर होईल पश्चाताप!

आयुर्वेदानुसार जाणून घ्या जेवणात कसं, कधी आणि काय खावं...

VIDEO: पवारांवरील कारवाईनंतर बारामीतकरांमध्ये रोष, रस्त्यावर उतरून केली निदर्शनं

Published by: Madhura Nerurkar
First published: September 25, 2019, 9:41 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading