नवी दिल्ली, 8 सप्टेंबर: दमट वातावरणात सगळ्यांनाच खूप घाम येतो. एक विशिष्ट प्रकारचा दुर्गंध येतो. कामानिमित्त प्रवास करावा लागत असेल तर अशा लोकांना घामामुळे खूप त्रास होतो. घामाच्या दुर्गंधामुळे (
sweat) इतरांनाही त्रास होतो. त्यामुळे लोक शरीराला येणाऱ्या घामाची दुर्गंधी दूर करण्यासाठी सुगंधी वासाचे डिओड्रंट, बॉडी स्प्रे, परफ्युम यांचा वापर करतात. त्यामुळे घामाचा वास दीर्घकाळ दूर ठेवणं शक्य होतं. ज्याप्रमाणे शरीराला घामाचा वास येतो त्याप्रमाणे केसाताही घाम येत असल्यानं केसांनाही (
Hair Perfume) एक प्रकारचा दुर्गंध येतो. त्यामुळे आता केसांचा दुर्गंध दूर करणारे परफ्युम्स (
Perfumes) बाजारपेठेत आले आहेत.
माणसाच्या बाह्य व्यक्तिमत्वात भर घालण्यात केसांचा महत्त्वाचा वाटा आहे. पुरुष असो वा स्त्री घनदाट, काळेभोर केस असणं सगळ्यांनाच आवडतं. सुळसुळीत, चमकदार केस स्त्रियांच्या सौंदर्यात भर घालतात. याकरता स्त्रिया केसांची विशेष काळजी घेतात. केसांसाठी खास तेल, शॅम्पू यासह अनेक प्रसाधनांचा वापर केला जातो. वयोमानानुसार केस पांढरे होऊ लागले तर त्यांना रंगवले जाते. याचबरोबर आता केस सुगंधी राहतील याचीही काळजी घेतली जात आहे. त्यासाठी अनेक प्रकारचे हेअर परफ्यूम्स (Hair Perfumes) बाजारपेठेत उपलब्ध आहेत. केसांना धूळ, घाम आणि प्रदूषणामुळे एक प्रकारचा वास येतो. तसंच शॅम्पू न केल्यामुळंही केसांमध्ये दुर्गंधी निर्माण होते. केसांना अशा विविध कारणांमुळे येणारा वास दूर करण्यासाठी केसांसाठी आलेले खास परफ्यूम उपयुक्त ठरतात. हे वापरायाला अतिशय सोपे असून, त्याचे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. ड्राय शॅम्पूबरोबर (Dry Shampoo) हे परफ्युम वापरल्यास त्याचा अधिक चांगला फायदा होऊ शकतो, असं तज्ज्ञांचं मत आहे.
Explainer : फक्त चालण्यानेच कसं फिट आणि हेल्दी राहतं संपूर्ण शरीर?
केसांचा परफ्यूम फक्त दुर्गंधी दूर करत नाही, तर अतिनील किरणांपासून (UVRays) केसांचे संरक्षण होण्यासही मदत करते. केसांची वाढ (Growth) आणि व्हॉल्यूम वाढविण्यातदेखील हे परफ्युम मदत करतात. यामुळे केस तुटणे कमी होते तसेच केसाचा कोरडेपणाही दूर होतो.
हे परफ्यूम केसांना पोषण देण्याचेदेखील काम करतात. केसांना दुर्गंधी येत नसली तरीही तुम्ही शॅम्पू केल्यानंतर त्याचा वापर करू शकता. यामुळे केसांना केवळ आर्द्रता, पोषण मिळतं त्यामुळं केसांचे सौंदर्यही वाढते. केसांना सुगंधी बनवण्याबरोबरच हेअर परफ्यूम केसांना सुळसुळीत (Silky ) आणि चमकदारही (Shiny) करते. या परफ्यूममुळे केसांचा चिकटपणा आणि तेलकटपणा कमी करण्याबरोबरच केसांना मॉइश्चराइज (Moisturize) करण्यासाठी मदत होते. त्यामुळे आता नेहमीच दिवसभर सुगंधी केसांमुळे प्रसन्नपणा अनुभवता येईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.