मुबई, 26 जानेवारी स्किन ग्लोइंग करण्यासाठी आजकाल अनेक प्रकारचे फेशियलचा वापर केला जातो. परंतु विद्युत प्रवाहाने म्हणजेचं करंटद्वारे देखील त्वचेची काळजी घेता येते हे फार कमी लोकांना माहिती असेल. गॅल्व्हॅनिक फेशियल असे या फेशियलचे नाव आहे. हे फेशियल खूप लोकप्रिय आहे. तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या किंवा बारीक रेषा असतील तर हे फेशियल करताना चेहऱ्यावर विजेचा झटका जाणवतो.
त्वचेवर करण्यात येणाऱ्या या प्रक्रियेला नॉन-सर्जिकल फेसलिफ्ट म्हणतात. याद्वारे कोणत्याही सर्जिकल प्रक्रियेतून न जाता त्वचा निरोगी ठेवता येते. हे एक प्रकारचे हायड्रेटिंग फेशियल आहे जे त्वचेचा पोत आणि रक्त प्रवास सुधारते.
चेहरा किंवा मानेवर येणाऱ्या चामखिळी कॅन्सरचं लक्षण? काय आहे चामखीळ येण्यामागचं कारण?
गॅल्व्हॅनिक फेशियलचे 5 फायदे
त्वचा डिटॉक्सिफाय होते: स्टाइलक्रेसनुसार गॅल्व्हॅनिक फेशियल केल्यावर त्वचा ताजेतवाणी होते. या फेशियलमुळे त्वचा डिटॉक्स होते. या फेशियलदरम्यान मृत त्वचेची दुरुस्ती केली जाते आणि त्वचेतून विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते.
त्वचा ग्लोइंग होते : प्रत्येकाला तजेलदार त्वचा हवी असते. निरोगी आणि चमकदार त्वचा मिळविण्यासाठी गॅल्व्हॅनिक फेशियल खूप फायदेशीर ठरू शकते. या फेशियलमुळे त्वचा मुलायम, निरोगी आणि चमकदार बनते.
सुरकुत्या कमी होतात: चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू लागल्या की सौंदर्य कमी होते. त्या कमी करण्यासाठी गॅल्व्हॅनिक फेशियल हा चांगला पर्याय ठरू शकतो. या फेशियलमुळे त्वचेला नवसंजीवनी मिळते आणि त्वचेवरील सुरकुत्या कमी होतात.
काळ्या डागांवर उपयुक्त: गॅल्व्हॅनिक फेशियल चेहऱ्यावरील काळे डाग दूर करू शकते. मुरुमांची समस्या कमी करण्यासाठी देखील गॅल्व्हॅनिक फेशियल उपयुक्त ठरू शकते.
Ayurved Tips : अंग खाजतंय? तर घरीच करा हे उपाय, मिळेल लगेच आराम
डार्क सर्कलवर प्रभावी: पफी आयबॅग्ज आणि डार्क सर्कल्स चेहऱ्याचे संपूर्ण सौंदर्य खराब करतात. गॅल्व्हॅनिक फेशियल या समस्या कमी करण्यास मदत करू शकते. गॅल्व्हॅनिक फेशियल हा नवीन फेशियल ट्रेंड आहे. याला खूप पसंती मिळत आहे. या फेशीयलचे आश्चर्यकारक फायदे आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Beauty tips, Health Tips, Lifestyle, Skin care