मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /कोरोनानंतर आता Disease X चा धोका; हा आजार नेमका आहे तरी काय?

कोरोनानंतर आता Disease X चा धोका; हा आजार नेमका आहे तरी काय?

Disease X हा कोरोनापेक्षाही (coronavirus) महाभंयकर असल्याचं सांगितलं जातं आहे.

Disease X हा कोरोनापेक्षाही (coronavirus) महाभंयकर असल्याचं सांगितलं जातं आहे.

Disease X हा कोरोनापेक्षाही (coronavirus) महाभंयकर असल्याचं सांगितलं जातं आहे.

  कांगो, 06 जानेवारी : जगभरात कोरोना(Covid 19) व्हायरस धुमाकूळ घालत आहे. अनेक देशांमध्ये या व्हायरसचे नवीन रूप समोर येत आहे.अनेक देशांमध्ये लसीकरण सुरू झालं असून याच्या नवीन रूपाने अनेक देशांनी धसका घेतला आहे. लसीकरण(Vaccination) सुरू झालं असताना आणखी एका नवीन व्हायरसचा धोका निर्माण झाला आहे.

  इबोला (Ebola Virus) या आफ्रिकेतील व्हायरसचा शोध लावणाऱ्या या वैज्ञानिकाने या नवीन व्हायरसविषयी इशारा दिला असून हा व्हायरस एबोलाप्रमाणेच घातक असल्याचे देखील त्यांनी म्हटलं आहे.

  वैज्ञानिक जीन-जैक्‍स मुयेम्‍बे ने तामफूम (Professor Jean-Jacques Muyembe Tamfum) यांनी याविषयी इशारा दिला आहे. या आजाराविषयी जास्त माहिती नसल्याने त्यांनी या आजाराला डिसीज X असं नाव दिलं आहे. हा आजार खूप भयंकर आणि घातक असून याने मोठी जीवितहानी होऊ शकते. त्यांच्या माहितीनुसार कांगोमध्ये हा व्हायरस असून जगभरातील अनेक देशांमध्ये देखील हा व्हायरस आहे.

  कांगोमध्ये एका महिलेला ताप (Hemorrhagic)  आल्यानंतर तिची इबोला टेस्ट करण्यात आली.

  तिची इबोला टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर डॉक्टरांना या महिलेला  Disease X आजार असल्याची भीती वाटत आहे. त्यामुळे आता या महिलेवर लक्ष असून लवकरच या महिलेचे पुढील रिपोर्ट देखील समोर येतील. डेडिन बोंकोलो हे डॉक्टर या महिलेवर उपचार करत असून हा पहिला रुग्ण असल्यानं याला पेशंट झिरो असे नाव दिलं आहे. इबोला हा खूप घातक आजार असून यामध्ये संक्रमण होणाऱ्या 80 टक्के रुग्ण दगावले जातात.मात्र हा नवीन व्हायरस कोणत्या कारणामुळे आला आहे हे अजून समोर आलेलं नसून कोरोना आणि इबोलापेक्षाही घातक असू शकतो.

  प्रोफेसर जीन यांनी 1976 मध्ये इबोला व्हायरसचा (Ebola Virus) शोध लावला होता. आपण व्हायरसच्या जगामध्ये राहत आहोत. अजून आणखी घातक व्हायरस येणार असून आपल्याला यापासून सावध राहण्याची गरज आहे. येणाऱ्या घातक व्हायरसपासून मोठ्या प्रमाणात भीती असून मोठ्या संख्येने हानी होऊ शकते, असं ते म्हणाले.

  तुमच्यापर्यंतही पोहोचू शकतो पक्ष्यांचा जीव घेणारा व्हायरस; वेळीच ओळखा लक्षणं

  जागतिक आरोग्य संघटनेच्या(WHO)  माहितीनुसार हा आजार काल्पनिक आहे. हा आजार जगभरात पसरल्यास खूप कमी वेळात हा आजार जगभरात पसरण्याची भीती देखील जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त(WHO)  केली. हा आजार पसरल्यानंतर तो केवळ आफ्रिकी देशांमध्ये सीमित राहणार नसून जगभरात पसरण्याची भीतीदेखील जागतिक आरोग्य संघटनेनं व्यक्त केली आहे. संघटनेने या आजाराविषयी खूप गांभीर्याने विचार केला असून अज्ञात व्हायरसच्या यादीत या आजाराला सर्वात वरचं स्थान दिलं आहे. त्यामुळे आता या अज्ञात व्हायरसचा प्रकोप सुरु होण्याआधी हा नक्की काय हे समजणं महत्त्वाचं आहे.

  जगभरात विविध प्रकारचे व्हायरस पसरत असतात. यामध्ये जास्त प्रमाणात प्राण्यांपासून व्हायरस पसरत आहेत. यामध्ये विविध प्रकारच्या प्राण्यांचा समावेश आहे. रेबीज, इंफ्लुएंझा आणि इतर अनेक प्राण्यांमधून मानवामध्ये पसरले आहेत. उंदीर आणि इतर अनेक किड्यांमुळे विविध व्हायरस मानवामध्ये आलेलं आहेत. त्यामुळे हा  डिसीज X देखील प्राण्यांमधून मानवांमध्ये आला असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. एइड्स(AIDS) आणि सार्स(SARS) आणि मर्स(MARS) देखील प्राण्यांमधून मानवांमध्ये आलेला आजार आहे. एड्स हा चिंपाझीमधून मानवामध्ये पसरला होता. त्यामुळे खूप सावधानता बाळगणे गरजेचे आहे. 1901 मध्ये सर्वात आधी प्राण्यांमधून मानवामध्ये व्हायरस आला होता. तेव्हापासून आतापर्यंत 200 व्हायरस मानवामध्ये आले असून या नवीन अज्ञात व्हायरसने भीती आणखी वाढली आहे.

  कायच्या काय! 9 वर्षांच्या मुलानं चक्क LED Bulb गिळला; पुढे नक्की काय घडलं वाचा

  हा नवीन व्हायरस एबोलापेक्षाही घातक असून कोरोना(Corona) आणि इबोलापेक्षा (Ebola Virus) वेगाने पसरतो. इबोला हा संसर्गजन्य आजार असून मानवांमधून दुसऱ्या मानवामध्ये याचे संक्रमण होते. त्यामुळे यापासून सावध राहणे खूप गरजेचे आहे.  उंदीर आणि वटवाघळांसारख्या प्राण्यांमधून विविध व्हायरस मानवांमध्ये आलेले आहेत. या प्राण्यांचा संबंध नागरिकांशी आल्यानंतर त्यांच्यापासून विविध व्हायरस मानवामध्ये येतात. या व्हायरसची लक्षणे सुरुवातीला सामान्य दिसतात. परंतु त्यानंतर त्याने गंभीर रूप धारण केल्यानंतर परिस्थिती हाताबाहेर जाते. रुग्णाच्या रक्तातून, घामातून किंवा त्यांना हात लावल्यास देखील याचे संक्रमण होऊ शकते.

  रुग्णाला याचे संक्रमण झाल्यास 2 ते 21 दिवसांमध्ये हा आजार पूर्णपणे शरीरात पसरतो. यानंतर सायटोकीन प्रथिने पेशींमधून बाहेर पडतात. पेशी रक्तवाहिन्या सोडण्यास सुरवात करतात आणि रक्तस्त्राव सुरू होतो. इबोलामध्ये रुग्णाच्या सांध्या आणि स्नायूंमध्ये वेदना होते. त्वचा पिवळसर होते. केस गळणे सुरू होते. डोळ्यांतून मोठ्या प्रमाणात पाणी येण्यास सुरुवात होते. यामध्ये रुग्णाला मोठ्या प्रमाणात  ताप येतो. त्याचबरोबर  कोलेरा, अतिसार, विषमज्वर यासारखी काही लक्षणे देखील दिसतात. या आजारावर अजूनही कोणत्याही प्रकारचे औषध किंवा लस आलेली नसून यावर संशोधन सुरू आहे.

  First published: