नवी दिल्ली, 29 जुलै : आंघोळीसाठी सर्वसाधारणपणे बहुतांश सर्वच लोक साबण (Bathing Soap) वापरतात. गेल्या अनेक वर्षांची हीच रूढ पद्धत आहे. अलीकडच्या काळात बॉडी वॉश (Body Wash), लिक्विड सोप (Liquid Soap), शॉवर जेल (Shower Gel) असे काही प्रकार आले आहेत. मात्र त्याचा वापर करण्याचं प्रमाण साबणाच्या तुलनेत कमी आहे. आकर्षक जाहिरातीमुळे ग्राहक वेगवेगळे साबण किंवा बॉडी वॉश विकत घेतात. पण त्यांना आपल्या त्वचेसाठी (Skin) काय योग्य आहे याची माहिती नसते. जाणून घ्या बॉडी वॉश आणि साबण यांच्यापैकी आपल्या त्वचेसाठी काय योग्य आहे.
या क्षेत्रातील तज्ज्ञ डॉ. सिन्थिया कोब यांनी Https://www.healthline.com/ या वेबसाइटवर याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. त्यांच्या मते, साबण आणि बॉडी वॉश यात वापरले जाणारे घटक आणि त्वचेवरील घाण स्वच्छ करण्याची त्याची पध्दत यात फरक आहे. साबण आणि बॉडी वॉश यांचे काही तोटे आहेत.
साबण आणि बॉडी वॉश यातील फरक काय?
जेव्हा आपण बाहेर जातो तेव्हा आपल्या त्वचेतून बाहेर पडणाऱ्या नैसर्गिक तेलात (Natural Oil on Skin) बाहेरची धूळ आणि घाण मिसळते आणि त्यामुळे आपल्या त्वचेवर बॅक्टेरिया अर्थात जीवाणू (Bacteria) निर्माण होऊ शकतात. साबण वापरून आपण जेव्हा त्वचा स्वच्छ करतो तेव्हा साबण तेलाचा हा थर काढून टाकतो.
बॉडी वॉशदेखील त्याच प्रकारे आपल्या त्वचेतील घाण काढून टाकतं, परंतु बॉडी वॉशमध्ये वापरलेले घटक (Ingredients) त्वचेसाठी चांगले असतात. त्यामुळे त्वचेचा कोरडेपणा, त्वचेची रंध्रे आणि त्वचा खराब होण्यापासून संरक्षण होतं.
बॉडी वॉश किंवा शॉवर जेल पातळ असतं. त्यामुळे ते साबणासारखं त्वचेला चिकटत नाही. त्याचप्रमाणे त्वचेची आर्द्रता कायम ठेवून त्वचा स्वच्छ करतं. त्यामुळे तुमची त्वचा कोरडी असेल तर बॉडी वॉश किंवा शॉवर जेल वापरणं अधिक लाभदायी असल्याचं डॉ. सिंथिया सांगतात.
सोरायसिस किंवा मुरुमांसारखा त्वचेचा कोणताही रोग असल्यास, डॉक्टरांच्या सल्ल्याने साबण किंवा शॉवर जेल वापरणं चांगलं असंही त्या म्हणतात. तुम्ही बॉडी वॉश वापरत असाल, तर तो लूफाह किंवा वॉश क्लोद किंवा सी स्पंजच्या सहायानेच वापरा, असंही डॉ. सिंथिया यांनी सांगितलं आहे.
साबण घेताना त्यातील घटक जाणून घेणं महत्त्वाचं -
लोक आपला साबण कोणाबरोबरही शेअर करत नसत त्यामुळे अॅलर्जीसारख्या समस्याही उद्भवत नसल्याचं डॉ. सिंथिया यांनी 1988 मध्ये केलेल्या अभ्यासाचा हवाला देत सांगितलं आहे. तसंच शॉवर जेल किंवा बॉडी वॉशपेक्षा साबण अधिक इको-फ्रेंडली (Eco Friendly) आहे. कारण साबणाच्या पॅकेजिंगचा पुनर्वापर करता येतो, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. मात्र बर्याचदा कमी किंमतीच्या साबणामध्ये त्वचेसाठी धोकादायक असलेले घटक वापरलेले असतात, त्यामुळे साबणाच्या किंमतीपेक्षा त्यात वापरण्यात येणाऱ्या घटकांकडे लक्ष दिलं पाहिजे, असा सल्ला त्यांनी दिला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.