मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

मधुमेह असणाऱ्यांना आहे अंधत्त्वाचा धोका; वाचा Diabetic retinopathy च्या लक्षणांविषयी

मधुमेह असणाऱ्यांना आहे अंधत्त्वाचा धोका; वाचा Diabetic retinopathy च्या लक्षणांविषयी

डायबेटिक रेटिनोपॅथी (Diabetic retinopathy) ही मधुमेहामुळे (diabetes complication) डोळ्यांवर परिणाम करणारी एक समस्या (Eye Complication) आहे.

डायबेटिक रेटिनोपॅथी (Diabetic retinopathy) ही मधुमेहामुळे (diabetes complication) डोळ्यांवर परिणाम करणारी एक समस्या (Eye Complication) आहे.

डायबेटिक रेटिनोपॅथी (Diabetic retinopathy) ही मधुमेहामुळे (diabetes complication) डोळ्यांवर परिणाम करणारी एक समस्या (Eye Complication) आहे.

मुंबई, 24 फेब्रुवारी: डायबेटिक रेटिनोपॅथी (Diabetic retinopathy) ही मधुमेहामुळे (diabetes complication) डोळ्यांवर परिणाम करणारी एक समस्या (Eye Complication) आहे. हा त्रास डोळ्याच्या मागच्या बाजूला असलेल्या प्रकाशाला संवेदनशील पेशींच्या (light-sensitive tissue) रक्तवाहिन्यांना झालेल्या नुकसानामुळे होते. त्याला डोळयातील पडदा देखील म्हणतात. सुरुवातीला, डायबेटिक रेटिनोपॅथीमध्ये कोणतीही लक्षणं नसतात. तसंच दिसण्यासंबंधी समस्याही उद्भवत नाहीत. परंतु शेवटी, यामुळे माणसाला पूर्ण अंधत्व येऊ शकतं. टाइप 1 किंवा टाइप 2 डायबेटिक असलेल्या कोणत्याही व्यक्तीला डायबेटिक रेटिनोपॅथी होऊ शकते. मधुमेह जितका जास्त असेल तितकी रक्तातील साखर अनियंत्रित होईल आणि रेटिनोपॅथी होण्याची शक्यता जास्त असेल.

डायबेटिक रेटिनोपॅथीच्या सुरुवातीच्या टप्प्यात तुम्हाला कदाचित लक्षणं दिसणार नाहीत, परंतु कालांतराने तुम्हाला काही लक्षणं जाणवू लागतील. ती अशी –

- अस्पष्ट दिसणं (Blurred vision)

- ठिपके दिसणं कधीकधी ते गडद रंगाच्या तरंगत्या तारांसारखे दिसतात. ते तुमची दृष्टी अस्पष्ट करतात.

- अस्थिर दृष्टी (Fluctuating vision)

- दृष्टी जाणं, ही काही लक्षणं तुम्हाला काही काळाने जाणवतील.

हे वाचा-कपाळावरील पिंपल्स घालवण्याचे हे उपाय करून पाहा; घरच्या-घरी दिसेल जबरदस्त परिणाम

डायबेटिक रेटिनोपॅथीचे दोन प्रकार

अर्ली डायबेटिक रेटिनोपॅथी: डायबेटिक रेटिनोपॅथीच्या सर्वात सामान्य प्रकाराला नॉन-प्रोलिफेरेटिव्ह डायबेटिक रेटिनोपॅथी (NPDR) म्हणतात. यामध्ये नवीन रक्तवाहिन्यांची वाढ थांबते. या स्थितीत, डोळ्यातील पडद्यामधील रक्तवाहिन्यां कमकुवत होतात आणि लहान रक्तवाहिन्यांमधून लहान फुगे बाहेर पडतात. काही वेळा, या रक्तवाहिन्यांमधून द्रव किंवा रक्तदेखील डोळ्यातील पडद्यांमध्ये गळते. अशा वाहिन्यांची संख्या वाढल्यानंतर नॉन-प्रोलिफेरेटिव्ह डायबेटिक रेटिनोपॅथी म्हणतात.

अ‍ॅडव्हान्स डायबेटिक रेटिनोपॅथीः डायबेटिक रेटिनोपॅथी गंभीर स्थितीत पोहोचल्यानंतर ती प्रोलिफेरेटिव्ह डायबेटिक रेटिनोपॅथी (proliferative diabetic retinopathy) म्हणून ओळखली जाते. या स्थितीत, खराब झालेल्या रक्तवाहिन्या बंद होतात, ज्यामुळे डोळ्यातील पडद्यामध्ये नवीन, असामान्य रक्तवाहिन्यांची वाढ होते. ज्यामुळे तुमच्या डोळ्याच्या मध्यभागी भरलेल्या स्पष्ट, जेलीसारख्या पदार्थात पुढे गळती होऊ शकते. जर नवीन रक्तवाहिन्या डोळ्यातून द्रवपदार्थाच्या सामान्य प्रवाहात अडचणी आणत असतील तर त्यामुळे डोळ्यातील बुबुळावर खूप दबाव येऊ शकतो. परिणामी ऑप्टिक नर्व्हचे (optic nerve) नुकसान होऊ शकते. ही नर्व्ह तुमच्या डोळ्यातून तुमच्या मेंदूपर्यंत प्रतिमा घेऊन जाण्याचे काम करत असते, त्यामुळे तिचं नुकसान झाल्याचं त्याचा गंभीर परिणाम होऊ शकतो.

हे वाचा-हवेपासून बनवले शाकाहारी मांस! स्वस्त, मस्त अन् टिकाऊ असल्याचा दावा

डायबेटिक रेटिनोपॅथी होण्यामागची महत्वाची कारणं

दीर्घकाळ मधुमेह असणं, तुमच्या रक्तातील साखरेची नियंत्रण पातळी खराब असणं, उच्च रक्तदाबाचा त्रास असणं, हाय कोलेस्टेरॉल, गर्भधारणा, तंबाखूचं सेवन या गोष्टींमुळे डायबेटिक रेटिनोपॅथी होण्याचं प्रमाण वाढतं, असं तज्ज्ञ सांगतात.

First published:

Tags: Diabetes, Eyes damage