Home /News /lifestyle /

काय आहे चिकन स्किन प्रॉब्लेम? या घरगुती उपायांनी मिळावा नितळ आणि सुंदर त्वचा

काय आहे चिकन स्किन प्रॉब्लेम? या घरगुती उपायांनी मिळावा नितळ आणि सुंदर त्वचा

त्वचेमध्ये होणारे हे बदल (Skin Problems) ही एक सर्व सामान्य प्रक्रिया आहेत. ज्यातून सर्व लोकांना जावे लागते. खडबडीत आणि पुटकुळ्या असलेल्या स्किनला चिकन स्किन (Chicken Skin Problem) म्हणतात. ही समस्या साधारणपणे वयाच्या तिशीनंतर नंतर सुरू होते.

पुढे वाचा ...
  मुंबई, 28 जून : आपली त्वचा आयुष्यभर एकसारखी राहत नाही. वयाच्या प्रत्येक टप्प्यावर तिचा पोत बदलत असतो. किशोरवयात ब्रेकआउटची समस्या असते, मध्यम वयात कोरडी त्वचा आणि वृद्धापकाळात सुरकुत्या येण्याची समस्या असते. त्वचेमध्ये होणारे हे बदल (Skin Problems) ही एक सर्व सामान्य प्रक्रिया आहेत. ज्यातून सर्व लोकांना (Skin Care Tips) जावे लागते. हेल्थलाइनमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, त्वचेवर आणखी एक बदल दिसून येतो आणि तो म्हणजे डोळ्यांखालील भागाच्या त्वचेवर लहान पांढर्‍या रंगाचे बम्प्स म्हणजे पुटकुळ्या दिसणे. अशा खडबडीत आणि पुटकुळ्या असलेल्या स्किनला चिकन स्किन (Chicken Skin Problem) म्हणतात. कधीकधी ते डोळ्यांखाली खूप ठळक आणि खडबडीत दिसतात. जर त्यांच्यामध्ये जळजळ किंवा खाज येत असेल. तर ही समस्या गंभीर असू शकते आणि अशा परिस्थितीत तुम्ही ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधावा. ही समस्या साधारणपणे वयाच्या 30 वर्षानंतर म्हणजेच तिशीनंतर नंतर सुरू होते. ज्याचा प्रभाव केवळ चेहऱ्यावरच नाही तर हात आणि पायांवरही दिसून येतो. चिकन स्किनचे कारण (Chicken Skin Reason) - अनेकवेळा हा त्रास एखाद्या पदार्थाच्या रिऍक्शनमुळे होतो. - काहीवेळा त्वचेच्या छिद्रांमध्ये कॅरेटिन प्रोटीन अडकल्यामुळे चिकन स्किनची समस्या होऊ शकते. - हेअर फॉलिक्समध्ये मृत त्वचा म्हणजेच डेड स्किन जमा झाल्यामुळेही ही समस्या उद्भवते. चिकन स्किनसाठी घरगुती उपचार (Home Remedies) त्वचेला मॉइश्चराइज करणे कोरड्या त्वचेवर चिकन स्किनची समस्या अधिक गंभीर होऊ शकते. अशा परिस्थितीत त्वचेतील ओलावा आणि मॉइश्चरायझेशन (Skin Moisturization) शक्य तितके टिकवून ठेवावे आणि लोशन किंवा मलम लावत राहा.

  Piles Problem : मूळव्याधीचा त्रास नकोच असेल तर आहाराची आजपासूनच घ्या अशी काळजी

  कोमट पाण्याने आंघोळ करा कोमट पाण्याने आंघोळ करताना (Hot Water Bath) त्वचा चांगली घासल्यास मृत त्वचा निघून जाते. असे केल्याने त्वचेचे छिद्र स्वच्छ राहतील आणि सूज येण्याची समस्या होणार नाही. परंतु गरम पाण्यात जास्त वेळ राहू नका. ह्युमिडिफायरचा वापर त्वचेची आर्द्रता टिकवून ठेवण्यासाठी घरीच ह्युमिडिफायर (Use Humidifier) वापरा. यामुळे तुमच्या त्वचेतील ओलावा नैसर्गिकरित्या टिकून राहण्यास मदत होईल.

  Tamarind : चिंच म्हटलं की तोंडाला पाणी सुटतं ना? एकदा त्याचे साईड इफेक्ट समजून घ्या

  गुलाब पाणी वापरा संशोधनात असे आढळून आले आहे की गुलाब पाण्यामध्ये (Use Rose Water) दाहक-विरोधी घटक असतात. जर तुम्ही कापसाच्या साहाय्याने त्वचा पुसली तर त्वचेवरील अशा समस्या टाळता येऊ शकतात.
  Published by:Pooja Jagtap
  First published:

  Tags: Health Tips, Home remedies, Lifestyle, Skin care

  पुढील बातम्या