मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /मानेपासून सुरु होते सर्व्हिकोजेनिक डोकेदुखी, जाणून घ्या याची लक्षणं आणि कारणं

मानेपासून सुरु होते सर्व्हिकोजेनिक डोकेदुखी, जाणून घ्या याची लक्षणं आणि कारणं

सर्व्हिकोजेनिक हेडेक आणि मायग्रेन हे दोन वेगळे प्रकार आहेत; पण त्यातली काही लक्षणं सारखी असू शकतात.

सर्व्हिकोजेनिक हेडेक आणि मायग्रेन हे दोन वेगळे प्रकार आहेत; पण त्यातली काही लक्षणं सारखी असू शकतात.

सर्व्हिकोजेनिक डोकेदुखी नावाचाही एक प्रकार असतो. या डोकेदुखीची सुरुवात मानेपासून होते. याची लक्षणं कोणती आणि त्यावर उपाय कोणते आहेत याबद्दल जाणून घेऊया.

    मुंबई, 25 मे : बऱ्याच जणांना डोकेदुखीचा त्रास होतो. काहींना मायग्रेन, तर काहींना सामान्य डोकेदुखी असते; पण यात सर्व्हिकोजेनिक डोकेदुखी नावाचाही एक प्रकार असतो. या डोकेदुखीची सुरुवात मानेपासून होते. याची लक्षणं कोणती आणि त्यावर उपाय कोणते आहेत, याबद्दल सविस्तर माहिती बेंगळुरूतल्या फोर्टिस रुग्णालयाचे ट्रॉमा, ऑर्थोपेडिक्स, बोन, जॉइंट सर्जरीचे एचओडी डॉ. साई कृष्णा बी. नायडू (एमबीबीएस, एमआरसीएस, Dip SICOT, FRCS Ortho(UK), Mch Ortho) यांनी दिली आहे.

    सर्व्हिकोजेनिक डोकेदुखी (Cervicogenic Headache) म्हणजे काय?

    सर्व्हिकोजेनिक डोकेदुखी मायग्रेन किंवा इतर डोकेदुखीपेक्षा वेगळी असते. यात मानेपासून सुरू होणारी वेदना डोक्याच्या एका बाजूकडून डोक्यापर्यंत जाते.

    कारणं कोणती?

    बऱ्याचदा याचं कारण अज्ञात असतं; पण मानेमुळे उद्भवणाऱ्या समस्या, म्हणजेच व्हिप्लॅश इंज्युरी, मणक्यांच्या समस्या, सांधेदुखी, कम्प्युटर किंवा लॅपटॉपसमोर चुकीच्या पद्धतीने बसून जास्त वेळ काम करणं या गोष्टी सर्व्हिकोजेनिक डोकेदुखीस कारणीभूत असू शकतात. शिवाय हेअरस्टायलिस्ट, आयटी प्रोफएशनल्स, सर्जन यांच्या कामाच्या स्वरूपामुळे त्यांनाही हा त्रास होऊ शकतो.

    लक्षणं

    मानेची हालचाल केल्यावर अचनाक डोकं, मान दुखणं, मळमळ, उलट्या होणे व डोळ्यांभोवती दुखणं ही डोकेदुखीची लक्षणं आहेत.

    इतर लक्षणं

    - डोकं आणि मानेच्या एका बाजूला वेदना होणं

    - सतत वेदना होणं

    - खोकताना, शिंकताना किंवा खोल श्वास घेताना डोकं दुखणं

    - ताठ मानेमुळे मोकळी हालचाल करता न येणं.

    -डोळे किंवा डोक्याच्या एका भागात वेदना होणं

    सर्व्हिकोजेनिक हेडेक आणि मायग्रेन हे दोन वेगळे प्रकार आहेत; पण त्यातली काही लक्षणं सारखी असू शकतात.

    - मळमळ आणि उलट्या होणं

    - हात किंवा खांदा दुखणं

    - जास्त प्रकाशाच्या संपर्कात आल्यावर किंवा मोठा आवाज आल्यावर मळमळ/उलट्या होणं

    - अंधूक दिसणं

    उपाय काय?

    पोश्चरल करेक्शनवर काम करणं (म्हणजेच योग्य बसणं किंवा उभं राहणं), गाडी चालवताना सीट बेल्ट लावणं, मागच्या सीटवर बसला असाल तरी बेल्ट लावणं, मानेच्या स्नायूंना बळकटी देणारे व्यायाम करणं, या गोष्टी सर्व्हिकोजेनिक डोकेदुखी टाळण्यासाठी उपयुक्त ठरतात.

    सर्व्हिकोजेनिक डोकेदुखी आहे, हे मला कसं कळेल?

    या स्थितीचं निदान करणं आव्हानात्मक असू शकतं. त्यामुळे एक्स्क्लुजन क्रायटेरियाच्या आधारे हे फक्त तज्ज्ञच करू शकतात. याचे स्कॅन व इतर चाचण्या नॉर्मल असतात.

    उपचार काय?

    सर्वांत महत्त्वाचं म्हणजे याचं योग्यरीत्या निदान करणं अत्यावश्यक आहे. यानंतर सुरुवातीच्या ट्रीटमेंटमध्ये फिजिकल थेरपी/फिजिओथेरपी सर्वांत महत्त्वाची आहे. याशिवाय TENS मशीन, नेक इंजेक्‍शनही मदतीची ठरू शकतात.

    SNAG म्हणजेच सस्टेन्ड नॅचरल अपोहिसील ग्लाइडसारखे घरगुती उपचार वेदना कमी करण्यास मदत करतात. SNAG 2021 च्या चाचण्या खूप प्रभावी असल्याचं दिसून आलं आहे. आयबूप्रोफेन व स्नायू शिथिल करणारी औषधंही फायद्याची ठरतात. याशिवाय चांगली झोप, योगासनं आणि हायड्रोथेरपीही खूप उपयुक्त ठरते.

    तणावामुळे सर्व्हिकोजेनिक डोकेदुखी होऊ शकते का?

    नाही; पण तणाव त्यात भर घालू शकतो. झोपेचा अभाव, धूम्रपान आणि मद्यपान यामुळे डोकेदुखीचा त्रास वाढू शकतो.

    First published:
    top videos

      Tags: Health, Health Tips, Life18, Lifestyle