हे पदार्थ खाऊन दम्यापासून करा स्वतःचं संरक्षण, मिळवा आराम

हे पदार्थ खाऊन दम्यापासून करा स्वतःचं संरक्षण, मिळवा आराम

दम्याचा आजार कोणालाही आणि कोणत्याही वयात होऊ शकतो. लहान मुलांमध्ये आणि वृद्ध माणसांमध्ये दम्याचा आजार होणं सामान्य गोष्ट झाली आहे.

  • Share this:

दमा (Asthama) हा एक गंभीर आजार आहे. या आजारावर वेळीच उपचार घेतले नाही तर यामुळे मृत्यूही होऊ शकतो. यात श्वास घ्यायला त्रास होतो. श्वासनलिकेतून फुफ्फुसांमधील हवा आत- बाहेर होते. दमाच्या आजार सुरू झाल्यास श्वासनलिकांना सूज येते, यामुळे नलिका आकुंचित पावल्यामुळे श्वास घ्यायला त्रास होतो. दम्याचा त्रास पूर्णपणे बरा होऊ शकत नाही. पण यावर नियंत्रण ठेवता येणं शक्य आहे. दम्याचा आजार कोणालाही आणि कोणत्याही वयात होऊ शकतो. लहान मुलांमध्ये आणि वृद्ध माणसांमध्ये दम्याचा आजार होणं सामान्य गोष्ट झाली आहे.

धुरामुळे दम्याचा अटॅक होण्याचा धोका जास्त- वातावरणातील बदल, धूळ- माती, प्रदुषण आणि धुरामुळे दम्याचा अटॅक येण्याची शक्यता जास्त असते. यामुळे छातीत जळजळ होणं, खोकला, नाक दुखणं आणि श्वास घ्यायला  त्रास होण्यासारखे त्रास सतत होऊ लागतात. याशिवाय भावनिकरित्या ढासळल्यानंतरही दम्याचा अटॅक येऊ शकतो. तसेच गवत, लाकूड, गॅस, पेन्ट, स्मोकिंग आणि रासायनिक पदार्थांच्या वासामुळे अनेकांना दम्याचा अटॅक येतो.

वायरल इन्फेक्शनमुळे दम्याचा त्रास होतो- हवामानातील बदलामुळे वायरल इन्फेक्शन होतं, ज्यामुळे दम्याचा त्रास वाढू शकतो. तर परफ्यूम, हेअर स्प्रेसारख्या वस्तूंच्या वासाने दम्याचा अटॅक येण्याचा धोका वाढतो. ब्रेड, पास्ता, केक आणि पेस्ट्रीसारख्या गोष्टी अतिरिक्त प्रमाणात खाल्ल्यामुळेही दम्यचा त्रास बळावू शकतो. एवढंच नाही तर शेंगदाणे, सोयाबीन, मासे, अंडी, दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमुळेही हा आजार वाढू शकतो.

यापासून वाचण्यासाठी दलिया आणि ब्राउन राइस नक्की खा-

दमा झाल्यास सतत शिंक येणं, श्वास लागणं, छातीत दुखणं अशी काही लक्षणं प्रकर्षाने दिसून येतात. दम्यापासून वाचण्यासाठी ताजी फळं, भाज्या, दलिया, ब्राउन राइस, कडधान्य खाण्याकडे विशेष भर द्या. जर तुम्हाला दम्याचा त्रास आहे तर थंड पेय, दुग्धजन्य पदार्थ, मटण, मैदा यांसारखे पदार्थ खाऊ नका. नियमितपणे योग, व्यायाम केल्यास दमा नियंत्रणात ठेवता येतो.

टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.

VIDEO: पंतप्रधान मोदींच्या या 7 फेवरेट आसनांनी फिटनेस आहे 'मुमकिन'

...म्हणून पंतप्रधान मोदी आहेत फिट, असा असतो त्यांचा दिवसभराचा हेल्दी आहार

डेंग्यूशी निगडीत या 7 गैरसमजांवर तुम्हीही ठेवत असाल डोळे बंद ठेवून विश्वास

जेव्हा साडी नेसून मुलांनी केला रॅम्प वॉक, TikTok व्हिडीओ झाला VIRAL

First published: September 17, 2019, 4:00 PM IST
Tags: lifestyle

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading