श्रद्धा कपूर आहे Physical Anxiety ने त्रस्त; नक्की हा आजार असतो तरी काय, इथे घ्या जाणून

श्रद्धा कपूर आहे Physical Anxiety ने त्रस्त; नक्की हा आजार असतो तरी काय, इथे घ्या जाणून

शरीरात एक वेगळंच दुखणं असतं. कोणत्याच चाचणीत हे दुखणं दिसत नाही. अनेक चाचण्या करूनही डॉक्टरांना काहीच आजार दिसला नाही.

  • Share this:

बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरने नुकताच तिच्या आजारपणाबद्दलचा मोठा खुलासा केला. ती एग्झायटी या आजाराशी लढत असल्याचं म्हटलं. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत श्रद्धाने 'आशिकी 2' सिनेमानंतर ती या आजाराशी लढत असल्याचं सांगितलं. याबद्दल सविस्तर बोलताना श्रद्धा म्हणाली की, 'मला माहीत नव्हतं की एग्झायटी म्हणजे नक्की काय असतं. याबद्दल मला फार उशीरा कळालं. 'आशिकी 2' सिनेमानंतर माझ्यात या आजाराची लक्षणं दिसू लागली. शरीरात एक वेगळंच दुखणं असतं. कोणत्याच चाचणीत हे दुखणं दिसत नाही. अनेक चाचण्या करूनही डॉक्टरांना काहीच आजार दिसला नाही. विचित्र गोष्ट म्हणजे मी नेहमी याचा विचार करायचे की नक्की मला का दुखतंय. पण याचं कोणतंच उत्तर मिळायचं नाही. स्वतःलाच विचारायचे की हे मला का होतंय.' अनेकदा लोकांना योग्य माहिती आणि जागरूकता नसल्यामुळे एग्झायटी आणि डिप्रेशनसारख्या आजारांबद्दल कळतच नाही.

काय असते एग्झायटी-

ही एक अशी अवस्था असते ज्यात पीडित सतत चिंतेत असतो. त्याला सतत अस्वस्थ वाटत असतं. तसंच वर्तमानच्या आणि काल्पनिक घटनांचा विचार करून भविष्याची चिंता सतत सतावत असते. थकवा, डोकेदुखी आणि निद्रानाश ही काही एग्झायटीची प्रमुख लक्षणं आहेत. ही काही लक्षणं असली तरी प्रत्येक व्यक्तीनुसार लक्षणं बदलू शकतात. मात्र घाबरणं आणि सतत चिंतेत राहणं ही लक्षणं सर्व रुग्णांमध्ये दिसून येतात.

या आजारामुळे दिवसभरातले नियमित काम करणंही कठीण होऊन जातं. जर हा आजार दीर्घकाळ राहिला तर यामुळे औदासिन्य येऊ शकतं. एग्झायटीचे रुग्ण लोकांशी दूर राहणं पसंत करतात आणि त्यांच्यात आत्महत्या करण्याचे विचार जास्त येतात. हा आजार बळावल्यास लक्ष केंद्रीत करणं कठीण होऊन जातं. याशिवाय कोणत्या कामात मन लागत नाही. एवढंच नाही तर स्मरणशक्तीवरही याचा परिणाम होतो.

एग्झायटीचे प्रकार-

ऑब्सेसिव्ह कम्पलसिव्ह डिसऑर्डर

जनरलाइज्ड एग्झायटी डिसऑर्डर

पॅनिक डिसऑर्डर

पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस

सोशल एग्झायटी डिसऑर्डर

हे वाचल्यावर तुम्ही कधीही उभं राहून जेवण्याचा विचार करणार नाही

या एका योगासनात आहे अनेक आजार नष्ट करण्याची ताकद

तुम्ही सतत सकाळचा नाश्ता चुकवता का.. तर हे एकदा वाचाच!

ज्योतिषशास्त्रातील या उपायांनी ग्रह दोष होतील दूर

 

First published: September 15, 2019, 1:53 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading