मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Alcoholic Cardiomyopathy : हृदयासाठी ठरू शकतं घातक! पाहा काय आहे बिंज ड्रिंकिंग

Alcoholic Cardiomyopathy : हृदयासाठी ठरू शकतं घातक! पाहा काय आहे बिंज ड्रिंकिंग

अनेकांना तर असं वाटतं की, चांगला वेळ व्यतीत करण्यासाठी बिंज ड्रिंकिंग महत्त्वाचं आहे. काही जण ड्रग म्हणून अल्कोहोल घेत नाहीत आणि त्यांना असंही वाटतं, की बिंज ड्रिंकिंग हृदयासाठीही चांगलं असतं.

अनेकांना तर असं वाटतं की, चांगला वेळ व्यतीत करण्यासाठी बिंज ड्रिंकिंग महत्त्वाचं आहे. काही जण ड्रग म्हणून अल्कोहोल घेत नाहीत आणि त्यांना असंही वाटतं, की बिंज ड्रिंकिंग हृदयासाठीही चांगलं असतं.

अनेकांना तर असं वाटतं की, चांगला वेळ व्यतीत करण्यासाठी बिंज ड्रिंकिंग महत्त्वाचं आहे. काही जण ड्रग म्हणून अल्कोहोल घेत नाहीत आणि त्यांना असंही वाटतं, की बिंज ड्रिंकिंग हृदयासाठीही चांगलं असतं.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 24 जानेवारी : बहुतांश जणांना असं वाटतं, की बिंज ड्रिंकिंगमुळे काही त्रास होत नाही. (बिंज ड्रिंकिंग म्हणजे कमी कालावधीत जास्त प्रमाणात मद्यपान करणं.) अनेकांना तर असं वाटतं की, चांगला वेळ व्यतीत करण्यासाठी ते महत्त्वाचं आहे. काही जण ड्रग म्हणून अल्कोहोल घेत नाहीत आणि त्यांना असंही वाटतं, की बिंज ड्रिंकिंग हृदयासाठीही चांगलं असतं.

मात्र मद्यपानामुळे तसंच दीर्घ काळ जास्त मद्यपान केल्यामुळे हृदयाला जास्त धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे अल्कोहोलिक कार्डिओमायोपॅथी होण्याची शक्यता वाढू शकते. अ‍ॅस्टर सीएमआय हॉस्पिटल, बेंगळुरू येथील सीनिअर कन्सल्टंट, इंटरव्हेशनल कार्डिऑलॉजी डॉ. प्रदीपकुमार डी यांनी याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.

Health Tips : तिशीनंतर महिलांनी करून घ्यायलाच हव्यात या पाच तपासण्या

अल्कोहोलिक कार्डिओमायोपॅथी म्हणजे काय?

अतिरिक्त प्रमाणात मद्यपान हे अनेकदा उच्च रक्तदाबाला कारणीभूत ठरतं. त्यामुळे हृदयाचे स्नायू दुर्बल होतात. परिणामी हृदयाला रक्ताचं पम्पिंग योग्य रीतीने करणं अवघड होतं. त्यामुळे हृदय प्रसरण पावतं आणि पातळ होतं. त्यामुळे जास्त रक्तधारण करू शकत नाही. त्याचा परिणाम रक्तावर आणि हृदयाच्या स्नायूंवर होतो. उच्च रक्तदाबावर दीर्घ काळ उपचार केले नाहीत, तर हार्ट फेल्युअर होऊ शकतं.

कार्डिओमायोपॅथी म्हणजे हृदयाच्या स्नायूचा विकार. दीर्घ काळ मद्यपान केल्यामुळे कार्डिओमायोपॅथी होते. त्यामुळे हृदयाचे स्नायू अ‍ॅबनॉर्मल अर्थात असामान्य प्रकारे प्रसरण पावतात. कार्डिओमायोपॅथीवर बराच काळ उपचार केले नाहीत, तर प्राणघातक परिस्थिती उद्भवू शकते. त्यामुळे हृदयाचे ठोके अनियमत होऊ शकतात. त्यातून रक्त साठून हार्ट फेल्युअर म्हणजे कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअरचा धोका वाढू शकतो. अशी स्थिती सहसा 35 ते 50 वर्षं वयोगटातल्या व्यक्तींमध्ये आढळते आणि महिलांपेक्षा पुरुषांमध्ये ही परिस्थिती तयार होण्याचं प्रमाण जास्त आहे.

ज्या व्यक्ती 5 ते 15 वर्षं किंवा त्याहून जास्त काळ खूप जास्त प्रमाणात मद्यपान करतात, त्यांना अल्कोहोलिक कार्डिओमायोपॅथी होण्याचा होण्याची जोखीम जास्त असते. हेवी ड्रिंकिंग म्हणजेच खूप जास्त प्रमाणात मद्यपान करणाऱ्या व्यक्ती कोण हे ठरवण्यासाठी काही निकष आहेत. दर आठवड्याला 14हून अधिक किंवा दर दिवशी 4हून अधिक ड्रिंक्स घेणारे पुरुष, तसंच, दर दिवशी 3हून अधिक किंवा आठवड्यात 7 ड्रिंक्स घेणाऱ्या महिलांचा समावेश हेवी ड्रिंकर्स या कॅटेगरीत होतो. त्यांना अल्कोहोलिक कार्डिओमायोपॅथी होण्याची शक्यता जास्त असते.

याचे संकेत आणि लक्षणं कोणती?

अल्कोहोलिक कार्डिओमायोपॅथी प्रगत टप्प्यावर म्हणजेच अ‍ॅडव्हान्स्ड स्टेजमध्ये जाईपर्यंत कोणतीही लक्षणं दिसत नाहीत; मात्र ज्या व्यक्तींना अ‍ॅडव्हान्स्ड स्टेजमध्ये अल्कोहोलिक कार्डिओमायोपॅथी झाली आहे, त्यांच्यामध्ये पुढे दिलेली लक्षणं दिसतात.

1. थकवा

2. विश्रांती घेताना किंवा परिश्रम करताना धाप लागणं

3. पाय, तळवे, घोट्याला सूज येणं

4. लघवीमध्ये बदल होणं

5. भूक कमी होणं

6. एकाग्रता कमी होणं

7. अशक्तपणा, चक्कर येणं, शुद्ध हरपणं, डोकं हलकं झाल्यासारखं वाटणं

8. नाडीचा वेग वाढणं

9. खोकल्यातून गुलाबी रंगाचा म्युकस बाहेर पडणं आणि झोपल्यावर खोकला येणं

10. द्रवपदार्थ साठल्यामुळे अ‍ॅब्डॉमिनल ब्लोटिंग अर्थात गोळा येणं

11. छातीत दुखणं

कार्डिओमायोपॅथी का होते?

कार्डिओमायोपॅथीची कारण बऱ्याचदा कळतच नाहीत; पण काही केसेसमध्ये डॉक्टर्स त्यासाठी कारणीभूत ठरलेले घटक ओळखू शकतात. ते असे आहेत -

1. जनुकीय परिस्थिती

2. हार्ट रेट वाढणं आणि ब्लड प्रेशरचा त्रास दीर्घ काळ असणं

3. हृदयाच्या झडपांमध्ये समस्या असणं

4. पूर्वी आलेल्या अ‍ॅटॅकमुळे हृदयाच्या टिश्यूला दुखापत होणं

5. खूप प्रमाणात मद्यपान आणि ड्रग्जचं सेवन करणं

6. लठ्ठपणा, थायरॉइड आणि अन्य विकार

7. प्रेग्नन्सीमध्ये गुंतागुंत निर्माण होणं

कार्डिओमायोपॅथीचं निदान कसं करतात?

कार्डिओमायोपॅथीचं निदान करण्यासाठी डॉक्टर्स काही टेस्ट्स करतात. त्या अशा -

1. छातीचा एक्स रे काढून हृदयाच्या आकारात वाढ झाली आहे का ते तपासलं जातं.

2. हृदयाचे व्हॉल्व्ह्ज अर्थात झडपांचं कार्य तपासण्यासाठी इकोकार्डिओग्राम तपासणी केली जाते. त्याचा काही उपयोग झाला नाही, तर डॉक्टर्स कार्डिअ‍ॅक मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग (MRI) करू शकतात.

3. हृदयात काही ब्लॉकेजेस आहेत का किंवा काही अ‍ॅबनॉरमॅलिटीज आहेत का, हे तपासण्यासाठी इलेक्ट्रोकार्डिओग्राम (ECG) काढला जातो.

4. व्यायाम किंवा परिश्रमांमुळे हृदयाच्या अनियमित गतीमध्ये वाढ होत आहे का, हे तपासण्यासाठी ट्रेडमिल स्ट्रेस टेस्ट केली जाते.

5. हृदयाद्वारे शरीरात रक्ताचं पम्पिंग जबरदस्तीने केलं जात आहे का, हे तपासण्यासाठी कार्डिअ‍ॅक कॅथेटरायझेशन केलं जातं.

6. हृदय आणि त्याच्या झडपांचा आकार आणि त्यांचं कार्य यांचं मूल्यमापन करण्यासाठी सीटी-स्कॅन केलं जातं.

7. शरीरातली लोहाची पातळी तपासण्यासाठी, तसंच थायरॉइड, लिव्हर आणि किडनी यांचं कार्य तपासण्यासाठी रक्ताच्या चाचण्या केल्या जातात.

8. विकार जन्मजात आहे का, किंवा आनुवंशिक आहे का, याचं निदान करण्यासाठी डॉक्टर्स जेनेटिक टेस्ट करू शकतात.

कार्डिओमायोपॅथीवर उपचारांचे पर्याय कोणते आहेत?

कार्डिओमायोपॅथीवर उपचारांचे अनेक पर्याय आहेत; मात्र ते आजाराचा प्रकार आणि तीव्रता यांवर अवलंबून आहेत.

- डायलेटेड कार्डिओमायोपॅथीच्या बाबतीत डॉक्टर्स हार्ट फंक्शन सुधारण्यासाठीची औषधं देऊ शकतात; मात्र परिस्थिती गंभीर झाली, तर सर्जिकल इम्प्लांटची शिफारस डॉक्टर करू शकतात.

- रिस्ट्रिक्टिव्ह कार्डिओमायोपॅथीच्या बाबतीत डॉक्टर ब्लड प्रेशर कमी करण्याच्या दृष्टीने औषधयोजना सुचवू शकतात. तसंच, उच्च रक्तदाबाच्या पातळीकडे, पाणी आणि मीठाच्या आहारातल्या प्रमाणाकडे आणि शरीराच्या वजनाकडे लक्ष ठेवण्यास सांगू शकतात.

- कार्डिओमायोपॅथीने गंभीर रूप धारण केलं असेल, तर व्हेंट्रिक्युलर असिस्ट डिव्हाइस किंवा हार्ट ट्रान्स्प्लांट अर्थात हृदय प्रत्यारोपणाची शिफारस केली जाते.

अल्कोहोलिक कार्डिओमायोपॅथीला दूर ठेवण्यासाठी काय करता येऊ शकतं?

अल्कोहोलिक कार्डिओमायोपॅथीची जोखीम कमी करण्यासाठी अनेक टप्पे आहेत. ते असे -

1. मद्यपान नियंत्रित करा किंवा मद्यपान पूर्ण बंदच करा.

2. सोडिअम शरीरात जाण्याचं प्रमाण कमी करा.

3. आहारात द्रवपदार्थ कमी प्रमाणात घ्या, जेणेकरून हृदयावरचा ताण कमी होऊ शकेल.

4. व्यायाम भरपूर करा; मात्र तुम्हाला हृदयरोग किंवा हृदयाशी निगडित समस्या असेल, तर कठोर (दमवणारे) व्यायाम टाळा.

5. धूम्रपान टाळा.

6. साखर, सॅच्युरेटेड फॅट्स, प्रक्रियायुक्त पदार्थ यांचं आहारातलं प्रमाण कमी करा.

7. बॉडी मास इंडेक्स (BMI) आरोग्यपूर्ण राहील, याची काळजी घ्या.

खूप जास्त म्हणजे नेमकं किती?

बिंज ड्रिंकिंग किंवा ऑकेजनल ड्रिंकिंग (प्रासंगिक मद्यपान) आरोग्यासाठी चांगलं असतं, असं काही अभ्यासांमध्ये म्हटलेलं आहे; मात्र मद्यपान टाळणं हे सर्वोत्तम. हृदयरोगाची जोखीम करण्यासाठी मद्यपान करायला सुरुवात करणं योग्य नाही. त्याऐवजी योगासनांसारखे आरोग्याला उपयुक्त असे पर्याय निवडायला हवेत.

थोडक्यात सांगायचं, तर मद्यपानामुळे हृदयाला होऊ शकणाऱ्या संभाव्य छोट्या फायद्यांच्या तुलनेत त्यामुळे कॅन्सर किंवा लिव्हरचे गंभीर आजार होण्याची जोखीम खूप मोठी आहे. त्यामुळे दीर्घ आणि आरोग्यपूर्ण जीवन जगायचं असेल, तर हृदयरोग होण्याची जोखीम टाळण्यासाठी नियमित व्यायाम, आरोग्यपूर्ण आहार (हेल्दी डाएट) असे सुरक्षित पर्याय निवडण्याची गरज आहे.

(सूचना : या लेखात दिलेली माहिती आणि सूचना सामान्य माहितीवर आधारित आहेत. News 18 Marathi यांना दुजोरा देत नाही. यांची अंमलबजावणी करण्याआधी संबंधित तज्ज्ञाशी संपर्क करा.)

First published:

Tags: Health, Health Tips, Lifestyle