ताकद देणारं अंड तुमचा जीवही घेऊ शकतं, ही घ्या काळजी!

अंड्यांमुळे शक्ती वाढते हे खरं असलं तरी खातांना थोडी काळजी घ्यावी लागाते. त्यासाठी काय काळजी घ्यावी हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

  • Share this:

संडे हो या मंडे, रोज खाएं अंडे असं म्हटलं जातं. अंड्यांमुळे शक्ती वाढते हे खरं असलं तरी खातांना थोडी काळजी घ्यावी लागाते. नाही तर अंडी खाणं तुमच्या जीवावर बेतू शकतं. त्यासाठी काय काळजी घ्यावी हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

अंडी हे शरीरातल्या प्रोटीनची गरज पूर्ण करतं. अंड खाल्ल्यानंतर त्यातल्या प्रोटीनचं रुपांतर एल्बुमिनमध्ये होतं. शरीरातल्या अनेक गरजा त्यामुळे पूर्ण होतात. साधारणपणे दोन अंडी खाणं हे आरोग्यासाठी चांगलं आहे. मात्र त्यापेक्षा जास्त अंडी खायची असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे.

जे लोक बॉडी बिल्डिंग त्यांना प्रोटीनची जास्त गरज असते. पण इतरांसाठी त्याची गरज वेगळी आहे. त्यामुळे सामान्य माणसाला दोनपेक्षा जास्त अंडी खाल्ल्यामुळे अपाय होऊ शकतो. पोट बिघडणं, अ‍ॅसिडीटी त्याचबरोबर दीर्घकाळासाठी किडनीही खराब होऊ शकते कारण जास्त प्रोटीन पचविण्यासाठी त्याला जास्त काम करावं लगातं.

जास्त अंडी खाल्ल्यामुळे उत्तर प्रदेशात एका तरुणाचा मृत्यू झाला होता. त्यामुळे किती अंडी खावी आणि किती अंडी खावू नये यावर देशभर चर्चा सुरू झालीय.

भरपूर प्रोटीन असल्याने अंडी हिवाळ्यात खाल्ली जातात. त्यात 9 प्रकारचे अमीनो अ‍ॅसिड असतात. त्याचबरोबर ओमेगा 3नही असतं.

दररोज दोन अंडी खाणं हे बुद्धिलाही फायदेशीर असून त्यामुळे बुद्धीचा तल्लखपणा वाढतो आणि तरतरीतही वाटतं.

जगभरात झालेल्या संशोधनामध्येही अंडी खाणं फायद्याचं आहे असं आढळून आलंय. डॉक्टरही अंडी खाण्याचा सल्ला देतात.

अंडी ही स्वस्त आणि मिळायला सोपी असल्यामुळे ती सर्वसामान्यांच्या अवाक्यात आहेत. त्यामुळे गरीबांसाठीही ते चांगलं खाद्य आहे.

पण कुठलीही गोष्ट चांगली असली की तिचा अतिरेक करू नये. त्याचं प्रमाण योग्य असलं तरच ते फायद्याचं असतं. तेच अंड्यांच्याबाबतीतही खरं असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय.

अंड्यांचा पांढरा भाग फॅट आणि कोलेस्टेरॉल-फ्री असतो. 100 ग्रॅम अंड्याच्या पिवळ्या भागात 16 तर पांढऱ्या भागात 11 ग्रॅम प्रोटीन असतं

प्रोटीनमुळे प्रकृती चांगली तर राहतेच त्याचबरोबर डोळे, नखं आणि कासांसाठीसुद्धा अंड उत्तम आहार आहे. फक्त त्याचं प्रमाण योग्य असावं लागतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: eggs
First Published: Nov 6, 2019 10:10 PM IST

ताज्या बातम्या