SEX मध्ये BREAK; सेक्स थांबल्यावर शरीरावर त्याचा काय परिणाम होतो?

SEX मध्ये BREAK; सेक्स थांबल्यावर शरीरावर त्याचा काय परिणाम होतो?

एक वेळ अशी येते जेव्हा नियमितपणे लैंगिक संबंध ठेवणाऱ्यांना सेक्स (sex) काही काळ थांबवणं किंवा सेक्समधून ब्रेक घ्यावासा वाटतो.

  • Last Updated: Nov 26, 2020 01:58 PM IST
  • Share this:

काही कपल नियमित सेक्स (SEX) करत असले तरी त्यांच्यावर एक वेळ अशी येते जेव्हा त्यांना सेक्स थांबवावा किंवा सेक्समधून ब्रेक घ्यावासा वाटतो. अशी परिस्थिती काही आठवडे किंवा काही महिने टिकू शकतो आणि याची अनेक कारणं आहेत. आरोग्यस्थिती, व्यस्त जीवनशैली, ताणतणाव, नातेसंबंधात उतार-चढाव किंवा आपल्या कामवासनेमध्ये व्यत्यय आणणार्‍या औषधांचा सेवनामुळे असं असू शकतं. कारणं काहीही असोत आणि हे वर्तन बाळगण्याचा अचूक कालावधी काहीही (व्यक्तिगत) असू शकतो. दीर्घ कालावधीसाठी लैंगिक संबंध न ठेवल्यास आपल्या आरोग्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो.

तणावाची पातळी वाढू शकते

लैंगिक क्रिया शरीरात एंडोर्फिन आणि ऑक्सिटोसिनचं प्रमाण वाढवतं. केवळ संप्रेरकच नाही तर न्युरोट्रांसमीटर देखील आहेत जे तणाव, मनस्थिती आणि झोपेचं नियमन करण्यास मदत करतात. लैंगिक संबंध न ठेवल्यास शरीरात एंडोर्फिन आणि ऑक्सिटोसिनचं प्रमाण कमी होऊ शकते, ज्यामुळे तुमची तणाव पातळी वाढू शकते. यामुळे चिडचिडेपणादेखील वाढू शकतो आणि झोपेच्या समस्या होऊ शकतात. शारीरिक व्यायाम किंवा मालिश करणं यादरम्यान एंडॉर्फिन आणि ऑक्सिटोसिनची पातळी वाढवण्यात मदत करू शकतं.

योनीच्या समस्या उद्भवू शकतात

ऐकण्यास विचित्र वाटू शकेल मात्र नियमितपणे काही काळ संभोगानंतर लैंगिक संबंध थांबवणार्‍या स्त्रीच्या योनीत काही अनपेक्षित बदल होऊ शकतात. योनीच्या भोवतीचा क्षेत्र संकुचित होऊ शकतो, जे चांगलं नाही. जेव्हा खूप कालावधीनंतर पुन्हा सेक्स करायला जाल तेव्हा संकुचित झालेल्या योनीमुळे योनीत वेदना जाणवतील, रक्तस्त्राव देखील होऊ शकतो. यावेळी ओटीपोटाचा तळाचे व्यायाम आणि हस्तमैथुन केल्यास असे होण्याची शक्यता कमी होऊ शकते.

आपली रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होऊ शकते

लैंगिक संबंध सुधारित प्रतिकारशक्तीशी जोडलेले आहेत. एका अभ्यासानुसार ज्यांनी लैंगिक संबंध ठेवले आहेत त्यांच्या शरीरात इम्युनोग्लोबुलिन ए याची पातळी वाढलेली असते. इम्युनोग्लोबुलिन ए किंवा आयजीए एक प्रतिपिंड आहे जो संक्रमणास प्रतिबंधित करण्यास मदत करतो. अगदी सर्दीसारख्या विषाणूजन्य आजारात देखील हा कार्य करतो. आपण संभोग करणं थांबवल्यास आपल्या शरीरात इम्युनोग्लोबुलिन ए ची पातळी कमी होऊ शकते. अशा वेळी सकस आहार, पुरेसा व्यायाम करून तुम्ही या समस्येवर मात करू शकता. यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता.

हृदयाच्या आरोग्यावर दुष्परिणाम

नियमित संभोग केल्याने तुमच्या शरीराला संप्रेरक तसंच एरोबिक उत्तेजन मिळतं. लैंगिक क्रिया हा हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी व्यायामाचा एक चांगला प्रकार मानला जातो.त्यामुळे जेव्हा आपण संभोग करणे थांबवतो, तेव्हा त्याचा आपल्या हृदयाच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. लैंगिक संबंधांपासून दूर राहण्यामुळे हृदयाच्या आरोग्यावर काय परिणाम होतो हे दर्शवण्यासाठी पुरेसं संशोधन अद्याप नाही. मात्र तरी अशावेळी रनिंग किंवा जीममध्ये जाऊन धोका कमी करता येऊ शकतो.

अधिक माहितीसाठी वाचा आमचा लेख – लैंगिक आरोग्य

न्यूज18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या, विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत. myUpchar.com या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार, डॉक्टरांच्या सोबत काम करून, आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात.

अस्वीकरण: आरोग्य विषयक समस्या आणि त्याविषयीचे उपचार याची माहिती सर्वाना सहज सुलभतेने कुठल्याही मोबदल्याशिवाय उपलब्ध व्हावी हा या लेखांचा हेतू आहे. या लेखनामध्ये प्रकाशित माहिती म्हणजे तज्ञ अधिकृत डॉक्टरांच्या तपासणी, रोगनिदान, उपचार आणि वैद्यकीय सेवेचा पर्याय नाही. जर तुमची मुले, कुटुंबातील सदस्य, नातेवाईक यापैकी कुणीही आजारी असतील, त्यांना याठिकाणी वर्णन केलेली काही लक्षणे दिसत असतील तर, कृपया तत्काळ आपल्या डॉक्टरांना जाऊन भेटा. डॉक्टरांच्या मार्गदर्शना शिवाय स्वतः, तुमची मुले, कुटुंब सदस्य, किंवा अन्य कुणावरही वैद्यकीय उपचार करू नका किंवा औषधे देवू नका. myUpchar आणि न्यूज18 यावर प्रकाशित माहिती, त्या माहितीच्या अचूकतेवर, या माहितीच्या परिपूर्णते वर विश्वास ठेवल्याने, तुम्हाला कुठलीही हानी झाली किंवा काही नुकसान झाले तर, त्याला myUpchar आणि न्यूज18 जबाबदार असणार नाही, हे तुम्हाला मान्य आहे, आणि त्याच्याशी तुम्ही सहमत आहात.

First published: November 26, 2020, 1:58 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading