Home /News /lifestyle /

विद्युत दाहिनीत मृतदेहाचं नेमकं काय होतं? डॉक्टरचा मोठा खुलासा

विद्युत दाहिनीत मृतदेहाचं नेमकं काय होतं? डॉक्टरचा मोठा खुलासा

विद्युत दाहिनीत अंत्यसंस्कार करताना मृतदेह हा इलेक्ट्रीक मशिनमध्ये ठेवला जातो. अंत्यसंस्कार झाल्यानंतर नातेवाईकांना एका कलशामध्ये अस्थि (राख) दिल्या जातात. अमेरिकेतील एका डॉक्टरने मात्र विद्युत दाहिनीमध्ये मृतदेहाचं नेमकं काय होतं? याबाबत मोठा खुलासा केला आहे.

पुढे वाचा ...
मुंबई, 21 ऑगस्ट: हिंदू धर्मात मृत्यू झाल्यानंतर मृतदेहाला अग्नी देऊन दहन करीत अंत्यसंस्कार केले जातात. मृतदेह दहन करण्यासाठी (Cremation Of Dead Bodies) लाकडांची चिता रचली जाते. पण एका माणसाचा मृतदेह जाळण्यासाठी लाकूड फार लागते. पर्यावरणाच्या दृष्टीने हे योग्य नाही. त्यामुळेच आता बदलत्या काळात लाकूड वाचविण्यासाठी विद्युत दाहिनीत (Electronic Cremation House) अंत्यसंस्कार करण्यात येऊ लागले आहेत. विद्युत दाहिनीत अंत्यसंस्कार करताना मृतदेह हा इलेक्ट्रीक मशिनमध्ये ठेवला जातो. अंत्यसंस्कार झाल्यानंतर नातेवाईकांना एका कलशामध्ये अस्थि (राख) दिल्या जातात. अमेरिकेतील एका डॉक्टरने मात्र विद्युत दाहिनीमध्ये मृतदेहाचं नेमकं काय होतं? याबाबत मोठा खुलासा केला आहे. या डॉक्टरांच्या मते, विद्युत दाहिनीत केलेल्या दहनाबाबत आपण जो विचार करतो, त्यापेक्षा वास्तविकता ही खूपच वेगळी आहे. एनएचएस सर्जन डॉ. करण राजन (Dr Karan Rajan) यांनी टिकटॉक (Tiktok) वर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी विद्युत दाहिनीमध्ये मृतदेहावर कशा प्रकारे अंत्यसंस्कार होतात, याबाबतची माहिती त्यांच्या फॉलोअर्ससाठी दिली आहे. व्हिडीओमध्ये डॉ. राजन म्हणतात की, ‘विद्युत दाहिनीमध्ये मृतदेहावर अंत्यसंस्कार करताना मृतदेह जळून त्याची राख होत नाही. जेव्हा आपण लाकडाच्या मदतीने मृतदेहावर अंत्यसंस्कार करतो, तेव्हा शरीर पूर्ण जळते, आणि त्याची राख होते. हिच राख आपण अस्थिकलशमध्ये भरतो, व तिचे विसर्जन नदीत करतो. मात्र, विद्युत दाहिनीमध्ये असं होत नाही.’ विद्युत दाहिनीत नेमकं काय होतं? विद्युत दाहिनीमध्ये मृतदेहाचं काय होतं? याबाबत सांगताना डॉ. राजन यांनी व्हिडीओमध्ये म्हटलं आहे, ‘जेव्हा लाकडाच्या मदतीने मृतदेह जाळला जातो, तेव्हा संपूर्ण शरीर जळून त्याची राख होते. मात्र, विद्युत दाहिनीमध्ये प्रत्यक्षात शरीरावरील मांस जळते, हाडे जळत नाहीत. त्यामुळे या हाडांना एका मशीनमध्ये टाकून त्याची बारीक पावडर केली जाते. ही पावडरच लोकांना अस्थि म्हणून कलशमध्ये दिली जाते.’ लोकांना बसला धक्का 20 ऑगस्टला डॉ. करण यांनी हा व्हिडीओ शेअर केला. तो आतापर्यंत 6 लाखांपेक्षा जास्त वेळा पाहिला गेला आहे. या व्हिडीओमुळे हिंदू धर्मातील अनेकांना धक्का बसला आहे. यासोबतच अनेकांनी आपले अनुभवही शेअर केले. विद्युत दाहिनीत अंत्यसंस्कार केल्यामुळे कशा पद्धतीने नातेवाईकांना त्रास झाला, याबाबतही काहींनी माहिती दिली. एका युजरने कमेंटमध्ये म्हटले आहे की, ‘जवळच्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या मृतदेहावर कधीच विद्युत दाहिनीमध्ये अंत्यसंस्कार करणार नाही.’ तर एका युजरने कमेंट देताना म्हटलयं, ‘आमच्या संस्कृतीत मृतदेह दफन केले जातात, जाळले जात नाहीत, हे चांगले आहे.’
First published:

Tags: Dead body

पुढील बातम्या