तापमान चाळीशी पार गेल्यानंतर शरीरावर काय होतो परिणाम?

तापमान चाळीशी पार गेल्यानंतर शरीरावर काय होतो परिणाम?

देशातील काही राज्यांमध्ये उष्णता (temprature) वाढीचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 26 मे : देशातील तापमान वाढू लागलं आहे. काही राज्यांमध्ये अलर्टही जारी करण्यात आला आहे. उष्णता वाढू लागलं की, अंगाची लाहीलाही होते, उकाडा असह्य होतो. तापमान वाढलं की त्याचा आपल्या शरीरावर नेमका काय परिणाम होतो जाणून घेऊयात.

मानवी शरीराचं सामान्य तापमान 98.4 डिग्री फारेनहाइट म्हणजे 37.5 से 38.3 डिग्री सेल्सियस असतं. याचा अर्थ 40 डिग्री सेल्सिअस तापमानापर्यंत शरीरावर फारसा परिणाम होत नाही. प्रत्यक्षात शरीराचं हे कोर तापमान असतं, जे शरीर सहन करू शकतं.

तापमानाचा शरीरावर जो परिणाम होतो, त्याला डॉक्टर हीट स्ट्रेस असं म्हणतात.

आयआयटी दिल्लीतील असोसिएट प्रोफेसर डे यांनी सांगितलं, जेव्हा आपलं शरीर खूप जास्त तापमानात असतं, तेव्हा आपलं तापमान नियंत्रणात ठेवण्याासठी शरीर प्रयत्न करतं. शरीर आपलं तापमान नियंत्रणात ठेवण्यासाठी कसं प्रयत्न करतं, हे वातावरण आणि शारीरिक स्थितीवर अवलंबून असतं.  अशात शारीरिक थकवाही जाणवतो.

हे वाचा - भारतात कोरोनाव्हायरसचं कम्युनिटी ट्रान्समिशन; विषाणूतज्ज्ञांचा धक्कादायक दावा

हीट स्ट्रेसच्या लक्षणांबाबत माहिती देताना नेफ्रॉन क्लीनिकचे डॉ. संजीव बागई यांनी सांगितलं, जर तापमानाचा पारा 40 अंश सेल्सिअस पार गेला तर शरीरात समस्या उद्भवू शकतात. परिस्थितीनुसार त्याचे परिणाम वेगवेगळे असतात. मात्र सामान्यपणे 40 ते 42 अंश तापमानात डोकेदुखी, उलटी आणि शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते आणि पारा 45 अंश सेल्सिअसवर गेला तर चक्कर, बेशुद्ध होणं, भीती, ब्लड प्रेशर कमी होणं अशा समस्याही उद्भवतात.

तज्ज्ञांच्या मते जर उष्णता 48 ते 50 डिग्रीपेक्षा जास्त झालं, तर मृत्यूही ओढावू शकतो.

हे वाचा - आता कोरोना व्हायरसची नाही तर 'या' गोष्टींची वाटतेय लोकांना भीती, धक्कादायक अहवाल

आपल्या शरीरात 70 टक्के पेक्षा जास्त पाणी असतं. त्यामुळे शरीरातील पाणी वाढत्या तापमानानात शरीराचं तापमान स्थिर ठेवण्यासाठी प्रयत्न करतं. त्यामुळे आपल्यााल घाम येतो आणि शरीरात पाणी कमी होतं. शरीरातील पाणी कमी झाल्यानंतर चक्कर, डोकेदुखी, बेशुद्ध होणं अशा समस्या उद्भवतात.  जर तुमची त्वचा, जीभ, ओठ कोरडे पडू लागलेत, त्वचा लालसर पडू लागले, मांसपेशी कमजोर होऊ लागल्या तर समजा तुमच्या शरीराचं तापमान वाढतं आहे आणि त्याचा तुमच्या शरीरावर परिणाम होतो आहे.

First published: May 26, 2020, 7:28 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading