• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • तुम्हाला माहिती आहे का योग्य वजन म्हणजे नमके किती? वय आणि उंचीनुसार मोजायला हवं

तुम्हाला माहिती आहे का योग्य वजन म्हणजे नमके किती? वय आणि उंचीनुसार मोजायला हवं

नसते खुप जणांना वजन वाढलं की टेन्शन येतं.

नसते खुप जणांना वजन वाढलं की टेन्शन येतं.

एका जागेवर बसून काम करण्याच्या सवयीमुळे वजन वाढतं (Weigh Gain). योग्य वजन वय, लिंग आणि उंची यांच्या आधारे ठरवलं जातं.

 • Share this:
  नवी दिल्ली, 04 ऑगस्ट : आपली बदललेली लाइफस्टाइल (Lifestyle) आणि खाण्यापिण्याच्या सवयींमुळे वजन वाढण्याची समस्या (Weight Gain Problem) सामान्य झाली आहे. वजन नेमकं किती असावा (Exact Weight) याची माहिती सगळ्यांनाच नसते. खुप जणांना वजन वाढलं की टेन्शन (Tension) येतं. मात्र वजन वाढलं तरी जर ते आपल्या उंची आणि वयाप्रमाणे (Weight Compared to Height & Age) असेल तर त्याचं टेन्शन घेण्याची आवश्यकता नसते. पण, ठराविक वजनापेक्षा जास्त वजन झालं तर, वजन वाढल्यानंतर लठ्ठपणा, मधुमेह, ब्लडप्रेशर सारखे त्रास व्हायला लागतात. शिवाय स्नायू दुखणे गुडघ्याचे आजारही होतात. एका जागेवर बसून काम करण्याच्या सवयीमुळे वजन वाढतं. योग्य वजन वय, लिंग आणि उंची यांच्या आधारे ठरवलं जातं. पाहुयात योग्य वजन कसं ठरवायचं उंची प्रमाणे वजन उंची 4.10 इंच असेल तर, वजन 41 ते 52 किलोग्रॅम असावं. यापेक्षा जास्त वजन असणं योग्य नाही. 5 फूट पेक्षा जास्त उंची असेल तर, 44 ते 55.7 किलोग्रॅम वजन असणं चांगलं आहे. 5.02 इंच उंची असेल तर, वजन 49 ते 63 किलोग्रॅम दरम्यान वजन असणं योग्य मानलं गेलं आहे. जर, उंची 5.04 असल्यास 49 ते 63 किलोग्रॅम दरम्यान वजन असावं. (सोडा वजन वाढण्याची भीती! रोज चॉकलेटने करा दिवसाची सुरुवात; कमी होईल वाढलेली चरबी) तर, 5.06 पेक्षा जास्त वजन असणाऱ्यांनी 53 ते 67 किलोग्रॅम वजन ठेवावं. यापेक्षा जास्त म्हणजे 5.08 इंच उंची असले तर, साधारणपणे 56 ते 71 किलोग्रॅमपर्यंत वजन असावं. ज्यांची उंची 5.10 फूट आहे त्यांचं 59 ते 75 किलोग्रॅम वजन असावं. 6 फूटांपेक्षा जास्त उंची असेल तर, 63 ते 80 वजन चालू शकतं. हे झालं उंच प्रमाणे वजन. आता वयाप्रमाणे वजन किती असावं हे पाहूयात. (दुधाला ‘हा’ पर्यायही आहे उत्तम; रोज घेतल्यास वजन होईल कमी, डायबेटीज राहील दूर) वयाप्रमाणे वजन 1 वर्षाच्या मुलाचं वजन 10.2 आणि मुलीचं वजन 9.5 किलोग्रॅम असणं योग्य असतं. 2 ते 5 वर्षांपर्यंत वजन 12.3 किलोग्रॅम ते 16 किलोग्रॅम असणं योग्य असतं. 3 ते 5 वर्षांपर्यंत 14 ते 17  किलोग्रॅम वजन असावं. 5 ते 8 वर्षांपर्यंत मुलांचं वजन 20 किलोग्रॅम पासून 25 किलोग्रॅमपर्यंत असावं. तर, मुलींचं वजन 19 किलोग्रॅम पासून 25 किलोग्रॅम असू शकतं. ('बेटा बेटा ना कर, अब तेरा...', गोड गोड गात सुनेने सासूलाच दिली धमकी; पाहा VIDEO) 9 ते 11 वर्षांपर्यंत मुलाचं वजन 28 किलोग्रॅम ते 32 किलोग्रॅम असणं चांगलं तर, मुलींचं वजन 28 किलोग्रॅम ते  33 किलोग्रॅम असतं. 12 ते 14 वर्षात मुलामुलींच्या शरीरात बरेच बदल होत असतात. तेव्हा मुलांच वजन 37 किलो 47 किलोग्रॅम असू शकतं. तर, मुलीचं वजन 38 ते 48 किलोग्रॅम चालू शकतं. 15 ते 18 वर्षात मुलाचं वजन 58 किलोग्रॅम ते 65 किलोग्रॅम असू शकतं. तर, मुलीचं वजन 53 किलोग्रॅम ते 54 किलोग्रॅम असावं. (दातांकडे करू नका दुर्लक्ष; ही लक्षणं दिसली तर गंभीर आजाराचे संकेत समजा) 19 ते 39 वयात पुरुषाचं वजन 83 किलो ते 90 किलोपर्यंत असू शकतं. तर, महिलांचं वजन 73 किलो ते 76 किलो असावं. 40 ते 60 वर्षाचा विचार करता पुरुषांचं वजन 90च्या आसपास तर, महिलांचं वजन 77 किलो पर्यंतच असावं. पुरुष आणि महिला यांचं वय त्यांची उंची याचानुसार वयाचा आलेख ठरवला जायला हवा.
  Published by:News18 Desk
  First published: