मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

मृत्यूपूर्वी माणसांना नेमकं काय दिसतं? 'या' नर्सने सांगितला अनुभव...

मृत्यूपूर्वी माणसांना नेमकं काय दिसतं? 'या' नर्सने सांगितला अनुभव...

अनुभव अनेकांनी सांगितले; मात्र याचा शास्त्रीय आधार अद्याप समोर आलेला नाही. माणसं या सर्व गोष्टी त्यांच्या अनुभवाच्या आधारे बोलत आहेत.

अनुभव अनेकांनी सांगितले; मात्र याचा शास्त्रीय आधार अद्याप समोर आलेला नाही. माणसं या सर्व गोष्टी त्यांच्या अनुभवाच्या आधारे बोलत आहेत.

अनुभव अनेकांनी सांगितले; मात्र याचा शास्त्रीय आधार अद्याप समोर आलेला नाही. माणसं या सर्व गोष्टी त्यांच्या अनुभवाच्या आधारे बोलत आहेत.

नवी दिल्ली, 31 मार्च : मृत्यू (Death) हे जगातलं अंतिम सत्य आहे असं म्हटलं जातं. जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीचा मृत्यू अटळ असतो. याची जाणीव असूनही माणूस मृत्यूला घाबरतो. आतापर्यंत अनेकांनी मृत्यूपूर्वीचे, तर काहींनी पुनर्जन्माचे अनुभव शेअर केले आहेत. मृत्यूच्या तोंडातून बाहेर पडल्याचा दावा करणारेही अनेक जण आहेत. रुग्णालयात रुग्णांची देखभाल करणाऱ्या एका नर्सनेदेखील माणसांना मृत्यूपूर्वी नेमके कसे अनुभव येतात याबाबत तिच्या अनुभवाच्या आधारे सांगितलं आहे.

हॉस्पिस नर्स (Hospice Nurse) म्हणजेच गंभीर आजारी रुग्णांची काळजी घेणाऱ्या या नर्सने आजपर्यंत अनेक व्यक्तींना आपल्या डोळ्यांसमोर प्राण सोडताना पाहिलं आहे. ज्युली असं या नर्सचे नाव आहे. ज्युलीने टिकटॉकवरच्या (TikTok) एका व्हिडीओतून आपला अनुभव शेअर केला आहे. मृत्यूची वेळ जवळ आल्यानंतर रुग्णांना नेमकं कसं वाटतं हे तिने सांगितलं आहे. तिच्या या व्हिडीओला आतापर्यंत 50 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. यासोबतच अनेक युझर्सनी ज्युलीचा अनुभव अगदी बरोबर असल्याचंदेखील म्हटलं आहे.

वाचा : एक बटण दाबताच 30 सेकंदात मृत्यू; इच्छामरण हवं असणाऱ्यांसाठी किलिंग मशीन!

डोळ्यांसमोर दिसू लागतात नातेवाईक

मृत्यूपूर्वीचे अनुभव समजावून सांगताना ज्युली म्हणाली, की मृत्यूपूर्वी संबंधित व्यक्तीच्या जवळच्या व्यक्ती, ज्या आता या जगात नाहीत त्या संबंधित व्यक्तीच्या वेदना कमी करण्याचा प्रयत्न करत असतात. ज्युलीने अशा अनेक रुग्णांची काळजी घेतली आहे, ज्यांना मृत्यूपूर्वी आपले मृत नातेवाईक दिसत होते. मृत्यूच्या एक महिना आधी किंवा काही आठवडे आधी रुग्णांना त्यांचे नातेवाईक दिसायला लागतात असा अनुभव तिने सांगितला आहे. अशा वेळी रुग्ण त्या नातेवाईकांशी बोण्याचा प्रयत्न करतो किंवा त्यांच्याकडे एकटक पाहत राहतो. जेव्हा रुग्णाला तो काय पाहतोय असं विचारलं, तेव्हा तो आपल्या नातेवाईकांना पाहत असल्याचं सांगतो. ज्युलीने सांगितल्याप्रमाणे हे नातेवाईक मृत्यूच्या वेळी होणाऱ्या वेदना कमी करण्यासाठी रुग्णाकडे येतात.

वाचा : ओठांवर टॅनिंग झालंय? Pink Lips साठी हा घरगुती उपाय ठरेल फायदेशीर

युझर्सनीही सांगितले त्यांचे अनुभव

ज्युलीने शेअर केलेल्या व्हिडीओवर अनेक युझर्सनी कमेंट केल्या आहेत. अनेकांनी हा अनुभव योग्य असल्याचं म्हटलं आहे. काहींनी कमेंटमध्ये लिहिलं की, मृत्यूच्या वेळी त्यांच्या प्रियजनांनीही अशाच काही गोष्टी पाहिल्या आहेत. एका व्यक्तीने लिहिलं, की जेव्हा त्या व्यक्तीचे आजोबा मृत्यूच्या दारात उभे होते तेव्हा त्यांनी त्यांचं संपूर्ण कुटुंब तिथे असल्याचं त्याला सांगितलं होतं. त्याने जेव्हा आजोबांचा हात धरला, तेव्हा ते म्हणाले, की मी त्यांच्याबद्दल बोलत नाही. यासोबतच आणखी एका युझरने लिहिलं आहे की, त्याच्या आईच्या शेवटच्या दिवसांत त्यानेही तिच्या तोंडून अशाच गोष्टी ऐकल्या होत्या.

असे अनुभव सर्वांनी सांगितले; मात्र याचा शास्त्रीय आधार अद्याप समोर आलेला नाही. माणसं या सर्व गोष्टी त्यांच्या अनुभवाच्या आधारे बोलत आहेत.

First published:

Tags: Death, Lifestyle