Home /News /lifestyle /

Sex Education | Virginity Lost की Sexual debut नक्की काय म्हणावं?

Sex Education | Virginity Lost की Sexual debut नक्की काय म्हणावं?

पूर्वी सेक्स (Sex) म्हटलं की Virginity (कौमार्य) बाबत बोललं जायचं. मात्र, आता ही संज्ञा Sexual debut मध्ये बदलली आहे.

    मुंबई, 20 जानेवारी : पूर्वी सेक्स (Sex) म्हटलं की Virginity (कौमार्य) बाबत बोललं जायचं. मात्र, आता ही संज्ञा Sexual debut मध्ये बदलली आहे. शहरी शब्दकोशात (Urban Dictionary) याची व्याख्या फक्त कौमार्य गमावणं इतकीच आहे. मात्र, Sexual debut पहिल्या व्हजायनल सेक्सपुरतं (first vaginal sex) मर्यादित नाही तर यामध्ये हस्तमैथुन, ओरल सेक्स यासारख्या Non-penetrative सेक्शुअल अॅक्टिव्हिजचाही (sexual activity) समावेश आहे. बहुतेक तरुणांना Intercourse (प्रत्यक्ष किंवा थेट सेक्स) करायचा नसेल ते Outercourse (शरीराच्या बाह्य अवयवांना स्पर्श करून उत्तेजित करणं) भरपूर प्रमाणात करतात. मात्र, यानंतरही मी सेक्ससाठी तयार आहे, हे कसं ठरवावं हा प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित होतो. पॉप्युलेशन काऊन्सिल (Population Council) च्या सर्वेक्षणानुसार बिहारमध्ये 14.1% अविवाहित किशोरवयीन मुलं आणि 6.3% अविवाहित किशोरवयीन मुलींनी लग्नाच्या आधीच लैंगिक संबंध (Premarital sex) केले असल्याचे समोल आलं आहे. भारतात बहुतेक मुलं-मुली चुंबन घेणं (kissing) आणि लैंगिक अवयवांना स्पर्श करणं (Touching sexual organs) अशा Non-penetrative sexual अॅक्टिव्हिटी करतात. तर 50% मुली 18 वर्षाच्या होताच सेक्शुअली अॅक्टिव्ह होतात. अज्ञानाने गैरसमज किशोरवयीन मुलांना सेक्स आणि प्रजनन आरोग्याबाबत अज्ञात स्रोतांकडून माहिती मिळते. बहुतेक वेळा त्यांच्या वयाचे मित्र त्यांना ही माहिती देतात किंवा सध्या इंटरनेटवर अशी माहिती त्यांना उपलब्ध होते, ज्यामुळे त्यांना चुकीची माहितीही मिळते. त्यामुळे हस्तमैथुनामुळे (Masturbation) नपुंसक होऊ शकता, चुंबन घेतल्याने गरोदर राहू शकता, सर्व महिलांच्या ब्रेस्टमध्ये दूध असतं असे सेक्सबाबत बरेच गैरसमज निर्माण होतात. “आम्ही दोघंही स्पोर्ट्स अकॅडमीमध्ये (sports academy) होतो. ती माझ्यापेक्षा 2 वर्षांनी मोठी होती. आम्ही एकमेकांकडे पाहायचो आणि हसायचो. मॅचेस आणि सिलेक्शनबाबत आम्ही सहसा बोलायचो. खरं तर ते स्पष्टपणे आकर्षणच होतं. आमच्या एका मित्राने आमच्या दोघांचीही डेट फिक्स केली. त्यावेळी आणि त्यानंतर जेव्हा कधी संधी मिळाली तेव्हा आम्ही एकमेकांना किस केलं आणि काही ठिकाणी स्पर्शही केला. तेव्हा मी 15 वर्षांचा होतो” - सुधीर, वय 21, अॅथलेट, रोहतक Sex Education | तुमच्या नीरस लैंगिक जीवनात असे भरा रंग, दोघांनाही मिळेल आनंद मी सेक्ससाठी तयार आहे हे मला कसं समजेल? आऊटरकोर्सनंतर बहुतेक तरुणांना गोंधळात टाकणारा प्रश्न म्हणजे मी सेक्ससाठी कधी तयार आहे? मी पहिल्यांदा सेक्स कधी करावं? बहुतेक मुलींना लग्नासाठी Saving the hymen म्हणजेच virginity टिकवून ठेवणं हा निर्णायक घटक असतो. तर एखाद्याकडून दबाव आणि कुतूहल यामुळे मुलांना पुढाकार घेऊन सेक्स करणं भाग पडतं. सेक्स हे शारीरिक आहे, हे सर्व तरुणांना माहिती असतं, मात्र पहिल्यांदाच सेक्स करताना होणाऱ्या मानसिक परिणामांना सामोरं जाण्यास ते तयार नसतात. खरंतर प्रत्येक व्यक्ती वेगळा असतो. त्याचं संगोपन आणि त्याचे वैयक्तिक प्राधान्य यावरून सेक्स कधी आणि किती करावा हे ठरतं. तुम्ही सेक्ससाठी तयार आहात की नाही हे जाणून घ्यायचं असेल, तर स्वत:ला काही प्रश्न विचारा. तुम्हाला सेक्स, गर्भनिरोधक (contraception), सुरक्षित आणि निरोगी सेक्सची पद्धत (safe and hygienic sexual practices) याबाबत किती माहिती आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे सेक्सबाबत नकारात्मक आणि गंभीर अशा प्रतिक्रिया हाताळण्यासाठी तुम्ही तयार आहात का? कोणत्याही नात्यात पहिल्याच भेटीत किंवा अगदी लगेच पहिल्यांदाच सेक्स करणं योग्य नाही, तर जेव्हा दोघांनाही सेक्सबाबत पुरेशी माहिती असते आणि ते तयार असतात तेव्हाच पहिल्यांदा सेक्स करावं. पहिल्यांदाच केलेलं सेक्स तणावपूर्ण किंवा जबरदस्ती केलेलं नसावं, तर अविस्मरणीय आणि मजेशीर असायला हवं लेखिका – पूजा प्रियंवदा या Redwomb  संकेतस्थळावर Sexual wellness columnist आहेत. Redwomb हे सेक्सबाबत लोकांना माहिती देणारं ऑनलाईन व्यासपीठ आहे.
    Published by:Rahul Punde
    First published:

    Tags: Health Tips, Sex education

    पुढील बातम्या