मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Meditation मुळे प्रतिकारकशक्तीही वाढते? Omicron च्या संकटात संशोधनात मोठी माहिती समोर

Meditation मुळे प्रतिकारकशक्तीही वाढते? Omicron च्या संकटात संशोधनात मोठी माहिती समोर

Deep meditation is helpful for immune system : मेडिटेशनमध्ये असलेली आण्विक यंत्रणा आणि महत्त्वाच्या जनुकांचे योगदान अद्याप व्यापकपणे समजलेले नाही. या अभ्यासाचे निष्कर्ष प्रोसिडिंग ऑफ द नॅशनल अॅकॅडमी ऑफ सायन्सेस (Proceedings of the National Academy of Sciences), यूएसएच्या पीएनएएस जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहेत.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Desk
नवी दिल्ली, 26 डिसेंबर : अलीकडे मोठ्या प्रमाणात झालेल्या जीनोमिक अभ्यासातून असे दिसून आले आहे की, सखोल ध्यान म्हणजेच अॅडवांस्ड मेडिटेशन रोगप्रतिकारक प्रणालीच्या क्रियाकलापांशी संबंधित आहे. यूएसएच्या ओरेगॉन युनिव्हर्सिटीच्या (University of Oregon) शास्त्रज्ञांनी केलेल्या या अभ्यासात, अॅडवांस्ड मेडिटेशनशी संबंधित ट्रान्सक्रिप्शनल प्रोग्रामची (transcriptional program) ओळख आणि स्वरूप याबद्दल माहिती गोळा केली गेली आहे. यासोबतच बायोइन्फर्मेटिक्सच्या माध्यमातून ध्यानाशी संबंधित विविध नेटवर्क्स एकत्रित करण्यात आल्या. हे कोर नेटवर्क विविध रोगप्रतिकारक सिग्नलच्या (Deep meditation is helpful for immune system) मार्गांद्वारे जोडलेले आहेत. योग आणि ध्यानाच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर सकारात्मक परिणामांबद्दल (Physical And Mental Health) पूर्वीच्या अनेक अभ्यासांमध्ये सांगितला गेले आहे. परंतु, त्यात असलेली आण्विक यंत्रणा आणि महत्त्वाच्या जनुकांचे योगदान अद्याप व्यापकपणे समजलेले नाही. या अभ्यासाचे निष्कर्ष प्रोसिडिंग ऑफ द नॅशनल अॅकॅडमी ऑफ सायन्सेस (Proceedings of the National Academy of Sciences), यूएसएच्या पीएनएएस जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहेत. संशोधन कसे झाले? संशोधकांनी सांगितले की, ही कोर ट्रान्सक्रिप्शनल प्रोफाइल (core transcriptional profile) मल्टिपल स्क्लेरोसिस म्हणजेच मेंदू आणि स्पाइनल कॉर्डशी संबंधित रोग आणि कोविड-19 संसर्गादरम्यान निष्क्रिय होते. हे वाचा - Healthy Lifestyle: दिवसाची सुरुवात करताना करा या फक्त 3 गोष्टी; कधीही पडणार नाही आजारी या अभ्यासासाठी, सुमारे 40 वर्षे वयोगटातील 106 स्वयंसेवकांच्या रक्ताच्या नमुन्यांचे जीनोमिक आणि जैव सूचनात्मक विश्लेषण करण्यात आले. ते सर्व सखोल परित्याग ध्यान (मेडिटेशन) च्या अमलात होते. ज्यामध्ये त्यांनी 8 दिवस दिवसातील 10 तासांपेक्षा जास्त शांततेत घालवले. अभ्यासात काय झाले विश्लेषणातून असे दिसून आले आहे की, ध्यानानंतर प्रतिकारशक्तीशी संबंधित 220 जीन्सच्या अभिव्यक्तीमध्ये वाढ झाली आहे, ज्यामध्ये इंटरफेरॉन सिग्नलिंगशी संबंधित 68 जनुकांचा समावेश आहे, परंतु दाहक जनुकांच्या अभिव्यक्तीमध्ये कोणताही बदल झाला नाही. हे वाचा - त्वचेपासून ते केसांच्याही आरोग्यासाठी गुणकारी आहेत कडुनिंबाची पाने; जाणून घ्या या पद्धती संशोधकांना त्यांच्या अभ्यासाच्या निष्कर्षात असेही आढळून आले की ध्यानादरम्यान, रोगप्रतिकारक शक्तीचे कार्य गतिमान होते आणि त्यात दाहक सिग्नल सक्रिय होत नाहीत. अशा प्रकारे, ध्यान कमकुवत रोगप्रतिकार प्रणाली बरे करण्यास मदत करते.
First published:

Tags: Health, Lifestyle, Mental health

पुढील बातम्या