नवी दिल्ली, 07 जानेवारी : आजकालच्या धकाधकीच्या, ताणतणावाच्या जीवनशैलीमुळे अगदी तरुण वयातच मधुमेह (Diabetes) , रक्तदाब (Blood Pressure) , हृदयविकार (Heart Problem) असे विकार अनेकांना गाठत आहेत. मधुमेह, रक्तदाब अशा आजारांशी झुंजणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी अनेक औषधं घेतली जातात.
रोजच्या आहारात काही भाज्यांचा समावेश करून मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी हातभार लावता येतो. कारलं, काकडी, टोमॅटो, सलगम, करवंद, भोपळा, पालक, मेथी, कोबी या भाज्या भरपूर खाव्यात. बटाटे आणि रताळी आहारातून वर्ज्य करावीत. फळांमध्ये सफरचंद, डाळिंब, संत्री, पपई, पेरू ही फळं खावीत आणि आंबा, केळी, लिची, द्राक्षं अशी फळं कमी खावीत. त्याचबरोबर ड्रायफ्रूट्समध्ये बदाम, अक्रोड, अंजीर भरपूर प्रमाणात खावेत; मात्र बेदाणे, खजूर खाणं टाळावं. मधुमेहाच्या रुग्णांनी साखर, गूळ, उसाचा रस, चॉकलेट अजिबात खाऊ नये.
बदलत्या हवामानाचा मधुमेही रुग्णांच्या रक्तातील साखरेवर परिणाम होतो, मग तो उन्हाळा असो, पावसाळा असो किंवा हिवाळा. वेगवेगळ्या तापमानाचा रक्तातील साखरेवर परिणाम होऊ शकतो. यामुळेच मधुमेहाच्या रुग्णांना निरोगी आणि ऋतुमानानुसार आहार घेण्याचा सल्ला दिला जातो. आता असा प्रश्न पडतो की, मधुमेहाच्या रुग्णांनी हिवाळ्यात रक्तातील साखरेची पातळी योग्य ठेवण्यासाठी काय खावे? याविषयी आज आपण थोडक्यात जाणून घेऊया.
प्रसिद्ध आयुर्वेदिक डॉक्टर अबरार मुलतानी यांनी झी न्यूजला दिलेल्या माहितीनुसार, हिवाळ्यात साखरेच्या रुग्णांना त्यांच्या आहाराची विशेष काळजी घ्यावी लागते. या बातमीत खाली दिलेल्या यादीत नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत खाल्लेल्या पदार्थांची माहिती दिली आहे.
हिवाळ्यात मधुमेहींसाठी खाद्यपदार्थांची यादी
नाश्ता
वाफवलेले अंकुर
ग्रील्ड सॅलड
काजू, बिया
फिकट रंगाची फळे
आले दालचिनी चहा
वेलची हर्बल चहा
दुपारचे जेवण
दाल रोटी
दुपारच्या जेवणासाठी सलाद
गरम गरम चणे
हुरडा (ताजी ज्वारी भाजलेली)
तिळापासून बनवलेल्या वस्तू
बाजरीची भाकरी
हे वाचा -
लघवीच्या समस्येशिवाय किडनी खराब होण्याची अशी असतात लक्षणं; त्याकडे दुर्लक्ष पडेल महागात
संध्याकाळी काय खावे
संध्याकाळी भाज्या सूप
टोमाटो सूप
लौकेचे सूप
वाटाणा मसूर सूप
हे वाचा -
Exercise In Evening: सकाळी-सकाळी नव्हे संध्याकाळी करा व्यायाम; सगळे फायदे वाचून तुम्हीही नियोजन बदलाल
रात्री काय खावे
क्विनोआ स्टू (फक्त लंच आणि डिनरसाठी)
बार्ली सूप (दुपारचे जेवण किंवा रात्रीचे जेवण)
शाकाहारी करी
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.