मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Cause of Burping: तुम्हालाही जरा जास्तच ढेकर येतात का? या काही आजारांचे असू शकतात संकेत!

Cause of Burping: तुम्हालाही जरा जास्तच ढेकर येतात का? या काही आजारांचे असू शकतात संकेत!

कधी अॅसिडिटीमुळं तर कधी अति खाण्यामुळं ढेकर येते. काही वेळेस वारंवार फ्रीजमधील थंड पाणी पिण्यामुळंही ढेकर येत राहतात. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की, वारंवार ढेकर का येत राहतात? जाणून घेऊया ढेकर वारंवार येण्याची (Cause of Burping) कारणं आणि त्याचे धोके

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली,17 नोव्हेंबर: पोटातून अतिरिक्त हवा बाहेर काढण्यासाठी ढेकर येणं हा एक आरोग्यदायी मार्ग आहे. पण सतत ढेकर देत राहणं हे चांगल्या आरोग्याचं लक्षण नाही. कधी अॅसिडिटीमुळं तर कधी अति खाण्यामुळं ढेकर येते. काही वेळेस वारंवार फ्रीजमधील थंड पाणी पिण्यामुळंही ढेकर येत राहतात. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की, वारंवार ढेकर का येत राहतात? जाणून घेऊया ढेकर वारंवार येण्याची (Cause of Burping) कारणं आणि त्याचे धोके.

यामुळं येते ढेकर

आपल्या पोटात अनेक पाचक आम्लं (डायजेस्टिव्ह अॅसिड्स - Digestive Acids) असतात आणि ती पचन प्रक्रियेदरम्यान वायू सोडतात. त्यामुळं ढेकर येणं (Burping) किंवा गुद्वारावाटे वायू बाहेर पडण्याची क्रिया (Farting) होते. यापैकी ढेकर देणं खरोखर आरोग्यदायी आहे. कारण, ते शरीरातील अतिरिक्त वायू बाहेर काढून टाकतं. 'झी न्यूज'ने दिलेल्या बातमीनुसार तयार झालेला गॅस पोटातून बाहेर न पडल्यास पोट फुगणं किंवा तीव्र वेदना होऊ शकतात. तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की, जेव्हा तुम्हाला अॅसिडिटी होते, तेव्हा ढेकर आल्यावर तुम्हाला खूप आराम मिळतो.

वारंवार ढेकर येणं आहे या समस्यांचं लक्षण

खूप हवा गिळणे

च्युइंगम चघळणं, खूप जलद खाणं, जलद पाणी पिणं, जेवताना बोलणं, सिपर किंवा बाटलीतून पाणी पिणं या सर्व मार्गांनी हवा पोटात जाते. अनेक वेळा आतड्याची स्थिती बिघडलेली असतानाही पोट खूप फुगतं. ही अतिरिक्त हवा आपल्या पोटात अडकते आणि आपल्याला नेहमीपेक्षा जास्त ढेकर येऊ लागतात.

आम्लीयता निर्माण करणारं अन्न

तांदळासारखे पिष्टमय पदार्थ खाल्ल्यानंही गॅस होऊ शकतो. तसेच, वेगवेगळ्या लोकांमध्ये वेगवेगळ्या गॅस्ट्रोइंटेस्टाइनल (GI) प्रणाली असतात. यामुळे प्रत्येक व्यक्तीच्या शरीरात अन्न आपापल्या गतीने पचते. जर तुमचा GI मंद असेल, तर तुम्हाला पुष्कळ ढेकर येऊ शकते. अशी परिस्थिती टाळण्यासाठी, जेवण करण्यापूर्वी सॅलड घेणं चांगलं ठरतं. तसंच, एका वेली जास्त खाण्यापेक्षा छोट्या-छोट्या भागात आणि वारंवार जेवण करा. यामुळं पोटात जास्त हवा साठून ते फुगणं नियंत्रित करण्यात मदत होईल.

हे वाचा - मुंबई काँग्रेसमधला अंतर्गत वाद सोनिया गांधींच्या दरबारी, भाई जगताप- झिशान सिद्दीकीमधला वाद पेटला

जेव्हा तुम्हाला इरिटेबल बोवेल सिंड्रोम होतो तेव्हा असे होते

इरिटेबल बोवेल सिंड्रोम (Irritable Bowel Syndrome) असलेले रुग्ण नेहमी डायरिया, बद्धकोष्ठता किंवा इतर जीआय समस्यांची तक्रार करतात. विशेषतः, बद्धकोष्ठतेच्या समस्येत भरपूर प्रमाणात गॅस तयार होतो. ज्यामुळं बराच काळ फुगवटा येतो. कधीकधी या वायूमुळे ओटीपोटात तीव्र वेदना होतात.

हे वाचा - Radish Health Benefits: हृदय विकारांसह BP सुद्धा राहील नियंत्रणात; हिवाळ्यात मुळा खाण्याचे इतके आहेत फायदे

मधुमेहामुळं

मधुमेह असलेल्या रुग्णांना गॅस्ट्रोपेरेसिस होऊ शकतो. ही स्थिती पोटाच्या स्नायूंवर परिणाम करते ज्यामुळे पचन प्रक्रियेत व्यत्यय येतो. कारण, यामुळं संपूर्ण प्रक्रिया नियंत्रित करणार्‍या स्नायूंना नुकसान होतं. त्यामुळं, मळमळ आणि उलट्या यांसारख्या इतर लक्षणांसह पोट फुगण्याचा प्रकार वारंवार होऊ लागतो.

(सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:

Tags: Health, Health Tips